- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1446–1406 BC
The Wilderness Years
Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.
या कालखंडातील वचने
- अनुवाद २४:५सुमारे इ.स.पू. १४५१
नुकतेच विवाह झालेल्या पुरुषाला सैन्याबरोबर मोहिमेवर पाठवू नये किंवा त्याच्यावर इतर कुठलीही जबाबदारी टाकू नये. त्याला वर्षभर घरी राहण्याची मोकळीक असावी आणि त्याने घरी राहून आपल्या विवाहित पत्नीला आनंदित करावे.
- अनुवाद २४:६सुमारे इ.स.पू. १४५१
तुम्ही एखाद्या मनुष्याला काही उसने देता—तेव्हा जाते किंवा जात्याची तळी गहाण म्हणून ठेवून घेऊ नये—कारण अशी वस्तू गहाण ठेवणे म्हणजे त्या मनुष्याचे जीवितच गहाण ठेवणे होय.
- अनुवाद २४:७सुमारे इ.स.पू. १४५१
जर एखाद्याने आपल्याच इस्राएली बांधवाचे अपहरण केले आणि त्याला एखाद्या गुलामाप्रमाणे वागविले किंवा तो विकून टाकताना त्याला धरण्यात आले, तर अपहरण करणार्याला अवश्य जिवे मारावे. अशा रीतीने तुमच्यातील दुष्कर्म तुम्ही दूर करावे.
- अनुवाद २४:८सुमारे इ.स.पू. १४५१
कुष्ठरोगाच्या बाबतीत लेवी याजकाने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वागण्याची काळजी घ्या. मी त्यांना दिलेल्या आज्ञा तुम्ही काळजीपूर्वक पाळा.
- अनुवाद २४:९सुमारे इ.स.पू. १४५१
इजिप्तमधून येताना याहवेह तुमच्या परमेश्वराने मिर्यामचे काय केले, याची तुम्ही आठवण ठेवावी.
- अनुवाद २४:१०सुमारे इ.स.पू. १४५१
जेव्हा तुम्ही आपल्या शेजार्याला काही उसने देता, तर तारण घेण्यासाठी तुम्ही त्याच्या घरात शिरू नये,
- अनुवाद २४:११सुमारे इ.स.पू. १४५१
तुम्ही बाहेर उभे राहावे आणि ज्या शेजार्याला तुम्ही कर्ज देत आहात त्याने तुम्हाला बाहेर तारण आणून द्यावे.
- अनुवाद २४:१२सुमारे इ.स.पू. १४५१
जर शेजारी गरीब असेल, तर तुम्ही त्याने तारण म्हणून दिलेले पांघरूण अंगावर घेऊन झोपू नका.
- अनुवाद २४:१३सुमारे इ.स.पू. १४५१
गहाणादाखल त्याने आपले पांघरूण दिले असेल व तर सूर्यास्तसमयी ते त्याला परत करावे म्हणजे ते पांघरूण अंगावर घेऊन तो झोपेल. तो तुमचे आभार मानेल आणि याहवेह तुमच्या परमेश्वराच्या दृष्टीने तुमचे हे कृत्य नीतिमत्व असे ठरेल.
- अनुवाद २४:१४सुमारे इ.स.पू. १४५१
गरीब व गरजवंत मजुराचा तुम्ही गैरफायदा घेऊ नये, मग तो तुमचा इस्राएली बांधव असो किंवा तुमच्या गावात राहणारा परदेशी असो.
- अनुवाद २४:१५सुमारे इ.स.पू. १४५१
त्यांना दररोज सूर्य मावळण्यापूर्वीच त्यांची मजुरी द्यावी, कारण ते गरीब आहेत आणि ते त्या मजुरीवर अवलंबून आहेत. नाहीतर ते तुमच्याविरुद्ध याहवेहकडे गार्हाणे करतील व मग ते तुमच्याविरुद्ध पाप असे मोजण्यात येईल.
- अनुवाद २४:१६सुमारे इ.स.पू. १४५१
आईवडिलांना त्यांच्या मुलांच्या कारणामुळे जिवे मारू नये, तसेच आईवडिलांच्या कारणामुळे त्यांच्या मुलांना जिवे मारू नये. प्रत्येकजण स्वतःच्या पापासाठी मरतील.
- अनुवाद २४:१७सुमारे इ.स.पू. १४५१
परदेशी आणि अनाथांना यथायोग्य न्याय दिला पाहिजे, किंवा विधवेची वस्त्रे गहाण म्हणून कधीही घेतली जाऊ नये.
- अनुवाद २४:१८सुमारे इ.स.पू. १४५१
तुम्ही इजिप्त देशात गुलाम होता आणि याहवेह तुमच्या परमेश्वराने त्यातून तुमची सुटका केली, याची तुम्ही सतत आठवण ठेवावी. म्हणूनच मी तुम्हाला हे करण्याची आज्ञा देत आहे.
- अनुवाद २४:१९सुमारे इ.स.पू. १४५१
पिकांची कापणी करीत असताना तुम्ही बांधून ठेवलेली एखादी पेंढी शेतातून आणावयाचे विसरलात, तर ती आणण्यासाठी तुम्ही माघारी जाऊ नये, तर परदेशी, अनाथ व विधवा यांच्यासाठी ती तिथेच राहू द्यावी, म्हणजे याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्या हाताच्या सर्व कार्यात आशीर्वाद देतील.
- अनुवाद २४:२०सुमारे इ.स.पू. १४५१
तुम्ही तुमच्या जैतून वृक्षांवरील फळे काढण्याकरिता झोडपणी कराल, तेव्हा तुम्ही एकाच फांदीवर दोनदा प्रहार करू नये. त्या फांदीवर जी काही फळे राहतील ती परदेशी, अनाथ व विधवा यांच्यासाठी राहू द्यावी.
- अनुवाद २४:२१सुमारे इ.स.पू. १४५१
जेव्हा तुम्ही तुमच्या द्राक्षमळ्यातील द्राक्षे काढता तेव्हा परत वेलींवर जाऊ नका. तर राहिलेली द्राक्षे परदेशी, अनाथ व विधवा यांच्यासाठी तशीच राहू द्यावीत.
- अनुवाद २४:२२सुमारे इ.स.पू. १४५१
इजिप्त देशामध्ये तुम्ही गुलाम होता याची आठवण ठेवावी म्हणून मी तुम्हाला हे करण्याची आज्ञा देत आहे.
- अनुवाद २५:१सुमारे इ.स.पू. १४५१
लोकांमध्ये वाद उपस्थिती झाला आणि न्याय मागण्यासाठी त्यांनी न्यायालयात जावे व न्यायाधीशाने त्यांचा निवाडा करावा. जो निर्दोष असेल त्याला निर्दोषी ठरवावे व जो दोषी असेल त्याला दोषी ठरवावे.
- अनुवाद २५:२सुमारे इ.स.पू. १४५१
दोषी मनुष्य जर फटक्यांच्या शिक्षेस पात्र ठरला, तर न्यायाधीशाने त्याला पालथे पाडावे आणि आपल्यादेखत त्याच्या अपराधाप्रमाणे मोजून फटके मारावेत,
- अनुवाद २५:३सुमारे इ.स.पू. १४५१
परंतु न्यायाधीशाने त्याला चाळीस पर्यंतच फटके मारावेत, अधिक फटके मारू नयेत. नाहीतर, अधिक फटके मारल्यास, तुमच्या बंधूंची तुमच्यादेखत अप्रतिष्ठा होईल.
- अनुवाद २५:४सुमारे इ.स.पू. १४५१
बैल धान्याची मळणी करीत असताना त्याला मुसके बांधू नको.
- अनुवाद २५:५सुमारे इ.स.पू. १४५१
भाऊ एकत्र राहत असतील व त्यातील एकजण निपुत्र मरण पावला, तर त्याच्या विधवेने कुटुंबाबाहेर परक्याशी विवाह करू नये. तिच्या पतीच्या भावाने तिच्याशी विवाह करावा आणि तिचा स्वीकार करावा आणि तिच्याप्रती दिराचे कर्तव्य पूर्ण करावे.
- अनुवाद २५:६सुमारे इ.स.पू. १४५१
तिला जन्मलेल्या पहिल्या पुत्राला मृत भावाचे नाव द्यावे, जेणेकरून त्याचे नाव इस्राएलमधून पुसले जाणार नाही.
- अनुवाद २५:७सुमारे इ.स.पू. १४५१
परंतु याबाबतीत मृत माणसाच्या भावाने त्याच्या मृत भावाच्या विधवेशी विवाह करण्यास नकार दिला, तर तिने त्या नगराच्या वेशीवर वडीलजनांकडे जाऊन त्यांना म्हणावे, “माझ्या पतीचा भाऊ आपल्या भावाचे नाव इस्राएलात पुढे चालविण्यास तयार नाही. माझ्याप्रति तो आपले दिराचे कर्तव्य पार पाडणार नाही.”