circa 6 BC – AD 30
The Life of Jesus
The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.
या कालखंडातील वचने
- मार्क ९:३२सुमारे इ.स. ३२
परंतु ते काय म्हणतात हे ते समजले नाहीत आणि त्या गोष्टींविषयी विचारण्याची त्यांना भीती वाटली.
- मार्क ९:३३सुमारे इ.स. ३२
मग ते कफर्णहूमात आले. घरात गेल्यानंतर येशूने त्यांना विचारले, “तुम्ही रस्त्यात कशाविषयी चर्चा करीत होता?”
- मार्क ९:३४सुमारे इ.स. ३२
परंतु शिष्य शांत राहिले कारण मार्गावर असताना आपल्यापैकी सर्वात श्रेष्ठ कोण यासंबंधी शिष्यांचा वादविवाद सुरू झाला होता.
- मार्क ९:३५सुमारे इ.स. ३२
ते खाली बसले, त्यांनी आपल्या बारा शिष्यांना बोलाविले आणि म्हणाले, “तुमच्यामध्ये जो कोणी प्रथम होऊ पाहतो, त्याने सर्वात शेवटचा, आणि सर्वांचा सेवक झाले पाहिजे.”
- मार्क ९:३६सुमारे इ.स. ३२
मग त्यांनी एका लहान लेकराला त्यांच्यामध्ये ठेवले. मग त्या लेकराला कवेत उचलून घेत त्यांना म्हणाले,
- मार्क ९:३७सुमारे इ.स. ३२
“जो कोणी माझ्या नावाने अशा लहान बालकाचा स्वीकार करतो, तो माझा स्वीकार करतो आणि जो कोणी माझा स्वीकार करतो, तो माझा नव्हे तर ज्याने मला पाठविले त्याचा स्वीकार करतो.”
- मार्क ९:३८सुमारे इ.स. ३२
योहान म्हणाला, “गुरुजी, आम्ही कोणा एकाला तुमच्या नावाने भुते काढताना पाहिले. आम्ही त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला, कारण तो आपल्यातील नव्हता.”
- मार्क ९:३९सुमारे इ.स. ३२
येशू म्हणाले, “त्याला मना करू नका, कारण जो माझ्या नावाने चमत्कार करतो तो कोणीही असला, तरी तो लगेचच माझ्याविरुद्ध वाईट बोलणार नाही.
- मार्क ९:४०सुमारे इ.स. ३२
कारण जो आपल्याविरुद्ध नाही, तो आपल्या बाजूचा आहे.
- मार्क ९:४१सुमारे इ.स. ३२
मी तुम्हाला निश्चित सांगतो, तुम्ही ख्रिस्ताचे आहात म्हणून माझ्या नावाने कोणी तुम्हाला पेलाभर पाणी दिले, तर तो आपल्या पारितोषिकाला मुकणार नाही.
- मार्क ९:४२सुमारे इ.स. ३२
“जर कोणी माझ्यावर विश्वास ठेवणार्या या लहानातील एकालाही अडखळण करण्यास प्रवृत्त करतो, त्याच्या गळ्यात जात्याची मोठी तळी बांधून त्याला सरोवरात फेकून द्यावे हे त्याच्या चांगल्यासाठी होईल.
- मार्क ९:४३सुमारे इ.स. ३२
जर तुझा हात अडखळण करीत असेल, तर तो कापून टाक. दोन हात असून नरकात जावे व न विझणार्या अग्नीत जाण्याऐवजी एका हाताने अधू होऊन जीवनात प्रवेश करणे अधिक हिताचे होईल.”
- मार्क ९:४४सुमारे इ.स. ३२
ज्या ठिकाणी त्यांना खाणारे किडे कधी मरत नाहीत किंवा तेथील अग्नी कधी विझत नाही.
- मार्क ९:४५सुमारे इ.स. ३२
जर तुझा पाय अडखळण करीत असेल, तर तो कापून टाक. दोन पाय असून नरकात टाकले जावे, यापेक्षा एका पायाने अपंग होऊन जीवनात प्रवेश करणे हे तुझ्या हिताचे आहे.
- मार्क ९:४६सुमारे इ.स. ३२
ज्या ठिकाणी त्यांना खाणारे किडे कधी मरत नाहीत किंवा तेथील अग्नी कधी विझत नाही.
- मार्क ९:४७सुमारे इ.स. ३२
जर तुझा डोळा तुला अडखळण करीत असेल, तर तो उपटून फेकून दे. दोन डोळ्यांसह अग्नीच्या नरकात जाण्यापेक्षा एका डोळ्याने परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करणे हे उत्तम आहे.
- मार्क ९:४८सुमारे इ.स. ३२
ज्या ठिकाणी, “ ‘त्यांना खाणारे किडे कधी मरत नाहीत, किंवा तेथील अग्नी कधी विझत नाही.’
- मार्क ९:४९सुमारे इ.स. ३२
प्रत्येकजण अग्नीद्वारे खारट केले जातील.
- मार्क ९:५०सुमारे इ.स. ३२
“मीठ चांगले आहे, पण मिठाचा खारटपणा गेला तर त्याचा खारटपणा कशाने आणाल? तुमच्यातील मीठ गमावू नका, एकमेकांशी शांतीने राहा.”
- मार्क १०:१सुमारे इ.स. २९
येशू कफर्णहूम प्रांत सोडून यार्देनेच्या यहूदीया प्रांतात आले. त्यांच्यामागे लोकांची गर्दी होती आणि रीतीप्रमाणे त्यांना त्यांनी शिक्षण दिले.
- मार्क १०:२सुमारे इ.स. २९
काही परूशी आले आणि त्यांची परीक्षा पाहण्याकरिता त्यांना विचारले, “एखाद्या मनुष्याने त्याच्या पत्नीला घटस्फोट देणे नियमानुसार आहे काय?”
- मार्क १०:३सुमारे इ.स. २९
त्यांनी उत्तर दिले, “मोशेने तुम्हाला काय आज्ञा दिली आहे?”
- मार्क १०:४सुमारे इ.स. २९
ते म्हणाले, “पत्नीला सूटपत्र लिहून द्यावा व तिला पाठवून द्यावे अशी परवानगी मोशेने पुरुषांना दिली आहे.”
- मार्क १०:५सुमारे इ.स. २९
येशूंनी उत्तर दिले, “तुमच्या कठोर अंतःकरणामुळे मोशेने हे नियम तुम्हाला लिहून दिले.
- मार्क १०:६सुमारे इ.स. २९
परंतु सृष्टीच्या प्रारंभापासूनच परमेश्वराने त्यांना ‘पुरुष व स्त्री.’ असे निर्माण केले.