मुख्य मजकुरावर जा

circa 6 BC – AD 30

The Life of Jesus

The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.

3,779 वचने · 4 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मार्क ७:३२सुमारे इ.स. ३२

    तिथे काही लोकांनी एका बहिर्‍या आणि बोबड्या अशा मनुष्याला त्यांच्याकडे आणले. येशूंनी त्याच्यावर हात ठेवून त्याला बरे करावे अशी लोकांनी येशूंना विनंती केली.

  2. मार्क ७:३३सुमारे इ.स. ३२

    येशूंनी त्याला गर्दीतून बाजूला नेले. त्याच्या कानात त्यांनी बोटे घातली. नंतर ते थुंकले आणि त्या मनुष्याच्या जिभेला केला.

  3. मार्क ७:३४सुमारे इ.स. ३२

    मग स्वर्गाकडे दृष्टी लावून व एक निःश्वास सोडून ते म्हणाले, “इप्फाता” म्हणजे, “मोकळा हो”

  4. मार्क ७:३५सुमारे इ.स. ३२

    ताबडतोब त्या मनुष्याचे कान उघडले व त्याच्या जिभेचे बंधन मोकळे झाले आणि त्याला स्पष्ट बोलता येऊ लागले.

  5. मार्क ७:३६सुमारे इ.स. ३२

    याविषयी कोणाला सांगू नका, असे येशूंनी निक्षून सांगितले. परंतु ते जसे सांगत गेले तशी ही बातमी अधिकच प्रसिद्ध होत गेली.

  6. मार्क ७:३७सुमारे इ.स. ३२

    लोक कमालीचे आश्चर्यचकित झाले होते. ते म्हणाले, “त्यांनी सर्वकाही उत्कृष्ट केले आहे. ते बहिर्‍यांना ऐकण्यास व मुक्यांना बोलावयास लावतात.”

  7. मार्क ८:१सुमारे इ.स. ३२

    त्या दिवसांमध्ये दुसरा एक मोठा समुदाय जमला आणि त्यांच्याजवळ खाण्यासाठी काही नव्हते. येशूंनी आपल्या शिष्यांना जवळ बोलाविले आणि म्हणाले,

  8. मार्क ८:२सुमारे इ.स. ३२

    “मला या लोकांचा कळवळा येतो, कारण ते तीन दिवसापासून माझ्याबरोबर आहेत आणि त्यांना खावयास काही नाही.

  9. मार्क ८:३सुमारे इ.स. ३२

    मी त्यांना तसेच भुकेले घरी पाठविले तर ते रस्त्यातच बेशुद्ध होऊन पडतील, कारण त्यांच्यापैकी काहीजण खूप लांबून आलेले आहेत.”

  10. मार्क ८:४सुमारे इ.स. ३२

    शिष्यांनी उत्तर दिले, “इतक्या लोकांना पुरेल इतके अन्न या ओसाड रानात कुठून आणावे?”

  11. मार्क ८:५सुमारे इ.स. ३२

    येशूंनी विचारले, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” शिष्यांनी उत्तर दिले, “सात.”

  12. मार्क ८:६सुमारे इ.स. ३२

    त्यांनी जमावाला जमिनीवर बसावयास सांगितले. मग त्यांनी त्या सात भाकरी घेतल्या आणि त्या भाकरीबद्दल परमेश्वराचे आभार मानले, नंतर त्याचे तुकडे करून ते त्यांनी शिष्यांना दिले आणि त्यांनी तसे केले.

  13. मार्क ८:७सुमारे इ.स. ३२

    त्यांच्याजवळ थोडे लहान मासेही होते; त्यावरही येशूंनी आभार मानले आणि लोकांना वाढावयास सांगितले.

  14. मार्क ८:८सुमारे इ.स. ३२

    लोक जेवले व तृप्त झाले. नंतर शिष्यांनी उरलेले तुकडे गोळा केले तेव्हा सात टोपल्या भरल्या.

  15. मार्क ८:९सुमारे इ.स. ३२

    तिथे सुमारे चार हजार लोक उपस्थित होते. त्यांना निरोप दिल्यानंतर,

  16. मार्क ८:१०सुमारे इ.स. ३२

    येशू शिष्यांसह होडीत बसून दल्मनुथा प्रांतात आले.

  17. मार्क ८:११सुमारे इ.स. ३२

    तिथे परूशी लोक आले व त्यांना प्रश्न विचारू लागले. त्यांची परीक्षा पाहण्याकरिता त्यांनी आकाशातून चिन्ह मागितले.

  18. मार्क ८:१२सुमारे इ.स. ३२

    हे ऐकून त्यांनी एक दीर्घ निःश्वास सोडला आणि म्हणाले, “ही पिढी चिन्ह का मागते? खरोखर या पिढीला कोणतेही चिन्ह दिले जाणार नाही.”

  19. मार्क ८:१३सुमारे इ.स. ३२

    नंतर ते त्यांना सोडून निघून गेले व होडीत जाऊन बसले आणि सरोवराच्या पलीकडे गेले.

  20. मार्क ८:१४सुमारे इ.स. ३२

    शिष्य आपल्याबरोबर भाकरी घ्यावयास विसरले होते, त्यांच्याजवळ होडीत मात्र एकच भाकर शिल्लक राहिली होती.

  21. मार्क ८:१५सुमारे इ.स. ३२

    “सावध असा,” येशूंनी त्यांना इशारा दिला, “हेरोद राजा आणि परूशी लोकांच्या खमिरापासून सांभाळा.”

  22. मार्क ८:१६सुमारे इ.स. ३२

    ते एकमेकांबरोबर चर्चा करू लागले आणि म्हणाले, “आपल्याजवळ भाकर नाही,” म्हणून ते असे म्हणत असतील.

  23. मार्क ८:१७सुमारे इ.स. ३२

    परंतु त्यांची चर्चा ऐकून येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही भाकर नाही याबद्दल का बोलता? अजूनही तुम्ही पाहू शकत नाही किंवा समजू शकत नाही का? तुमची हृदये कठीण झाली आहेत का?

  24. मार्क ८:१८सुमारे इ.स. ३२

    तुम्हाला डोळे आहेत तरी पाहू शकत नाही आणि कान आहे पण ऐकू येत नाही का? तुम्हाला आठवत नाही का?

  25. मार्क ८:१९सुमारे इ.स. ३२

    पाच हजारांना पाच भाकरींनी जेवू घातले, त्यावेळी तुम्ही तुकड्यांच्या किती टोपल्या उचलल्या?” “बारा” त्यांनी उत्तर दिले.