मुख्य मजकुरावर जा

circa 1446–1406 BC

The Wilderness Years

Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.

2,247 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. अनुवाद २५:८सुमारे इ.स.पू. १४५१

    तेव्हा त्याच्या नगरातील वडीलजनांनी त्याला बोलावून घ्यावे आणि त्याच्याशी बोलणी करावी. “मला त्या बाईशी लग्न करावयाचे नाही,” असे जर तो हट्टीपणाने म्हणाला.

  2. अनुवाद २५:९सुमारे इ.स.पू. १४५१

    तर त्या विधवेने सर्व वडीलजनासमोर त्याच्याकडे जावे, त्याच्या पायातील पायतण काढून घ्यावे आणि त्याच्या तोंडावर थुंकून म्हणावे, “जो मनुष्य आपल्या भावाचे घर चालविण्यास नकार देतो, त्याची अशीच गत होते.”

  3. अनुवाद २५:१०सुमारे इ.स.पू. १४५१

    त्याच्या घराण्याचा उल्लेख इस्राएलातील पायतण काढलेल्या पुरुषाचे घराणे असा केला जाईल.

  4. अनुवाद २५:११सुमारे इ.स.पू. १४५१

    समजा दोन पुरुष एकमेकात मारामारी करीत असताना त्या दोघांपैकी एकाची पत्नी आपल्या पतीला मदत करण्यासाठी येते आणि दुसर्‍या मनुष्याचे वृषण पकडते,

  5. अनुवाद २५:१२सुमारे इ.स.पू. १४५१

    तर काहीही दयामाया न दाखविता तुम्ही तिचा हात कापून टाकावा.

  6. अनुवाद २५:१३सुमारे इ.स.पू. १४५१

    तुमच्या झोळीत तुम्ही वेगवेगळी वजने ठेऊ नये—एक जड व एक हलके.

  7. अनुवाद २५:१४सुमारे इ.स.पू. १४५१

    तुमच्या घरात दोन वेगवेगळी मापे वापरू नये—एक मोठे व एक लहान.

  8. अनुवाद २५:१५सुमारे इ.स.पू. १४५१

    तुम्ही तुमच्याजवळ तंतोतंत आणि प्रामाणिक वजने आणि मापे बाळगावी, म्हणजे याहवेह तुमचे परमेश्वर जो देश तुम्हाला देणार आहे, त्या देशात तुम्हाला दीर्घायुष्य लाभेल.

  9. अनुवाद २५:१६सुमारे इ.स.पू. १४५१

    कारण याहवेह तुमचे परमेश्वर या गोष्टी अप्रामाणिकपणे करणार्‍यांचा तिरस्कार करतात.

  10. अनुवाद २५:१७सुमारे इ.स.पू. १४५१

    तुम्ही इजिप्त देशातून बाहेर आल्यानंतर अमालेक लोक तुमच्याशी कसे वागले, हे स्मरण ठेवा.

  11. अनुवाद २५:१८सुमारे इ.स.पू. १४५१

    जेव्हा तुम्ही दुर्बल व थकलेले होता, तेव्हा त्यांनी तुम्हाला मार्गात गाठले आणि मागे राहिलेल्यांवर हल्ला केला; त्यांना परमेश्वराचे भय नव्हते.

  12. अनुवाद २५:१९सुमारे इ.स.पू. १४५१

    जेव्हा वतन म्हणून देणार्‍या देशातील तुमच्या सर्व शत्रूपासून याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला विश्रांती देतील, तेव्हा तुम्ही या अमालेक लोकांचे नाव पृथ्वीवरून पूर्णपणे नामशेष केले पाहिजे. हे तुम्ही कधीही विसरू नये!

  13. अनुवाद २६:१सुमारे इ.स.पू. १४५१

    जेव्हा तुम्ही याहवेह तुमचे परमेश्वराने वतन दिलेल्या देशात प्रवेश कराल, तो जिंकून त्याचा ताबा घ्याल आणि तिथे वस्ती कराल,

  14. अनुवाद २६:२सुमारे इ.स.पू. १४५१

    तेव्हा याहवेह तुमच्या परमेश्वराने दिलेल्या भूमीतील प्रत्येक पिकाचे प्रथम उत्पन्न एका टोपलीत आणावे. नंतर याहवेह तुमचे परमेश्वर आपल्या नावासाठी जे वसतिस्थान निवडून देतील त्या ठिकाणी तुम्ही जावे

  15. अनुवाद २६:३सुमारे इ.स.पू. १४५१

    आणि त्यावेळी सेवा करीत असलेल्या याजकास म्हणा, “याहवेह तुमच्या परमेश्वराला आज मी जाहीर करतो, की आमच्या पूर्वजांना वचन देऊ केलेल्या देशात मी आलो आहे.”

  16. अनुवाद २६:४सुमारे इ.स.पू. १४५१

    मग याजक ती टोपली तुमच्या हातून घेऊन याहवेह तुमच्या परमेश्वराच्या वेदीपुढे ठेवेल.

  17. अनुवाद २६:५सुमारे इ.स.पू. १४५१

    नंतर तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर म्हणावेः “आमचे पूर्वज अरामी, हे निर्वासित होऊन आश्रयासाठी इजिप्त देशास गेले. ते संख्येने अगदी थोडे होते, पण इजिप्त देशात ते एक विशाल, बलाढ्य आणि थोर राष्ट्र बनले.

  18. अनुवाद २६:६सुमारे इ.स.पू. १४५१

    इजिप्त देशातील लोकांनी आम्हाला वाईट रीतीने वागविले, आमच्यावर जुलूम केला व कठोर परिश्रम लादले

  19. अनुवाद २६:७सुमारे इ.स.पू. १४५१

    तेव्हा आम्ही याहवेहचा, आमच्या पूर्वजांच्या परमेश्वराचा धावा केला आणि याहवेहने आमचे गार्‍हाणे ऐकले, आमच्या अडचणी जाणल्या आणि आमच्यावर होत असलेला जुलूम व अत्याचार त्यांनी पाहिला.

  20. अनुवाद २६:८सुमारे इ.स.पू. १४५१

    मग याहवेहने महान चमत्कारांनी, सामर्थ्यशाली बाहुबलाने व पसरलेल्या हातांनी आणि भयावह चिन्ह व चमत्कार करून आम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले.

  21. अनुवाद २६:९सुमारे इ.स.पू. १४५१

    त्यांनी आम्हाला या ठिकाणी आणले आणि दुधामधाचे प्रवाह वाहत असलेला हा देश आम्हाला दिला;

  22. अनुवाद २६:१०सुमारे इ.स.पू. १४५१

    आता, हे याहवेह परमेश्वरा, तुम्ही जी भूमी आम्हाला दिली आहे, त्यात उगविलेल्या धान्याचे प्रथम उत्पन्न आम्ही आणले आहे.” नंतर ते अर्पण तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरापुढे ठेवावे व त्यांची उपासना करावी.

  23. अनुवाद २६:११सुमारे इ.स.पू. १४५१

    त्यानंतर याहवेह तुमच्या परमेश्वराने ज्या सर्व चांगल्या गोष्टी तुम्हाला दिल्या, त्याबद्दल तुम्ही, लेवी व परदेशी लोक या सर्वांनी मिळून आनंदोत्सव साजरा करावा.

  24. अनुवाद २६:१२सुमारे इ.स.पू. १४५१

    तुम्ही तुमच्या सर्व उत्पन्नाचा दशांश तिसर्‍या वर्षी, म्हणजे दशांशाच्या वर्षी लेवी वंशजांना, परदेशी लोकांना, अनाथांना आणि विधवांना द्यावा, म्हणजे तुमच्या नगरात ते खाऊन तृप्त होतील.

  25. अनुवाद २६:१३सुमारे इ.स.पू. १४५१

    मग तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर सांगावे, “मी माझ्या घरातून पवित्र हिस्सा काढला आहे. लेवी वंशजांना, परदेशीयांना, अनाथांना आणि विधवांना तुमच्या आज्ञेप्रमाणे दिला आहे. मी कोणतीही आज्ञा मोडली नाही किंवा तुमचा कोणताही नियम विसरलो नाही.