मुख्य मजकुरावर जा

circa 6 BC – AD 30

The Life of Jesus

The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.

3,779 वचने · 4 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मार्क ५:३१सुमारे इ.स. ३१

    “यावर त्यांचे शिष्य म्हणाले, एवढी मोठी गर्दी तुमच्याभोवती असताना तुम्ही विचारता, ‘मला कोणी स्पर्श केला?’ ”

  2. मार्क ५:३२सुमारे इ.स. ३१

    तरी आपल्याला कोणी स्पर्श केला, हे पाहण्यासाठी ते आजूबाजूला शोधू लागले.

  3. मार्क ५:३३सुमारे इ.स. ३१

    तेव्हा भयभीत झालेली ती स्त्री आपल्या बाबतीत काय घडले हे लक्षात घेऊन थरथर कापत आली आणि त्यांच्या पाया पडून तिने त्यांना सर्व खरे सांगितले.

  4. मार्क ५:३४सुमारे इ.स. ३१

    येशू तिला म्हणाले, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आता शांतीने जा आणि आपल्या पीडेपासून मुक्त राहा.”

  5. मार्क ५:३५सुमारे इ.स. ३१

    येशू अजून बोलतच होते, तोच सभागृहाचा अधिकारी याईराच्या घरून काही लोक आले. ते म्हणाले, “तुमची कन्या मरण पावली आहे, आता गुरुजींना त्रास देण्यात अर्थ नाही.”

  6. मार्क ५:३६सुमारे इ.स. ३१

    त्यांचे बोलणे ऐकून येशू सभागृहाच्या अधिकार्‍याला म्हणाले, “भिऊ नकोस, फक्त विश्वास ठेव.”

  7. मार्क ५:३७सुमारे इ.स. ३१

    येशूंनी पेत्र, याकोब आणि याकोबाचा भाऊ योहान यांच्याशिवाय कोणासही बरोबर येऊ दिले नाही.

  8. मार्क ५:३८सुमारे इ.स. ३१

    ते सभागृहाच्या अधिकार्‍याच्या घरी आले, तेव्हा गडबड व उच्च स्वरात लोकांची रडारड, आक्रोश त्यांना दिसून आला.

  9. मार्क ५:३९सुमारे इ.स. ३१

    ते आत गेले आणि लोकांना म्हणाले, “हा गोंधळ आणि आक्रोश कशासाठी? ही मुलगी मरण पावली नाही, पण झोपली आहे.”

  10. मार्क ५:४०सुमारे इ.स. ३१

    परंतु ते त्याला हसू लागले. त्या सर्वांना बाहेर घालविल्यावर, तिचे आईवडील आणि आपले शिष्य यांना घेऊन त्या बालिकेला ज्या खोलीत ठेवले होते तिथे गेले.

  11. मार्क ५:४१सुमारे इ.स. ३१

    तिच्या हाताला धरून येशू तिला म्हणाले, “तलीथा कूम!” (म्हणजे “छोट्या मुली, मी तुला सांगतो, ऊठ!”)

  12. मार्क ५:४२सुमारे इ.स. ३१

    ते ऐकताच ती उठून उभी राहिली आणि चालू फिरू लागली. तिचे वय बारा वर्षाचे होते. यावरून त्यांना अतिशय आश्चर्य वाटले.

  13. मार्क ५:४३सुमारे इ.स. ३१

    येशूंनी त्यांना कडक आदेश दिला की, याविषयी कोणाला सांगू नका व मुलीला काहीतरी खावयास द्यावे असे सांगितले.

  14. येशू तिथून निघाले व त्यांच्या शिष्यांसह स्वतःच्या गावी परतले.

  15. शब्बाथ आला त्यावेळी त्यांनी तेथील सभागृहामध्ये असलेल्या लोकांना शिक्षण देण्यास सुरुवात केली आणि ज्या सर्वांनी त्यांचे शिक्षण ऐकले ते आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले, “या मनुष्याला हे कुठून प्राप्त झाले? कशाप्रकारचे हे सुज्ञान त्यांना देण्यात आले आहे? हा अद्भुत चमत्कारसुद्धा कसे करतो?

  16. हा एक सुतार नाही का? याची आई मरीया आणि याकोब, योसेफ, शिमोन, यहूदाह हे त्याचे भाऊ आहे ना? आणि याच्या बहिणी तर आपल्यातच आहेत ना” आणि ते त्याच्यावर संतापले.

  17. मग येशू त्यांना म्हणाले, “संदेष्टा सन्मानित होत नाही असे नाही; फक्त आपले गाव आणि आपले घर व नातेवाईक यांच्यात तो मान्यता पावत नाही.”

  18. काही आजार्‍यांवर हात ठेवून त्यांना बरे करण्याशिवाय तिथे त्यांनी काही चमत्कार केले नाहीत.

  19. त्यांच्या अविश्वासाबद्धल येशूंना नवल वाटले. मग येशू गावोगावी शिक्षण देत फिरले.

  20. त्यांनी बारा प्रेषितांना आपल्याकडे बोलाविले आणि त्यांना जोडीजोडीने बाहेर पाठविण्यास सुरुवात केली आणि त्यांना अशुद्ध आत्म्यांवर अधिकार दिला.

  21. त्यांनी त्यास सूचना दिली: “प्रवासाला जाताना काठीशिवाय तुमच्यासोबत अन्न, झोळी, कमरपट्ट्यात पैसे असे काहीही घेऊ नका.

  22. जोडे घाला, पण अतिरिक्त अंगरखा घेऊ नका.

  23. ज्यावेळी तुम्ही एखाद्या घरामध्ये प्रवेश कराल, त्यावेळी त्या गावातून निघेपर्यंत तिथेच राहा.

  24. एखाद्या ठिकाणी तुमचे स्वागत झाले नाही किंवा तुमचे ऐकले नाही, तर ते ठिकाण सोडून द्या व तुमच्या पायांची धूळ तिथेच झटकून टाका, ही त्यांच्याविरुद्ध साक्ष राहील.”

  25. त्याप्रमाणे शिष्य बाहेर पडले आणि लोकांनी पश्चात्ताप करावा असा त्यांनी संदेश दिला.