circa 6 BC – AD 30
The Life of Jesus
The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.
या कालखंडातील वचने
- मार्क ८:२०सुमारे इ.स. ३२
“आणि सात भाकरींनी चार हजारांना जेवू घातले, तेव्हा तुम्ही उरलेल्या तुकड्यांच्या किती टोपल्या उचलल्या?” “सात,” त्यांनी उत्तर दिले.
- मार्क ८:२१सुमारे इ.स. ३२
येशूंनी त्यांना विचारले, “अजूनही तुम्हाला समजत नाही का?”
- मार्क ८:२२सुमारे इ.स. ३२
ते बेथसैदा येथे आले, तेव्हा काही लोकांनी एका आंधळ्या मनुष्याला त्यांच्याकडे आणले आणि येशूंनी त्याला स्पर्श करावा अशी विनंती केली.
- मार्क ८:२३सुमारे इ.स. ३२
येशूंनी त्या आंधळ्या मनुष्याला हाताशी धरून गावाबाहेर नेले. त्याच्या डोळ्यांमध्ये थुंकल्यावर व त्याच्यावर हात ठेवल्यावर, येशूंनी त्याला विचारले, “आता तुला काही दिसते का?”
- मार्क ८:२४सुमारे इ.स. ३२
तो वर दृष्टी करून म्हणाला, “मला माणसे दिसत आहेत; ती झाडांसारखी, इकडे तिकडे चालताना दिसतात.”
- मार्क ८:२५सुमारे इ.स. ३२
तेव्हा येशूंनी पुनः आपले हात त्याच्या डोळ्यांवर ठेवले. तेव्हा त्याचे डोळे उघडले, त्याला दृष्टी प्राप्त झाली व त्याला सर्वकाही स्पष्ट दिसू लागले.
- मार्क ८:२६सुमारे इ.स. ३२
“या गावात जाऊ नकोस,” येशूंनी अशी ताकीद देऊन त्याला त्याच्या घरी पाठविले.
- मार्क ८:२७सुमारे इ.स. ३२
येशू आणि त्यांचे शिष्य कैसरीया फिलिप्पाच्या गावात गेले. वाटेत असताना त्यांनी आपल्या शिष्यांना विचारले, “मी कोण आहे असे लोक म्हणतात?”
- मार्क ८:२८सुमारे इ.स. ३२
त्यांनी उत्तर दिले, “काही म्हणतात बाप्तिस्मा करणारा योहान; काही एलीयाह; तर आणखी काही संदेष्ट्यांपैकी एक असे म्हणतात.”
- मार्क ८:२९सुमारे इ.स. ३२
“परंतु तुमचे मत काय?” त्यांनी विचारले, “मी कोण आहे, असे तुम्ही म्हणता?” पेत्राने उत्तर दिले, “तुम्ही ख्रिस्त आहात.”
- मार्क ८:३०सुमारे इ.स. ३२
“ही गोष्ट कोणालाही सांगू नका.” असे येशूंनी त्यांना निक्षून सांगितले.
- मार्क ८:३१सुमारे इ.स. ३२
यानंतर येशू त्यांना शिकवू लागले की, मानवपुत्राने पुष्कळ दुःखे सहन करावी, वडील व मुख्य याजक, नियमशास्त्राचे शिक्षक यांच्याकडून नाकारले जावे व जिवे मारले जावे आणि तिसर्या दिवशी पुन्हा जिवंत होणे याचे अगत्य आहे.
- मार्क ८:३२सुमारे इ.स. ३२
ते या गोष्टीविषयी त्यांच्याशी अगदी मनमोकळेपणाने बोलले आणि पेत्र त्यांना बाजूला घेऊन त्यांचा निषेध करू लागला.
- मार्क ८:३३सुमारे इ.स. ३२
येशूंनी वळून आपल्या शिष्यांकडे पाहिले आणि मग पेत्राला ते धमकावून म्हणाले, “अरे सैताना, माझ्या दृष्टिआड हो. तुझे मन परमेश्वराच्या गोष्टींकडे नाही, परंतु केवळ मनुष्याच्या गोष्टींकडे आहे.”
- मार्क ८:३४सुमारे इ.स. ३२
नंतर शिष्यांना आणि जमावाला त्यांनी जवळ बोलाविले आणि म्हणाले: “जर कोणी माझा शिष्य होऊ पाहतो तर त्याने स्वतःस नाकारावे, त्याचा क्रूसखांब उचलावा आणि माझ्यामागे यावे.
- मार्क ८:३५सुमारे इ.स. ३२
कारण जो कोणी आपला जीव स्वतःसाठीच राखून ठेवतो तो आपल्या जीवाला मुकेल, पण जो कोणी माझ्यासाठी आणि शुभवार्तेसाठी आपल्या जीवाला मुकेल, तो त्याचा जीव वाचवेल.
- मार्क ८:३६सुमारे इ.स. ३२
कोणी सारे जग मिळविले आणि आपला आत्मा गमावला तर त्यातून चांगले काय निष्पन्न होणार?
- मार्क ८:३७सुमारे इ.स. ३२
आपल्या आत्म्याच्या मोबदल्यात मनुष्याला दुसरे काही देता येईल का?
- मार्क ८:३८सुमारे इ.स. ३२
ज्या कोणाला या भ्रष्ट व पापी पिढीसमोर माझी व माझ्या वचनाची लाज वाटेल, त्याची मला, मानवपुत्रालाही, त्याच्या पित्याच्या गौरवात व पवित्र देवदूतांच्या समवेत परत येईन तेव्हा लाज वाटेल.”
- मार्क ९:१सुमारे इ.स. ३२
ते त्यांना म्हणाले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो, की येथे उभे असणारे काहीजण असे आहेत की, परमेश्वराचे राज्य सामर्थ्याने आलेले पाहतील तोपर्यंत मरणाचा अनुभव घेणार नाहीत.”
- मार्क ९:२सुमारे इ.स. ३२
सहा दिवसानंतर पेत्र, याकोब आणि योहान या तिघांना बरोबर घेऊन येशू एका उंच डोंगरावर गेले, तिथे ते एकटे असताना त्यांच्यासमोर येशूंचे रूपांतर झाले.
- मार्क ९:३सुमारे इ.स. ३२
त्यांची वस्त्रे इतकी शुभ्र, चमकणारी झाली की जगामध्ये इतर कोणालाही त्यापेक्षा शुभ्र करता येणार नाही.
- मार्क ९:४सुमारे इ.स. ३२
तिथे त्यांच्यासमोर एलीयाह आणि मोशे प्रकट झाले आणि ते येशूंबरोबर संवाद करू लागले.
- मार्क ९:५सुमारे इ.स. ३२
तेव्हा पेत्र येशूंना म्हणाला, “गुरुजी, आपल्याला येथेच राहता आले, तर फार चांगले होईल! आपण या ठिकाणी तीन मंडप उभारू या—एक तुमच्यासाठी, एक मोशेसाठी आणि एक एलीयाहसाठी.”
- मार्क ९:६सुमारे इ.स. ३२
त्याला काय बोलावे हे समजत नव्हते, कारण ते भयभीत झाले होते.