मुख्य मजकुरावर जा

circa 1446–1406 BC

The Wilderness Years

Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.

2,247 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. अनुवाद २१:८सुमारे इ.स.पू. १४५१

    हे याहवेह, ज्या तुमच्या इस्राएली लोकांना तुम्ही सोडविले आहे, त्या लोकांना तुम्ही क्षमा करा व निरपराधी माणसाच्या हत्येचा आरोप त्यांच्यावर ठेवू नका.” मग या रक्तपाताचे प्रायश्चित्त होईल,

  2. अनुवाद २१:९सुमारे इ.स.पू. १४५१

    आणि तुम्ही तुमच्यावरील निरपराधी माणसाच्या रक्तपाताचा दोष घालवून टाकाल, कारण याहवेहच्या दृष्टीने योग्य ते केले आहे.

  3. अनुवाद २१:१०सुमारे इ.स.पू. १४५१

    जेव्हा तुम्ही तुमच्या शत्रूविरुद्ध युद्ध करण्यास जाल आणि याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्या शत्रूंना तुमच्या स्वाधीन करतील आणि त्यांना तुम्ही बंदिवान कराल,

  4. अनुवाद २१:११सुमारे इ.स.पू. १४५१

    आणि त्या बंदिवानात तुम्हाला जर एखादी देखणी तरुणी आढळली आणि तुम्ही तिच्याकडे आकर्षित झालात तर तिचा तुम्ही तुमची पत्नी म्हणून स्वीकार करावा.

  5. अनुवाद २१:१२सुमारे इ.स.पू. १४५१

    तिला तुम्ही तुमच्या घरी न्यावे आणि तिच्या डोक्यावरील केसांचे मुंडण करावे, तिची नखे कापावीत

  6. अनुवाद २१:१३सुमारे इ.स.पू. १४५१

    आणि तिने बंदिवासाची सर्व वस्त्रे बाजूला ठेवून द्यावीत आणि नंतर तिने तुमच्या घरी तिच्या आईवडिलांसाठी संपूर्ण महिनाभर शोक करावा. त्यानंतर तुम्ही तिच्याशी संबंध ठेऊ शकता, तुम्ही तिचे पती व ती तुमची पत्नी होईल.

  7. अनुवाद २१:१४सुमारे इ.स.पू. १४५१

    जर तुम्हाला ती आवडेनाशी झाली, तर तिला मुक्त करावे व तिला हवे तिथे जाऊ द्यावे, तुम्ही तिला किंमत घेऊन विकू नये, अथवा तिला गुलामासारखे वागवू नये कारण तुम्ही तिची अवहेलना केली आहे.

  8. अनुवाद २१:१५सुमारे इ.स.पू. १४५१

    एखाद्या मनुष्याला दोन पत्नी असतील व तो एकीवर प्रीती करीत असेल व दुसरीवर करीत नसेल आणि त्या दोघींनाही त्याच्यापासून पुत्र झाले असतील आणि जी त्याला प्रिय नाही तिचा पुत्र ज्येष्ठ असेल,

  9. अनुवाद २१:१६सुमारे इ.स.पू. १४५१

    तर जेव्हा तो आपल्या पुत्रांना आपली संपत्ती त्याचे वतन म्हणून वाटून देईल, तेव्हा जो खरा ज्येष्ठपुत्र असून नावडत्या पत्नीचा पुत्र आहे, त्याला डावलून, धाकट्या पुत्राला, जो त्याच्या आवडत्या पत्नीचा आहे, त्याला आपल्या प्रथम पुत्राचा अधिकार देऊ नये.

  10. अनुवाद २१:१७सुमारे इ.स.पू. १४५१

    आपल्या परंपरेप्रमाणे त्याने आपल्या सर्वात ज्येष्ठ पुत्राला दुप्पट वाटा द्यावा, कारण तो त्याच्या पौरुषाचे प्रथमफळ आहे. तो जरी नावडत्या पत्नीचा पुत्र असला, तरीही ज्येष्ठ पुत्राचा हक्क त्याचाच आहे.

  11. अनुवाद २१:१८सुमारे इ.स.पू. १४५१

    जर एखाद्या मनुष्याला हट्टी व बंडखोर पुत्र असेल, जो आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळत नसेल आणि त्यांनी शिस्त लावण्याचा प्रयत्न केला तरी तो त्यांचे ऐकत नसेल,

  12. अनुवाद २१:१९सुमारे इ.स.पू. १४५१

    तर त्याच्या आईवडिलांनी त्याला धरून नगराच्या वेशीवर वडील मंडळीपुढे घेऊन जावे.

  13. अनुवाद २१:२०सुमारे इ.स.पू. १४५१

    त्यांनी वडील मंडळीपुढे सांगावे, “हा आमचा पुत्र हट्टी आणि बंडखोर आहे. तो आमच्या आज्ञा पाळत नसून आमचे ऐकत नाही. तो खादाड व मद्यपी आहे.”

  14. अनुवाद २१:२१सुमारे इ.स.पू. १४५१

    मग त्या नगरातील सर्व लोकांनी त्याला धोंडमार करून ठार मारावे. अशा रीतीने तुमच्यामधील दोष तुम्ही घालवून टाकावे म्हणजे सर्व इस्राएली लोक हे ऐकतील आणि घाबरतील.

  15. अनुवाद २१:२२सुमारे इ.स.पू. १४५१

    जर एखाद्या मनुष्याने असा काही गंभीर स्वरुपाचा गुन्हा केला ज्याची शिक्षा मृत्युदंड आहे व त्याला मृत्युदंड देण्यात आला आणि त्याला झाडावर टांगण्यात आले असेल,

  16. अनुवाद २१:२३सुमारे इ.स.पू. १४५१

    तर त्याचा मृतदेह रात्रभर तिथे ठेवू नये, तर त्याच दिवशी त्याचे दफन करावे; कारण जो कोणी खांबावर टांगलेला असेल, त्याच्यावर परमेश्वराचा शाप असतो. म्हणून याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला जो देश वतन म्हणून देत आहे, तो तुम्ही भ्रष्ट करू नये.

  17. अनुवाद २२:१सुमारे इ.स.पू. १४५१

    आपल्यापैकी एखाद्या इस्राएली मनुष्याचा बैल अथवा मेंढरू दूरवर भटकलेला तुम्ही पाहिला, तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये; त्याला त्याच्या मालकाकडे घेऊन जावे.

  18. अनुवाद २२:२सुमारे इ.स.पू. १४५१

    जर मालक तुमच्याजवळ राहत नसतील किंवा तो कोण आहे हे तुम्हाला ठाऊक नसेल, तर तो तुम्ही तुमच्या घरी न्यावा व त्याचा मालक त्याला शोधीत तिथे येईपर्यंत त्याला ठेवावे. मग त्याच्या मालकाला तो परत करावा.

  19. अनुवाद २२:३सुमारे इ.स.पू. १४५१

    जर तुम्हाला त्यांचे गाढव किंवा झगा किंवा त्यांनी हरवलेले इतर काही सापडले तर असेच करा. त्याकडे दुर्लक्ष करू नका.

  20. अनुवाद २२:४सुमारे इ.स.पू. १४५१

    जर तुमच्या इस्राएली बांधवाचे गाढव किंवा बैल मार्गात घसरून पडलेले दिसले तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. त्याला आपल्या पायांवर उभे करण्यास त्याच्या मालकाला मदत करावी.

  21. अनुवाद २२:५सुमारे इ.स.पू. १४५१

    कोणत्याही स्त्रीने पुरुषाचा पोशाख घालू नये किंवा कोणत्याही पुरुषाने स्त्रीचा पोशाख घालू नये, कारण याहवेह तुमच्या परमेश्वराच्या दृष्टीने असे करणे घृणित आहे.

  22. अनुवाद २२:६सुमारे इ.स.पू. १४५१

    जर तुम्हाला मार्गाच्या कडेला किंवा झाडावर किंवा जमिनीवर पक्ष्याचे घरटे आढळले आणि त्यात मादी पिलांवर किंवा अंड्यांवर बसलेली असेल, तर त्या मादीला पिलांसोबत धरू नये.

  23. अनुवाद २२:७सुमारे इ.स.पू. १४५१

    तुम्हाला हवी असतील तर तुम्ही तिची पिल्ले घेऊ शकता, त्यांच्या आईस मात्र तुम्ही अवश्य जाऊ द्यावे; म्हणजे तुमचे कल्याण होईल व तुम्हाला दीर्घायुष्य लाभेल.

  24. अनुवाद २२:८सुमारे इ.स.पू. १४५१

    जेव्हा तुम्ही नवीन घर बांधाल तेव्हा धाब्याला कठडा बांधवा, म्हणजे कोणीही धाब्यावरून पडल्यास मनुष्य हत्येचा दोष तुमच्या घरावर येऊ नये.

  25. अनुवाद २२:९सुमारे इ.स.पू. १४५१

    तुमच्या द्राक्षमळ्यात तुम्ही दोन प्रकारचे बी पेरू नये; तसे केल्यास, दोन्हीही पिकेच नव्हे तर दोन्ही बीजे देखील दूषित समजल्या जातील.