circa 6 BC – AD 30
The Life of Jesus
The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.
या कालखंडातील वचने
- मार्क ६:३८सुमारे इ.स. २८
ते म्हणाले, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत? जा आणि पाहा.” जेव्हा त्यांनी शोधले तेव्हा त्यांना कळले व ते म्हणाले, “पाच भाकरी आणि दोन मासे आहेत.”
- मार्क ६:३९सुमारे इ.स. २८
मग येशूंनी लोकांना गवतावर गटागटाने बसावयास सांगितले.
- मार्क ६:४०सुमारे इ.स. २८
त्याप्रमाणे लोक पन्नास आणि शंभर अशा गटांनी बसले.
- मार्क ६:४१सुमारे इ.स. २८
मग येशूंनी त्या पाच भाकरी व दोन मासे घेतले आणि स्वर्गाकडे पाहून त्याबद्दल आभार मानले आणि मग त्या भाकरीचे तुकडे करून ते शिष्यांजवळ लोकांना वाढण्यासाठी दिले आणि दोन मासळ्यांचेही असेच वाटप केले.
- मार्क ६:४२सुमारे इ.स. २८
ते सर्वजण जेवले आणि तृप्त झाले,
- मार्क ६:४३सुमारे इ.स. २८
आणि शिष्यांनी उरलेले भाकरीचे तुकडे व मासे गोळा केले त्यावेळी बारा टोपल्या उचलल्या.
- मार्क ६:४४सुमारे इ.स. २८
तिथे जेवणार्या पुरुषांची संख्या सुमारे पाच हजार होती.
- मार्क ६:४५सुमारे इ.स. २८
लगेच येशूंनी आपल्या शिष्यांना होडीत बसून पुढे बेथसैदास जाण्यास सांगितले आणि ते स्वतः लोकांना निरोप देण्यासाठी मागे राहिले.
- मार्क ६:४६सुमारे इ.स. २८
त्यांना निरोप दिल्यानंतर, येशू प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर गेले.
- मार्क ६:४७सुमारे इ.स. २८
रात्र झाली, तेव्हा होडी सरोवराच्या मध्यावर गेली होती आणि ते एकटेच जमिनीवर होते.
- मार्क ६:४८सुमारे इ.स. २८
तिथून त्यांनी आपल्या शिष्यांना वल्ही मारणे कठीण जात आहे असे पाहिले, कारण वारा त्यांच्याविरुद्ध दिशेने वाहत होता. पहाटेच्या सुमारास येशू पाण्यावरून चालत त्यांच्याकडे आले. ते त्यांना ओलांडून पुढे जाऊ लागले,
- मार्क ६:४९सुमारे इ.स. २८
परंतु त्यांनी येशूंना सरोवरावरून चालताना पाहिले, तेव्हा ते भूतच असले पाहिजे असे त्यांना वाटले व ते ओरडले,
- मार्क ६:५०सुमारे इ.स. २८
कारण त्या सर्वांनीच त्यांना पाहिले आणि ते फार घाबरले. पण ते त्यांना तत्काळ म्हणाले, “धीर धरा, मीच आहे. भिऊ नका.”
- मार्क ६:५१सुमारे इ.स. २८
मग ते त्यांच्याबरोबर होडीत चढले तेव्हा वादळ शांत झाले. शिष्य आश्चर्याने थक्क झाले.
- मार्क ६:५२सुमारे इ.स. २८
कारण भाकरी संबंधात त्यांना समजले नव्हते आणि त्यांची हृदये कठीण झाली होती.
- मार्क ६:५३सुमारे इ.स. २८
ते पलीकडे गेल्यावर गनेसरेत येथे उतरले व त्यांनी होडी तिथे लावली,
- मार्क ६:५४सुमारे इ.स. २८
ते होडीतून उतरले न उतरले तोच, लोकांनी येशूंना ओळखले;
- मार्क ६:५५सुमारे इ.स. २८
लोक त्या संपूर्ण परिसरात धावत गेले आणि ते जिथे कुठे आहे असे त्यांनी ऐकले तिथे आजारग्रस्त लोकांना अंथरुणावर घालून त्यांच्याकडे घेऊन गेले.
- मार्क ६:५६सुमारे इ.स. २८
आणि जिथे कुठेही येशू गेले—गावात, शहरात—बाजारपेठेत लोक आजार्यांना घेऊन जात आणि तुमच्या झग्याच्या काठाला तरी स्पर्श करू द्या अशी त्यांना विनंती करत आणि जितक्यांनी त्यांना स्पर्श केला तितके सर्व बरे झाले.
- मार्क ७:१सुमारे इ.स. ३२
परूशी आणि यरुशलेम नगरातून आलेले नियमशास्त्राचे काही शिक्षक येशूंच्या भोवती गोळा झाले.
- मार्क ७:२सुमारे इ.स. ३२
येशूंचे काही शिष्य अशुद्ध हाताने, म्हणजे हात न धुताच जेवतात, असे त्यांनी पाहिले होते.
- मार्क ७:३सुमारे इ.स. ३२
परूशी आणि सर्व यहूदी लोक, वाडवडीलांच्या परंपरेस अनुसरून आपले हात विधिपूर्वक धुतल्याशिवाय कधीही जेवत नसत.
- मार्क ७:४सुमारे इ.स. ३२
ज्यावेळी ते बाजारातून घरी येत, त्या त्यावेळेस हात धुतल्याशिवाय ते जेवत नसत. भांडी, पातेली, ताटे वगैरे धुण्यासंबंधीच्या अनेक रूढी ते पाळीत असत.
- मार्क ७:५सुमारे इ.स. ३२
या कारणामुळे परूशी आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांनी येशूंना विचारले, “तुमचे शिष्य आपल्या वाडवडीलांच्या परंपरे प्रमाणे का वागत नाहीत व ते आपले हात अशुद्ध असताना का जेवतात?”
- मार्क ७:६सुमारे इ.स. ३२
त्यांनी उत्तर दिले, “यशायाह संदेष्ट्याने तुमच्या ढोंगीपणाचे अचूक वर्णन केले आहे; कारण असे लिहिलेले आहे: “ ‘हे लोक त्यांच्या ओठांनी माझा सन्मान करतात, पण त्यांची हृदये माझ्यापासून दूर आहेत.