मुख्य मजकुरावर जा

circa 6 BC – AD 30

The Life of Jesus

The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.

3,779 वचने · 4 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मार्क ७:७सुमारे इ.स. ३२

    माझी उपासना ते व्यर्थपणे करतात; त्यांची शिकवण केवळ मानवी नियम आहेत.’

  2. मार्क ७:८सुमारे इ.स. ३२

    तुम्ही परमेश्वराने दिलेल्या आज्ञा टाळता आणि मनुष्याच्या परंपरेला चिटकून बसता.”

  3. मार्क ७:९सुमारे इ.स. ३२

    आणि पुढे ते म्हणाले, “तुमच्या रीती पाळण्यासाठी, परमेश्वराच्या आज्ञा टाळण्याचा सुलभ मार्ग तुम्हाला माहीत आहे!

  4. मार्क ७:१०सुमारे इ.स. ३२

    मोशे म्हणाला, ‘तुझ्या आईवडिलांचा मान राख,’ आणि ‘जो कोणी आपल्या वडिलांना किंवा आईला शाप देतो तो मरणदंडास पात्र व्हावा.’

  5. मार्क ७:११सुमारे इ.स. ३२

    परंतु तुम्ही म्हणता, जर कोणी असे घोषित करतो की, आईवडिलांना करत असलेली मदत, ही ‘परमेश्वराला समर्पित’ आहे ते अर्पण आहे—

  6. मार्क ७:१२सुमारे इ.स. ३२

    त्यामुळे तुम्ही त्यांना आईवडिलांसाठी काहीही करण्यास मनाई करता.

  7. मार्क ७:१३सुमारे इ.स. ३२

    या ज्या तुमच्या परंपरा पूर्वजांपासून चालत आलेल्या आहेत, त्यासाठी तुम्ही परमेश्वराचे वचन रद्द करता आणि अशा प्रकारच्या पुष्कळच गोष्टी तुम्ही करता.”

  8. मार्क ७:१४सुमारे इ.स. ३२

    येशूने परत गर्दीतील लोकांना आपल्याकडे बोलाविले आणि म्हटले, “तुम्ही माझे ऐका आणि हे समजून घ्या.

  9. मार्क ७:१५सुमारे इ.स. ३२

    अशी कोणतीच गोष्ट नाही की जी बाहेरून मनुष्यामध्ये प्रवेश करून त्याला अशुद्ध करू शकेल.

  10. मार्क ७:१६सुमारे इ.स. ३२

    वास्तविक मनुष्यामधून जे बाहेर पडते, तेच त्याला अशुद्ध करते. ज्याला ऐकावयास कान आहेत, तो ऐको.”

  11. मार्क ७:१७सुमारे इ.स. ३२

    गर्दीतून निघून घरी गेल्यावर, शिष्यांनी त्यांना दाखल्याचा अर्थ विचारला.

  12. मार्क ७:१८सुमारे इ.स. ३२

    “तुम्ही इतके मतिमंद आहात काय?” त्यांनी विचारले, “जे काही मनुष्यामध्ये बाहेरून शिरते ते त्याला अशुद्ध करू शकत नाही, हे तुम्ही पाहू शकत नाही काय?

  13. मार्क ७:१९सुमारे इ.स. ३२

    ते त्यांच्या हृदयात जात नाही पण पोटात उतरते आणि नंतर शरीरातून बाहेर पडते.” या म्हणण्यावरून सर्व अन्न शुद्ध आहे, असे येशूंनी जाहीर केले.

  14. मार्क ७:२०सुमारे इ.स. ३२

    ते पुढे म्हणाले, “मनुष्यामधून जे बाहेर पडते तेच मनुष्याला अशुद्ध करते.

  15. मार्क ७:२१सुमारे इ.स. ३२

    कारण आतून, मनुष्याच्या हृदयातून, दुष्ट विचार, खून, जारकर्म, व्यभिचार, चोरी, लैंगिक पापे,

  16. मार्क ७:२२सुमारे इ.स. ३२

    बदफैलीपणा, दुष्कृत्ये, फसवेगिरी, कामातुरपणा, मत्सर, निंदा, गर्विष्ठपणा आणि मूर्खपणा

  17. मार्क ७:२३सुमारे इ.स. ३२

    या सर्व अमंगळ गोष्टी आतून निघतात आणि मनुष्याला अशुद्ध करतात.”

  18. मार्क ७:२४सुमारे इ.स. ३२

    नंतर येशूंनी ते स्थान सोडले आणि ते सोर आणि सीदोन या प्रांतात गेले. ते एका घरात गेले आणि हे कोणाला कळू नये अशी त्यांची इच्छा होती; परंतु त्यांची उपस्थिती लपून राहू शकली नाही.

  19. मार्क ७:२५सुमारे इ.स. ३२

    त्यांच्याविषयी ऐकताच, एक स्त्री जिच्या लहान मुलीला अशुद्ध आत्म्याने पछाडले होते, त्यांच्याकडे आली आणि त्यांच्या पाया पडली.

  20. मार्क ७:२६सुमारे इ.स. ३२

    आपल्या कन्येला दुरात्म्याच्या तावडीतून सोडवावे, अशी तिने त्यांच्याजवळ विनंती केली. ती स्त्री ग्रीक असून सुरफुनीकी प्रांतात जन्मली होती.

  21. मार्क ७:२७सुमारे इ.स. ३२

    “प्रथम लेकरांना जेवढे पाहिजे तेवढे खाऊ द्या,” ते म्हणाले, “मुलांची भाकर काढून कुत्र्यांना घालणे बरोबर नाही.”

  22. मार्क ७:२८सुमारे इ.स. ३२

    “प्रभू” तिने प्रत्युत्तर दिले, “मुलांच्या मेजाखाली जे तुकडे पडतात ते कुत्रेही खातात.”

  23. मार्क ७:२९सुमारे इ.स. ३२

    येशूंनी उद्गार काढले, “या उत्तरामुळे तू जाऊ शकतेस; दुरात्म्याने तुझ्या मुलीला सोडले आहे.”

  24. मार्क ७:३०सुमारे इ.स. ३२

    ती घरी आली त्यावेळी तिला तिची मुलगी बाजेवर झोपलेली आढळली आणि दुरात्मा तिच्यामधून निघून गेला होता.

  25. मार्क ७:३१सुमारे इ.स. ३२

    सोर सोडून येशू सीदोन प्रांतामधून गेले आणि तिथून दकापलीस रस्त्याने ते पुन्हा गालील समुद्राकडे आले.