मुख्य मजकुरावर जा

circa 1446–1406 BC

The Wilderness Years

Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.

2,247 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. अनुवाद २७:२०सुमारे इ.स.पू. १४५१

    “जो कोणी आपल्या पित्याच्या पत्नीबरोबर समागम करतो, तो शापित होय, कारण त्याने त्याच्या पित्याचे अंथरूण अपमानित केले आहे.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.

  2. अनुवाद २७:२१सुमारे इ.स.पू. १४५१

    “जो कोणी एखाद्या पशूबरोबर समागम करतो, तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.

  3. अनुवाद २७:२२सुमारे इ.स.पू. १४५१

    “जो कोणी आपल्या बहिणीबरोबर, त्याच्या पित्याच्या कन्येबरोबर किंवा आपल्या मातेच्या कन्येबरोबर समागम करतो, तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.

  4. अनुवाद २७:२३सुमारे इ.स.पू. १४५१

    “जो कोणी आपल्या सासूबरोबर समागम करतो, तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.

  5. अनुवाद २७:२४सुमारे इ.स.पू. १४५१

    “जो कोणी आपल्या शेजार्‍याला गुप्तपणे ठार मारतो, तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.

  6. अनुवाद २७:२५सुमारे इ.स.पू. १४५१

    “जो कोणी एखाद्या निरपराधी मनुष्याला जिवे मारण्यासाठी लाच घेतो, तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.

  7. अनुवाद २७:२६सुमारे इ.स.पू. १४५१

    “जो कोणी या नियमशास्त्राचे शब्द अमान्य करून ते आचरणात आणत नाही, तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.

  8. अनुवाद २८:१सुमारे इ.स.पू. १४५१

    याहवेह तुमच्या परमेश्वराच्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुम्हाला देत आहे, त्या सर्व तुम्ही पाळल्या, तर याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा श्रेष्ठ असे राष्ट्र करतील.

  9. अनुवाद २८:२सुमारे इ.स.पू. १४५१

    जर तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञा पाळाल तर हे सर्व आशीर्वाद तुम्हावर येतील व तुमच्यासह असतील:

  10. अनुवाद २८:३सुमारे इ.स.पू. १४५१

    तुम्ही नगरात आणि शेतात आशीर्वादित व्हाल.

  11. अनुवाद २८:४सुमारे इ.स.पू. १४५१

    तुमची संतती, तुमच्या भूमीतील पिके आणि तुमच्या गुरांचे वत्स, तुमच्या कळपातील वासरे व कोकरे आशीर्वादित होतील.

  12. अनुवाद २८:५सुमारे इ.स.पू. १४५१

    तुमच्या टोपल्या व तुमची पीठ मळण्याची परात आशीर्वादित होतील.

  13. अनुवाद २८:६सुमारे इ.स.पू. १४५१

    तुम्ही बाहेर जाल तेव्हा व तुम्ही आत याल तेव्हा आशीर्वादित व्हाल.

  14. अनुवाद २८:७सुमारे इ.स.पू. १४५१

    तुमचे शत्रू जेव्हा तुम्हावर हल्ला करतील, तेव्हा याहवेह त्यांचा तुमच्यासमोर पराजय करतील. ते एका दिशेकडून तुमच्यावर चालून येतील, परंतु सात दिशांना पळून जातील.

  15. अनुवाद २८:८सुमारे इ.स.पू. १४५१

    याहवेह तुमच्या धान्याची कोठारे आणि जे काही तुम्ही हाती घ्याल त्यास आशीर्वादित करतील, याहवेह तुमचे परमेश्वर देत असलेल्या देशात तुम्ही जाल तिथे ते तुमची भरभराट करतील.

  16. अनुवाद २८:९सुमारे इ.स.पू. १४५१

    तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञा पाळल्या व त्यांच्या मार्गात चालला तर ते तुम्हाला त्यांच्या शपथेनुसार, त्यांचे पवित्र लोक म्हणून प्रतिष्ठित करतील.

  17. अनुवाद २८:१०सुमारे इ.स.पू. १४५१

    मग पृथ्वीवरील सर्व लोक पाहतील की तुम्हाला याहवेहच्या नावाने संबोधित करण्यात येते, ती तुम्हाला भिऊ लागतील.

  18. अनुवाद २८:११सुमारे इ.स.पू. १४५१

    याहवेह तुम्हाला अत्यंत संपन्न करतील—तुमची संतती, तुमच्या गुरांची पिल्ले आणि तुमच्या भूमीतील उपज—जसे त्यांनी तुमच्या पूर्वजांना वचन दिले होते.

  19. अनुवाद २८:१२सुमारे इ.स.पू. १४५१

    प्रत्येक ॠतूत उत्तम पिके मिळावीत यासाठी याहवेह त्यांच्या आकाशातील अद्भुत असे पावसाचे भांडार तुम्हासाठी उघडतील व तुम्ही हाती घ्याल ती प्रत्येक गोष्ट ते आशीर्वादित करतील. अनेक राष्ट्रांना तुम्ही उसने द्याल, पण तुम्हाला उसने कधीही घ्यावे लागणार नाही.

  20. अनुवाद २८:१३सुमारे इ.स.पू. १४५१

    याहवेह तुम्हाला मस्तक करतील, शेपूट नव्हे. मी तुम्हाला आज देत असलेल्या याहवेह तुमच्या परमेश्वराच्या सर्व आज्ञा जर तुम्ही प्रामाणिकपणे पाळल्या, तर तुम्ही सतत उच्चस्थानी राहाल व कधीही खाली राहणार नाही.

  21. अनुवाद २८:१४सुमारे इ.स.पू. १४५१

    आज मी देत असलेल्या आज्ञांपासून तुम्ही परावृत्त होऊ नका, उजवीकडे किंवा डावीकडे वळू नका, इतर दैवतांचे अनुसरण करू नका आणि त्यांची उपासनाही करू नका.

  22. अनुवाद २८:१५सुमारे इ.स.पू. १४५१

    परंतु याहवेह तुमच्या परमेश्वराचे तुम्ही ऐकले नाही व त्यांच्या सर्व आज्ञा व विधी ज्या मी तुम्हाला आज देत आहे त्यांचे तुम्ही काळजीपूर्वक पालन केले नाही, तर हे सर्व शाप तुम्हावर येतील आणि तुम्हाला येऊन गाठतील:

  23. अनुवाद २८:१६सुमारे इ.स.पू. १४५१

    तुम्ही नगरात शापित व्हाल व शेतात शापित व्हाल.

  24. अनुवाद २८:१७सुमारे इ.स.पू. १४५१

    तुमच्या टोपल्या व तुमचे पीठ मळण्याचे परात शापित होईल.

  25. अनुवाद २८:१८सुमारे इ.स.पू. १४५१

    तुमच्या पोटचे फळ आणि तुमच्या भूमीतील पिके आणि तुमच्या गुरांचे वत्स आणि तुमच्या कळपातील वासरे शापित होतील.