मुख्य मजकुरावर जा

circa 6 BC – AD 30

The Life of Jesus

The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.

3,779 वचने · 4 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मार्क ५:६सुमारे इ.स. ३१

    येशूंना त्याने दूर अंतरावरून पाहिले व तो धावत आला आणि त्यांच्यासमोर गुडघे टेकून पाया पडला,

  2. मार्क ५:७सुमारे इ.स. ३१

    तो मोठ्याने ओरडून म्हणाला, “हे येशू, परात्पर परमेश्वराच्या पुत्रा, तुला माझ्याशी काय काम? परमेश्वराची शपथ मला छळू नकोस.”

  3. मार्क ५:८सुमारे इ.स. ३१

    कारण येशूंनी त्याला म्हटले होते, “अरे अशुद्ध आत्म्या, या मनुष्यातून बाहेर ये.”

  4. मार्क ५:९सुमारे इ.स. ३१

    “तुझे नाव काय?” येशूंनी विचारले, त्याने उत्तर दिले, “माझे नाव लेगियोन आहे, कारण आम्ही पुष्कळजण आहोत.

  5. मार्क ५:१०सुमारे इ.स. ३१

    आम्हाला या प्रांतातून घालवून देऊ नकोस,” अशी त्यांनी येशूंना पुन्हा विनंती केली.

  6. मार्क ५:११सुमारे इ.स. ३१

    त्याचवेळी डोंगराच्या कडेला डुकरांचा एक मोठा कळप चरत होता.

  7. मार्क ५:१२सुमारे इ.स. ३१

    “आम्हाला त्या डुकरांमध्ये जाण्याची परवानगी दे.” अशी भुतांनी येशूंना विनंती केली.

  8. मार्क ५:१३सुमारे इ.स. ३१

    येशूंनी त्यांना तशी परवानगी दिली, लगेच अशुद्ध आत्मे त्या मनुष्यातून बाहेर निघाले आणि डुकरांमध्ये शिरले व त्या दोन हजार डुकरांचा कळप डोंगराच्या उतरंडी वरून धावत सुटला आणि सरोवराच्या पाण्यात पडला व बुडाला.

  9. मार्क ५:१४सुमारे इ.स. ३१

    डुकरांचे कळप राखणारे जवळच्या नगरात आणि ग्रामीण भागात जाऊन ही घटना सांगितली, काय घडले हे पाहावे म्हणून लोक बाहेर आले.

  10. मार्क ५:१५सुमारे इ.स. ३१

    जेव्हा ते येशूंकडे आले, तेव्हा त्यांनी त्या मनुष्याला पाहिले जो भुताच्या सैन्याने पछाडलेला होता तो बसलेला, कपडे घातलेला आणि भानावर आलेला आहे; हे पाहून ते अतिशय भयभीत झाले.

  11. मार्क ५:१६सुमारे इ.स. ३१

    प्रत्यक्ष पाहणार्‍यांनी भूतग्रस्त मनुष्याचे काय झाले आणि डुकरांच्या बाबतीत काय झाले, ते सर्वांना सांगितले.

  12. मार्क ५:१७सुमारे इ.स. ३१

    तेव्हा येशूंनी आमच्या भागातून निघून जावे अशी लोकांनी त्यांना विनंती केली.

  13. मार्क ५:१८सुमारे इ.स. ३१

    येशू पुन्हा होडीत चढत असताना, जो मनुष्य पूर्वी भूतग्रस्त होता, त्याने आपल्यालाही बरोबर न्यावे, अशी येशूंना विनंती केली.

  14. मार्क ५:१९सुमारे इ.स. ३१

    पण येशूंनी ती मान्य केली नाही, परंतु ते त्याला म्हणाले, “आपल्या प्रियजनांकडे घरी जा आणि प्रभूने तुझ्यासाठी जे काही केले आणि तुझ्यावर किती मोठी दया केली हे त्यांना सांग.”

  15. मार्क ५:२०सुमारे इ.स. ३१

    त्याप्रमाणे तो मनुष्य गेला आणि त्या भागात असलेल्या दकापलीस येथे येशूंनी त्याच्यासाठी किती मोठ्या गोष्टी केल्या हे सांगू लागला आणि प्रत्येकजण विस्मयाने थक्क झाला.

  16. मार्क ५:२१सुमारे इ.स. ३१

    जेव्हा येशू होडीत बसून पलीकडच्या तीरावर गेले, तेव्हा त्यांच्याभोवती खूप मोठा समुदाय गोळा झाला, त्यावेळी ते सरोवराच्या किनार्‍याजवळ होते.

  17. मार्क ५:२२सुमारे इ.स. ३१

    त्यावेळी याईर नावाचा सभागृहाचा एक पुढारी आला, येशूंना पाहून त्यांच्या पाया पडला.

  18. मार्क ५:२३सुमारे इ.स. ३१

    त्यांना आग्रहाने विनंती करू लागला, “माझी लहान मुलगी मरणाच्या पंथाला लागली आहे, कृपा करून या व आपला हात तिच्यावर ठेवा म्हणजे ती बरी होईल व वाचेल.”

  19. मार्क ५:२४सुमारे इ.स. ३१

    म्हणून येशू त्यांच्याबरोबर निघाले. सभोवतालचा जमावही त्यांच्याबरोबर निघाला व गर्दी करू लागला.

  20. मार्क ५:२५सुमारे इ.स. ३१

    आणि तिथे एक स्त्री होती, जी बारा वर्षे रक्तस्रावाने आजारी होती.

  21. मार्क ५:२६सुमारे इ.स. ३१

    याकाळात तिने अनेक वैद्यांच्या उपचारांमुळे पुष्कळ दुःख सहन केले होते व ती कंगाल झाली होती आणि एवढे करूनही बरी न होता उलट तिचा आजार अधिकच बळावला होता.

  22. मार्क ५:२७सुमारे इ.स. ३१

    जेव्हा तिने येशूंबद्दल ऐकले, तेव्हा तिने मोठ्या गर्दीतून त्यांच्या पाठीमागे येऊन त्यांच्या झग्याच्या काठाला स्पर्श केला.

  23. मार्क ५:२८सुमारे इ.स. ३१

    “मी त्यांच्या वस्त्राला नुसता स्पर्श जरी केला तरी बरी होईन,” असे तिला वाटत होते.

  24. मार्क ५:२९सुमारे इ.स. ३१

    तत्काळ तिचा रक्तस्राव थांबला आणि आपण आजारातून मुक्त झालो आहोत याची तिला शरीरात जाणीव झाली.

  25. मार्क ५:३०सुमारे इ.स. ३१

    तत्क्षणी येशूंनी आपल्यामधून शक्ती बाहेर पडली असे जाणले आणि समुदायाकडे मागे वळून त्यांनी विचारले, “माझ्या वस्त्राला कोणी स्पर्श केला?”