मुख्य मजकुरावर जा

circa 6 BC – AD 30

The Life of Jesus

The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.

3,779 वचने · 4 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मार्क ९:७सुमारे इ.स. ३२

    इतक्यात ढगाने येऊन त्यांच्यावर छाया केली आणि मेघातून एक वाणी ऐकू आली: “हा माझा परमप्रिय पुत्र आहे. याचे तुम्ही ऐका!”

  2. मार्क ९:८सुमारे इ.स. ३२

    मग एकाएकी, जेव्हा त्यांनी आजूबाजूला पाहिले, त्यावेळी येशू व्यतिरिक्त त्यांच्या नजरेस कोणीही पडले नाही.

  3. मार्क ९:९सुमारे इ.स. ३२

    ते डोंगरावरून खाली उतरत असताना, येशूंनी त्यांना आज्ञा केली, तुम्ही जे पाहिले त्याविषयी, मानवपुत्र मरणातून पुन्हा उठेपर्यंत कोणालाही सांगू नका.

  4. मार्क ९:१०सुमारे इ.स. ३२

    म्हणून त्यांनी ही गोष्ट आपसातच ठेवली आणि, “मरणातून पुन्हा उठणे” म्हणजे काय या गोष्टीविषयी ते चर्चा करू लागले.

  5. मार्क ९:११सुमारे इ.स. ३२

    नंतर शिष्यांनी येशूंना विचारले, “एलीयाह प्रथम आला पाहिजे, असे नियमशास्त्राचे शिक्षक का म्हणतात?”

  6. मार्क ९:१२सुमारे इ.स. ३२

    येशूंनी उत्तर दिले, “एलीयाह प्रथम येईल व सर्वकाही व्यवस्थित करेल याची खात्री बाळगा. पण मानवपुत्राने पुष्कळ दुःखे सहन करावीत आणि तुच्छ मानले जावे असे कशाला लिहिले आहे?

  7. मार्क ९:१३सुमारे इ.स. ३२

    पण मी तुम्हाला सांगतो, एलीयाह आलेला आहे आणि त्याच्याविषयी जसे लिहून ठेवले आहे, त्यानुसार त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांनी त्याला वाटेल तसे वागविले आहे.”

  8. मार्क ९:१४सुमारे इ.स. ३२

    जेव्हा ते बाकीच्या शिष्यांकडे आले, तेव्हा त्यांच्याभोवती मोठा समुदाय होता आणि काही नियमशास्त्र शिक्षक त्यांच्याशी वाद घालत आहेत, असे त्यांना दिसले.

  9. मार्क ९:१५सुमारे इ.स. ३२

    येशूंना पाहून सर्व समुदायाला आश्चर्य वाटले आणि त्यांचे अभिवादन करण्यास ते धावत गेले.

  10. मार्क ९:१६सुमारे इ.स. ३२

    येशूंनी विचारले, “तुम्ही त्यांच्याशी कशाविषयी वाद करीत होता?”

  11. मार्क ९:१७सुमारे इ.स. ३२

    गर्दीतील एक मनुष्य उत्तरला, “गुरुजी, मी माझ्या मुलाला तुमच्याकडे घेऊन आलो, त्याला दुरात्म्याने पछाडलेले आहे व त्याने त्याची वाणी हिरावून घेतली आहे;

  12. मार्क ९:१८सुमारे इ.स. ३२

    ज्यावेळी दुरात्मा त्याला ताब्यात घेतो, तेव्हा तो त्याला जमिनीवर आपटतो. त्याच्या तोंडाला फेस येतो, क्रोधाने दात खातो आणि त्याचे शरीर ताठ होते. त्या दुरात्म्याला हाकलून लावण्याची आपल्या शिष्यांना विनंती केली, पण ते करू शकले नाहीत.”

  13. मार्क ९:१९सुमारे इ.स. ३२

    येशूंनी उत्तर दिले, “हे विश्वासहीन पिढी, आणखी किती काळ मी तुमच्याबरोबर राहिले पाहिजे? आणखी किती काळ मी तुमचे सहन करू? मुलाला माझ्याकडे आणा.”

  14. मार्क ९:२०सुमारे इ.स. ३२

    त्याप्रमाणे ते मुलाला घेऊन आले. पण दुरात्म्याने येशूंना पाहिले, तेव्हा त्याने त्या मुलाला झटके आणले आणि तो मुलगा जमिनीवर पडून लोळू लागला व त्याच्या तोंडामधून फेस येऊ लागला.

  15. मार्क ९:२१सुमारे इ.स. ३२

    “हा केव्हापासून असा आहे?” येशूंनी त्याच्या वडिलांना विचारले. वडिलांनी उत्तर दिले, “अगदी बालपणापासून,

  16. मार्क ९:२२सुमारे इ.स. ३२

    त्याने मुलाला अनेकदा जिवे मारण्याकरिता विस्तवात, नाही तर पाण्यात फेकून दिले आहे. परंतु जर तुम्हाला शक्य असेल तर आमच्यावर दया करा आणि आम्हाला मदत करा.”

  17. मार्क ९:२३सुमारे इ.स. ३२

    “जर तुम्हाला शक्य असेल?” येशू म्हणाले, “जो विश्वास ठेवतो त्याला सर्वकाही शक्य आहे.”

  18. मार्क ९:२४सुमारे इ.स. ३२

    मुलाच्या वडिलांनी झटकन उत्तर दिले, “मी विश्वास ठेवतो, माझा अविश्वास दूर करण्यास मला साहाय्य करा!”

  19. मार्क ९:२५सुमारे इ.स. ३२

    हे पाहण्याकरिता लोक धावत तिथे येत आहेत, हे पाहून येशूंनी अशुद्ध आत्म्याला धमकावून म्हटले, “अरे बहिरेपणाच्या व मुकेपणाच्या आत्म्या, या मुलामधून बाहेर येण्याची मी तुला आज्ञा करीत आहे आणि पुन्हा कधीही त्याच्यामध्ये प्रवेश करू नकोस.”

  20. मार्क ९:२६सुमारे इ.स. ३२

    हे ऐकून दुरात्म्याने किंकाळी फोडली व त्याला पिळून बाहेर निघून गेला. मुलगा मेल्यासारखा पडला होता. “तो मरण पावला आहे,” असे लोक म्हणू लागले.

  21. मार्क ९:२७सुमारे इ.स. ३२

    परंतु येशूंनी मुलाचा हात धरून त्याला उभे राहण्यास मदत केली आणि तो उभा राहिला.

  22. मार्क ९:२८सुमारे इ.स. ३२

    नंतर येशू आत गेल्यानंतर, शिष्यांनी खाजगी रीतीने विचारले, “त्याला आम्ही का काढू शकलो नाही?”

  23. मार्क ९:२९सुमारे इ.स. ३२

    त्याने उत्तर दिले, “असा प्रकार फक्त प्रार्थनेद्वारेच निघू शकतो.”

  24. मार्क ९:३०सुमारे इ.स. ३२

    ते ठिकाण सोडल्यानंतर ते गालील प्रांतामधून गेले. येशूंनी आपण कुठे आहोत हे कोणालाही कळू न देण्याचा प्रयत्न केला,

  25. मार्क ९:३१सुमारे इ.स. ३२

    कारण ते आपल्या शिष्यांना शिक्षण देत होते. ते त्यांना म्हणाले, “मानवपुत्राला मनुष्यांच्या हाती धरून दिले जाईल. ते त्याला जिवे मारतील, पण तीन दिवसानंतर तो पुन्हा उठेल.”