मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यिर्मयाह ३५:७सुमारे इ.स.पू. ६०७

    त्या शिवाय आम्ही कधीही घरे बांधू नयेत, बीज पेरणी करू नये, द्राक्षमळे लावू नयेत; यापैकी कशाचीही मालकी पत्करू नये, तर आम्ही आजीवन तंबूंमध्येच राहावे. तर ज्या भूमीवर आम्ही विमुक्त म्हणून वसती करू, तिथे दीर्घकाळ राहू.

  2. यिर्मयाह ३५:८सुमारे इ.स.पू. ६०७

    आम्ही आमचा पिता रेखाबचा पुत्र यहोनादाब याने आम्हाला दिलेल्या सर्व आज्ञा पाळल्या आहेत. आम्ही, आमच्या पत्नींनी, पुत्रांनी वा कन्यांनी कधीही द्राक्षारस प्याला नाही.

  3. यिर्मयाह ३५:९सुमारे इ.स.पू. ६०७

    किंवा राहण्यासाठी घरे बांधली, वा द्राक्षमळे, शेते अथवा पिके घेतली नाहीत.

  4. यिर्मयाह ३५:१०सुमारे इ.स.पू. ६०७

    आम्ही तंबूत राहिलो व आमचा पिता योनादाब याने आम्हाला दिलेल्या सर्व आज्ञा तंतोतंत पाळल्या आहेत.

  5. यिर्मयाह ३५:११सुमारे इ.स.पू. ६०७

    परंतु जेव्हा बाबेलचा राजा, नबुखद्नेस्सरने या देशावर हल्ला केला, आम्ही म्हटले, ‘चला, बाबिलोनचे व अराम्यांपासून आपला बचाव करण्यासाठी आपण यरुशलेमला पलायन करू या.’ म्हणून आम्ही यरुशलेम येथेच राहत आलो आहोत.”

  6. यिर्मयाह ३५:१२सुमारे इ.स.पू. ६०७

    नंतर यिर्मयाहला याहवेहकडून हे वचन आले:

  7. यिर्मयाह ३५:१३सुमारे इ.स.पू. ६०७

    “सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: जा आणि यहूदीयाच्या लोकांना व जे यरुशलेममध्ये राहतात त्यांना सांग, ‘रेखाबवंशातील घराण्याकडून तुम्ही काही धडा शिकून माझी वचने का पाळली नाहीत?’ याहवेह असे जाहीर करतात.

  8. यिर्मयाह ३५:१४सुमारे इ.स.पू. ६०७

    ‘रेखाबचा पुत्र यहोनादाब याने त्याच्या वंशजांना आज्ञा दिली होती की द्राक्षारस पिऊ नये, आणि ही आज्ञा त्यांनी पाळली. त्यांच्या पूर्वजांची आज्ञा पाळण्याकरिता, आजतागायत ते द्राक्षारस पीत नाहीत. मी तुमच्याशी पुन्हापुन्हा बोललो, पण माझ्या आज्ञा तुम्ही पाळल्या नाहीत.

  9. यिर्मयाह ३५:१५सुमारे इ.स.पू. ६०७

    पुन्हापुन्हा मी तुमच्याकडे माझे सेवक संदेष्टे पाठविले. ते म्हणाले, “तुम्हा प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून मागे वळावे व आपल्या आचरणात सुधारणा करावी; इतर दैवतांची सेवा करणे सोडून द्यावे. तर मी जो देश तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना दिला होता, त्या देशात तुम्ही सुखरुपपणे राहाल.” परंतु तुम्ही त्याकडे लक्ष दिले नाही वा माझे ऐकले नाही.

  10. यिर्मयाह ३५:१६सुमारे इ.स.पू. ६०७

    रेखाबचा पुत्र यहोनादाबच्या वंशजांनी आपल्या पित्याच्या आज्ञा संपूर्णपणे पाळल्या आहेत, पण या लोकांनी माझ्या आज्ञा पाळण्यास नकार दिला आहे.’

  11. यिर्मयाह ३५:१७सुमारे इ.स.पू. ६०७

    “म्हणून सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘ऐका! मी यहूदीयावर व यरुशलेमवर जी अरिष्टे आणण्याची घोषणा केली होती ती अरिष्टे आणेन. मी त्यांच्याशी बोललो, पण ते ऐकत नाहीत; मी हाक मारतो, तेव्हा ते उत्तर देत नाहीत.’ ”

  12. यिर्मयाह ३५:१८सुमारे इ.स.पू. ६०७

    मग यिर्मयाह रेखाबी लोकांच्या कुटुंबाकडे वळून त्यांना म्हणाला, “सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘तुम्ही तुमचे पूर्वज यहोनादाबचे प्रत्येक बाबतीत आज्ञापालन केले व त्याने सांगितलेल्या सर्व गोष्टी केल्या.’

  13. यिर्मयाह ३५:१९सुमारे इ.स.पू. ६०७

    म्हणून सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘रेखाबचा पुत्र योनादाबच्या वंशामध्ये माझी सेवा करणाऱ्यांचा कधीही अभाव होणार नाही.’ ”

  14. योशीयाहचा पुत्र, यहूदीयाचा राजा यहोयाकीम, याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी यिर्मयाहला याहवेहचे हे वचन आले:

  15. “तू एक गुंडाळी घेऊन त्याच्यावर इस्राएल, यहूदीया व इतर राष्ट्रे यांच्याविषयी योशीयाहच्या काळापासून आतापर्यंत मी जे सर्व संदेश देत आलो आहे, ते लिही.

  16. जी भयानक संकटे मी यहूदीयाच्या लोकांवर आणणार आहे, ती त्यांनी चर्मपत्रावर लिहिलेली प्रत्यक्ष पाहिली, तर कदाचित ते त्यांच्या दुष्टकर्मापासून मागे वळतील; मग मी त्यांच्या दुष्कर्माची व पापांची क्षमा करेन.”

  17. तेव्हा यिर्मयाहने नेरीयाहचा पुत्र बारूख, याला बोलावून त्याला याहवेहने सांगितलेली सर्व वचने बोलून दाखविली आणि बारूखने ते चर्मपत्रावर लिहिले.

  18. मग यिर्मयाह नेरीयाहचा पुत्र बारूखला म्हणाला, “माझ्यावर इथे प्रतिबंध लावण्यात आला आहे; मला याहवेहच्या मंदिरात जाण्याची परवानगी नाही.

  19. म्हणून उपवासाच्या दिवशी तू याहवेहच्या मंदिरात जा आणि मी सांगून तू चर्मपत्रावर लिहिलेली याहवेहची वचने वाचून दाखव. त्या दिवशी यहूदीया प्रांताच्या नगरांतून आलेल्या सर्व लोकांना वाचून दाखव.

  20. कदाचित ते याहवेहकडे क्षमेची याचना करतील व आपल्या दुष्ट मार्गापासून वळतील, कारण या लोकांविरुद्ध याहवेहने उच्चारलेले संताप व प्रकोप अत्यंत घोर आहेत.”

  21. यिर्मयाह संदेष्ट्याने सांगितल्याप्रमाणे नेरीयाहचा पुत्र बारूखने ते सर्व केले; याहवेहच्या मंदिरात चर्मपत्रावर लिहिलेली याहवेहची वचने लोकांना वाचून दाखविली.

  22. यिर्मयाह ३६:९सुमारे इ.स.पू. ६०६

    योशीयाहचा पुत्र राजा यहोयाकीम, याच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षी नवव्या महिन्यात यरुशलेममधील लोकास व जे यहूदीया प्रांतातील नगरातून आले होते, त्या लोकास याहवेहपुढे उपवास करण्याची घोषणा करण्यात आली होती.

  23. यिर्मयाह ३६:१०सुमारे इ.स.पू. ६०६

    शाफानचा पुत्र गमर्‍याह चिटणीस, याच्या याहवेहच्या मंदिरात वरच्या सभागृहाच्या बाजूस नव्या द्वारातील प्रवेशमार्गाजवळील कचेरीमध्ये नेरीयाहचा पुत्र बारूख यिर्मयाहची वचने लिहिलेले हे चर्मपत्र वाचण्यासाठी गेला.

  24. यिर्मयाह ३६:११सुमारे इ.स.पू. ६०६

    शाफानचा नातू, गमर्‍याहचा पुत्र, मिखायाह याने चर्मपत्रावर लिहिलेली याहवेहची सर्व वचने ऐकली,

  25. यिर्मयाह ३६:१२सुमारे इ.स.पू. ६०६

    तेव्हा तो राजवाड्यातील चिटणीसाच्या दालनात खाली गेला, तिथे सर्व अधिकारी—एलीशामा चिटणीस, शमायाहचा पुत्र दलायाह, अकबोरचा पुत्र एलनाथान, शाफानचा पुत्र गमर्‍याह, हनन्याहचा पुत्र सिद्कीयाह व तसेच इतर सर्व वरिष्ठ अधिकारी मसलतीसाठी जमले होते.