मुख्य मजकुरावर जा

circa 1446–1406 BC

The Wilderness Years

Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.

2,247 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. अनुवाद २६:१४सुमारे इ.स.पू. १४५१

    मी विलाप करीत असताना त्या पवित्र वाट्यातील काहीही खाल्ले नाही, धार्मिक संस्कारांच्या दृष्टीने अशुद्ध असताना ते घराच्या बाहेर नेले नाही किंवा एखाद्या मृत व्यक्तीला अर्पण केले नाही. हे माझ्या याहवेह परमेश्वरा, मी तुमचे आज्ञापालन केले आहे. तुम्ही सांगितलेले सर्वकाही मी केले आहे.

  2. अनुवाद २६:१५सुमारे इ.स.पू. १४५१

    म्हणून हे परमेश्वरा, स्वर्गातील तुमच्या पवित्र निवासस्थानातून तुम्ही खाली पाहा आणि आमच्या पूर्वजांना वचन दिल्याप्रमाणे जो दुधामधाचे प्रवाह वाहणारा असा देश तुम्ही आम्हाला दिला आहे त्याला व आम्हा इस्राएली लोकांना आशीर्वादित करा.”

  3. अनुवाद २६:१६सुमारे इ.स.पू. १४५१

    आज याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला ज्या आज्ञा आणि विधी देत आहेत, त्या आज्ञा व विधी यांचे तुम्ही पूर्ण मनाने व पूर्ण जिवाने पालन करावे;

  4. अनुवाद २६:१७सुमारे इ.स.पू. १४५१

    कारण ते याहवेह तुमचे परमेश्वर आहेत, असे तुम्ही आज जाहीरपणे मान्य केले आहे; त्यांचे नियम आणि विधी पाळण्याचे आणि ते जे काही सांगतील ते करण्याचे तुम्ही वचन दिले आहे.

  5. अनुवाद २६:१८सुमारे इ.स.पू. १४५१

    आणि याहवेहनेही वचन दिल्याप्रमाणे स्वतःचे लोक व त्यांचा मोलवान ठेवा म्हणून त्यांनी आज तुमचा स्वीकार केला आहे व तुम्ही त्यांच्या सर्व आज्ञा अवश्य पाळाव्या.

  6. अनुवाद २६:१९सुमारे इ.स.पू. १४५१

    ते तुम्हाला इतर कोणत्याही राष्ट्रापेक्षा थोर करतील आणि तुम्हाला प्रशंसा, किर्ती व सन्मान प्राप्त होतील आणि त्यांनी वचन दिल्यानुसार तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराचे पवित्र लोक व्हाल.

  7. अनुवाद २७:१सुमारे इ.स.पू. १४५१

    नंतर मोशे व इस्राएलांच्या वडीलजनांनी लोकांना आज्ञापिले: “ज्या आज्ञा आज मी तुम्हाला सांगत आहे त्या तुम्ही पाळाव्या.

  8. अनुवाद २७:२सुमारे इ.स.पू. १४५१

    जेव्हा तुम्ही यार्देन नदी पार करून याहवेह तुमच्या परमेश्वराने दिलेल्या वचनदत्त देशात जाल, तेव्हा काही मोठे धोंडे घेऊन त्यावर चुन्याचा लेप लावून स्थापित करावे.

  9. अनुवाद २७:३सुमारे इ.स.पू. १४५१

    त्यावर या नियमशास्त्राचे सर्व शब्द लिहून काढावे जेव्हा तुम्ही यार्देन नदी पार करून याहवेह तुमचे परमेश्वर देत असलेल्या वचनदत्त देशात जाल म्हणजे दुधामधाचे प्रवाह वाहणार्‍या अशा देशात जाल, जसे याहवेह तुमच्या पूर्वजांच्या परमेश्वराने तुम्हाला वचन दिले होते.

  10. अनुवाद २७:४सुमारे इ.स.पू. १४५१

    आणि जेव्हा तुम्ही यार्देन नदी पार करून याहवेह तुमच्या परमेश्वराने दिलेल्या वचनदत्त देशात जाल, तेव्हा हे धोंडे एबाल डोंगरावर स्थापित करावे, जसे मी आज तुम्हाला आज्ञा करीत आहे आणि त्यावर चुन्याचा लेप लावावा.

  11. अनुवाद २७:५सुमारे इ.स.पू. १४५१

    याहवेह तुमच्या परमेश्वरासाठी तुम्ही तिथे एक वेदी बांधावी, धोंड्यांची वेदी बांधावी. त्यावर कोणतेही लोखंडी अवजार वापरू नये.

  12. अनुवाद २७:६सुमारे इ.स.पू. १४५१

    याहवेह तुमच्या परमेश्वरासाठी तुम्ही तिथे न घडविलेल्या धोंड्यांची एक वेदी बांधावी आणि मग त्या वेदीवर याहवेह तुमच्या परमेश्वराला होमार्पणे अर्पावी.

  13. अनुवाद २७:७सुमारे इ.स.पू. १४५१

    तसेच शांत्यर्पणही त्याच वेदीवर करून याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर मोठ्या आनंदाने भोजन करावे.

  14. अनुवाद २७:८सुमारे इ.स.पू. १४५१

    या धोंड्यावर नियमशास्त्राचा प्रत्येक शब्द स्पष्टपणे लिहून काढावा.”

  15. अनुवाद २७:९सुमारे इ.स.पू. १४५१

    नंतर मोशे व लेवीय याजकांनी सर्व इस्राएली लोकांना म्हटले, “अहो इस्राएली लोकांनो, शांत व्हा व ऐका! आता तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराचे लोक झाला आहात.

  16. अनुवाद २७:१०सुमारे इ.स.पू. १४५१

    याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञेचे पालन करा आणि त्यांच्या ज्या आज्ञा आणि विधी आज मी तुम्हाला देत आहे, ते सर्व तुम्ही पाळावे.”

  17. अनुवाद २७:११सुमारे इ.स.पू. १४५१

    त्याच दिवशी मोशेने लोकांना आज्ञापिले:

  18. अनुवाद २७:१२सुमारे इ.स.पू. १४५१

    तुम्ही यार्देन नदी पार करून जाल, तेव्हा शिमओन, लेवी, यहूदाह, इस्साखार, योसेफ व बिन्यामीनच्या गोत्रांनी लोकांना आशीर्वाद देण्यासाठी गरिज्जीम पर्वतावर उभे राहावे.

  19. अनुवाद २७:१३सुमारे इ.स.पू. १४५१

    आणि रऊबेन, गाद, आशेर, जबुलून, दान आणि नफताली यांच्या गोत्रांनी शापवचने उच्चारण्यासाठी एबाल डोंगरावर उभे राहावे.

  20. अनुवाद २७:१४सुमारे इ.स.पू. १४५१

    तेव्हा लेव्यांनी सर्व इस्राएली लोकांना पुढीलप्रमाणे मोठ्याने म्हणावे:

  21. अनुवाद २७:१५सुमारे इ.स.पू. १४५१

    “जो याहवेहला घृणास्पद अशी मूर्ती कुशल कारागिरांच्या हातांनी घडवितो आणि ती गुप्तपणे ठेवतो तो शापित आहे.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.

  22. अनुवाद २७:१६सुमारे इ.स.पू. १४५१

    “जो कोणी आपल्या पित्याचा अथवा मातेचा अनादर करतो, तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.

  23. अनुवाद २७:१७सुमारे इ.स.पू. १४५१

    “जो कोणी आपल्या शेजार्‍याच्या सीमेची धोंड बदलतो, तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.

  24. अनुवाद २७:१८सुमारे इ.स.पू. १४५१

    “जो कोणी आंधळ्याची वाट चुकवितो तो शापित होय!” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.

  25. अनुवाद २७:१९सुमारे इ.स.पू. १४५१

    “जो कोणी परदेशी, अनाथ आणि विधवा यांचा न्याय विपरीत करतो तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.