मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यिर्मयाह ३४:४सुमारे इ.स.पू. ५८९

    “ ‘परंतु हे सिद्कीयाह, यहूदीयाच्या राजा, याहवेहचे हे वचन ऐक! याहवेह तुझ्याविषयी असे म्हणतात: तलवारीने तुझा वध होणार नाही;

  2. यिर्मयाह ३४:५सुमारे इ.स.पू. ५८९

    पण तू शांतीने मरण पावशील. जसा तुझ्याआधी होऊन गेलेल्या राजांसाठी लोकांनी सन्मानदर्शक मृतकाग्नी जाळला, तसा तुझ्या सन्मानार्थही जाळतील आणि ते तुझ्यासाठी विलाप करून म्हणतील, “हाय हाय! आमच्या स्वामी!” मी स्वतः हे वचन देत आहे, असे याहवेह घोषित करतात.’ ”

  3. यिर्मयाह ३४:६सुमारे इ.स.पू. ५८९

    त्याप्रमाणे यिर्मयाह संदेष्ट्याने यहूदीयाचा सिद्कीयाह राजाला यरुशलेममध्ये हे सर्वकाही सांगितले.

  4. यिर्मयाह ३४:७सुमारे इ.स.पू. ५८९

    यावेळी बाबेलच्या राजाचे सैन्य यरुशलेमशी युद्ध करीत होते, यहूदीया प्रांतातील इतर नगरे—लाखीश व अजेकाह—अद्यापही टिकाव धरून होती. यहूदीयात एवढीच तटबंदी असलेली शहरे बाकी होती.

  5. यिर्मयाह ३४:८सुमारे इ.स.पू. ५८९

    यहूदीयाचा राजा, सिद्कीयाह, याने सर्व गुलामांची मुक्तता करण्याचा यरुशलेममधील लोकांशी करार केल्यानंतर यिर्मयाहला याहवेहकडून हे वचन आले.

  6. यिर्मयाह ३४:९सुमारे इ.स.पू. ५८९

    प्रत्येकाने आपआपले इब्री दास व दासी यांना मुक्त करावे; कोणत्याही यहूदी मनुष्याने दुसर्‍या यहूदी मनुष्यास बंदी बनवून ठेऊ नये.

  7. यिर्मयाह ३४:१०सुमारे इ.स.पू. ५८९

    सर्व अधिपतींनी व लोकांनी हा करार स्वीकारला की ते त्यांच्या दास व दासींना मुक्त करतील व यापुढे त्यांना बंदी बनवून ठेवणार नाहीत. त्यांनी हे मान्य केले व सर्व दास व दासींना मुक्त केले.

  8. यिर्मयाह ३४:११सुमारे इ.स.पू. ५८९

    पण नंतर त्यांनी आपले मन बदलले व मुक्त केलेल्या आपल्या सेवकांना पुन्हा गुलाम केले.

  9. यिर्मयाह ३४:१२सुमारे इ.स.पू. ५८९

    मग यिर्मयाहला याहवेहकडून हे वचन आले:

  10. यिर्मयाह ३४:१३सुमारे इ.स.पू. ५८९

    “इस्राएलचे परमेश्वर, याहवेह असे म्हणतात: मी तुमच्या पूर्वजांना इजिप्तमधून बाहेर काढले, त्यांच्या गुलामगिरीतून बाहेर आणले, त्यावेळी मी त्यांच्याशी एक करार केला होता. मी म्हटले,

  11. यिर्मयाह ३४:१४सुमारे इ.स.पू. ५८९

    ‘प्रत्येक सातव्या वर्षी कोणत्याही इब्री गुलामाला, ज्याने स्वतःस तुम्हाला विकले होते, त्यांना तुम्ही मुक्त केले पाहिजे. सहा वर्षे त्यांनी तुमची सेवा केल्यानंतर तुम्ही त्यांना मुक्त केले पाहिजे.’ तुमच्या पूर्वजांनी मात्र माझे ऐकले नाही वा त्याकडे लक्ष दिले नाही.

  12. यिर्मयाह ३४:१५सुमारे इ.स.पू. ५८९

    अलीकडेच तुम्ही पश्चात्ताप केला व माझ्या दृष्टीने योग्य ते केले: आपल्या लोकांची मुक्तता करण्याची घोषणा केली. आम्ही तसे करू, असे तुम्ही मला माझे नाव धारण केलेल्या मंदिरात शपथपूर्वक वचन दिले होते.

  13. यिर्मयाह ३४:१६सुमारे इ.स.पू. ५८९

    परंतु आता तुम्ही मागे वळले व माझे नाव अपवित्र केले; प्रत्येकाने त्यांना हवे तिकडे जाण्याचे स्वातंत्र्य असण्यास मुक्त केलेले दास व दासी परत घेतले. यांना परत गुलाम होण्याची बळजबरी केली.

  14. यिर्मयाह ३४:१७सुमारे इ.स.पू. ५८९

    “म्हणून याहवेह असे म्हणतात: तुम्ही माझी आज्ञा पाळली नाही; तुमच्या स्वतःच्या लोकांची मुक्तता करण्याची घोषणा करीत नाही. म्हणून मी आता तुमची ‘मुक्तता’ करेन, असे याहवेह जाहीर करतात—युद्ध, दुष्काळ व मरी यांच्याद्वारे तुम्हाला मरणाची ‘मुक्तता’ मिळेल. सर्व जगातील राज्यात मी तुम्हाला घृणास्पद असे करेन.

  15. यिर्मयाह ३४:१८सुमारे इ.स.पू. ५८९

    ज्यांनी माझा करार मोडला व माझ्या करारातील अटी पूर्ण करण्याचे नाकारले आहे, त्यांना ज्याप्रमाणे वासरू कापून त्याचे दोन भाग करून त्यामधून चालत जावे, त्याचप्रमाणे मी त्यांना वागवेन.

  16. यिर्मयाह ३४:१९सुमारे इ.स.पू. ५८९

    यहूदीया व यरुशलेममधील अधिपती, न्यायालयीन अधिकारी, याजक व सामान्य लोक जे दोन भाग केलेल्या वासराच्या मधून चालत गेले,

  17. यिर्मयाह ३४:२०सुमारे इ.स.पू. ५८९

    मी जे तुम्हाला ठार करू पाहतात त्या तुमच्या शत्रूंच्या हवाली करेन. त्यांची प्रेते पक्षी व हिंस्र श्वापदांचे अन्न होतील.

  18. यिर्मयाह ३४:२१सुमारे इ.स.पू. ५८९

    “बाबेलच्या राजाचे सैन्य या शहरातून काही काळासाठी गेले असले, तरी मी यहूदीयाचा राजा सिद्कीयाह व त्याचे अधिकारी यांना जे त्यांना ठार करू पाहतात, त्या त्यांच्या शत्रूंच्या हवाली करेन.

  19. यिर्मयाह ३४:२२सुमारे इ.स.पू. ५८९

    मी हा आदेश देणार आहे, असे याहवेह जाहीर करतात, मी त्यांना या शहरात परत आणेन. ते पुन्हा या नगरांविरुद्ध लढतील, ते जिंकतील व त्यास जाळून टाकतील. यहूदीयाची सर्व शहरे मी अशी ओसाड करेन जिथे कोणीही वसती करू शकणार नाही.”

  20. यिर्मयाह ३५:१सुमारे इ.स.पू. ६०७

    योशीयाहचा पुत्र, यहोयाकीम, हा यहूदीयाचा राजा असताना, यिर्मयाहला याहवेहकडून आलेले वचन हेच आहे:

  21. यिर्मयाह ३५:२सुमारे इ.स.पू. ६०७

    “रेखाबी लोकांच्या घराण्याकडे जा आणि त्यांना याहवेहच्या मंदिरातील एखाद्या आतील खोलीत ने आणि द्राक्षारस प्यावयास दे.”

  22. यिर्मयाह ३५:३सुमारे इ.स.पू. ६०७

    त्याप्रमाणे याजन्याह, यिर्मयाहचा पुत्र, याजन्याहचा नातू, हबसिन्याहचा पुत्र, तो, त्याचे भाऊ व सर्व पुत्र—म्हणजे पूर्ण रेखाबी कुटुंब यांना मी भेटण्यास गेलो.

  23. यिर्मयाह ३५:४सुमारे इ.स.पू. ६०७

    सर्वांना मी याहवेहच्या मंदिरात आणले व इग्दल्याह, परमेश्वराच्या मनुष्याचा पुत्र, हानानाचे पुत्र जी खोली वापरीत असत, त्या खोलीत त्यांना नेले. ही खोली राजवाड्याचे अधिकारी वापरीत असलेल्या खोलीच्या बाजूस आणि मंदिराचा द्वारपाल शल्लूमचा पुत्र मासेयाह, याच्या खोलीच्या बरोबर वर होती.

  24. यिर्मयाह ३५:५सुमारे इ.स.पू. ६०७

    मग त्या रेखाबीसमोर मी द्राक्षारसाचे कटोरे व काही पेले ठेवले आणि, “द्राक्षारस प्या,” असे त्यांना म्हणालो.

  25. यिर्मयाह ३५:६सुमारे इ.स.पू. ६०७

    परंतु त्यांनी द्राक्षारस घेण्यास नकार दिला. ते म्हणाले, “आम्ही पीत नाही, कारण आमचा पूर्वज, रेखाबचा पुत्र योनादाब याने आम्हाला अशी आज्ञा केली की, आम्ही किंवा आमच्या वंशजापैकी कोणीही कधीही द्राक्षारस पिऊ नये.