मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यिर्मयाह ३६:१३सुमारे इ.स.पू. ६०६

    नेरीयाहचा पुत्र बारूखाने चर्मपत्रावर लिहिलेले वाचून दाखविलेले सर्व मिखायाहने त्या अधिकार्‍यांना सांगितले.

  2. यिर्मयाह ३६:१४सुमारे इ.स.पू. ६०६

    तेव्हा अधिकार्‍यांनी कूशीचा पणतू, शेलेम्याहचा नातू, नथन्याहचा पुत्र, यहूदी याच्या हाती नेरीयाहचा पुत्र बारूखला सांगून पाठविले, “तू लोकांना वाचून दाखविलेले चर्मपत्र घेऊन इकडे ये.” त्याप्रमाणे नेरीयाहचा पुत्र बारूख हातात चर्मपत्र घेऊन त्यांच्याकडे गेला.

  3. यिर्मयाह ३६:१५सुमारे इ.स.पू. ६०६

    ते त्याला म्हणाले, “कृपया, बसा, व आम्हाला वाचून दाखवा.” म्हणून नेरीयाहचा पुत्र बारूखाने त्यांना वाचून दाखविले.

  4. यिर्मयाह ३६:१६सुमारे इ.स.पू. ६०६

    जेव्हा त्यांनी ती सर्व वचने ऐकली, तेव्हा सर्व अधिकारी अतिशय भयभीत नजरेने एकमेकांकडे बघू लागले व नेरीयाहचा पुत्र बारूखाला म्हणाले, “या सर्व वचनांचा राजाला अहवाल दिलाच पाहिजे.”

  5. यिर्मयाह ३६:१७सुमारे इ.स.पू. ६०६

    त्यांनी नेरीयाहचा पुत्र बारूखाला विचारले, “आम्हाला सांग, हे सर्व तू कसे काय लिहिले? यिर्मयाहने सांगून तू हे लिहिले का?”

  6. यिर्मयाह ३६:१८सुमारे इ.स.पू. ६०६

    त्यावर नेरीयाहचा पुत्र बारूखने म्हटले, “यिर्मयाहने ही वचने सांगितली व मी ती चर्मपत्रावर शाईने लिहिली.”

  7. यिर्मयाह ३६:१९सुमारे इ.स.पू. ६०६

    अधिकारी नेरीयाहचा पुत्र बारूखला म्हणाले, “तू आणि यिर्मयाह दोघेही लपून राहा. तुम्ही कुठे आहात हे कोणालाही कळवू नका.”

  8. यिर्मयाह ३६:२०सुमारे इ.स.पू. ६०६

    नंतर अधिकार्‍यांनी एलीशामा चिटणीसाच्या खोलीमध्ये ते चर्मपत्र ठेवले आणि राजाला भेटण्यासाठी ते राज्यसभेत गेले व ही सर्व गोष्ट त्यांनी राजाला सांगितली.

  9. यिर्मयाह ३६:२१सुमारे इ.स.पू. ६०६

    मग राजाने यहूदीस ते चर्मपत्र आणण्यासाठी पाठविले, व यहूदीने चिटणीस एलीशामाच्या खोलीमधून ते आणले आणि सर्व अधिकारी राजाजवळ उभे असताना, त्याने तो राजाला वाचून दाखविले.

  10. यिर्मयाह ३६:२२सुमारे इ.स.पू. ६०६

    हा नववा महिना असून राजा राजवाड्याच्या एका खास हिवाळी दालनात शेगडी पुढे घेऊन शेकत बसला होता.

  11. यिर्मयाह ३६:२३सुमारे इ.स.पू. ६०६

    यहूदीने तीन-चार रकाने वाचून संपवली की राजा वाचलेला भाग लेखनिकाच्या चाकूने तेवढा कापून विस्तवात टाकी. असे संपूर्ण चर्मपत्र जळून नष्ट झाले.

  12. यिर्मयाह ३६:२४सुमारे इ.स.पू. ६०६

    राजा व त्याच्या इतर सर्व सेवेकऱ्यांनी हे ऐकल्यानंतर भय वाटल्याचे दर्शविले नाही वा संतापाने आपले वस्त्र फाडले नाही.

  13. यिर्मयाह ३६:२५सुमारे इ.स.पू. ६०६

    त्यावेळी एलनाथान, दलायाह व गमर्‍याह या तिघांनी हे चर्मपत्र जाळू नये असे राजाला परोपरीने विनविले, परंतु राजाने त्यांचे ऐकले नाही.

  14. यिर्मयाह ३६:२६सुमारे इ.स.पू. ६०६

    याउलट, राजाने राजपुत्र यरहमेल, अज्रीएलचा पुत्र सेरायाह व अब्देलचा पुत्र शेलेम्याह यांना हुकूम केला की त्यांनी नेरीयाहचा पुत्र लेखनिक बारूख व यिर्मयाह संदेष्टा यांना अटक करावी. परंतु याहवेहने त्यांना लपवून ठेवले.

  15. यिर्मयाह ३६:२७सुमारे इ.स.पू. ६०६

    राजाने यिर्मयाह संदेष्ट्याला सांगून नेरीयाहचा पुत्र बारूखाने लिहिलेली वचने असलेले ते चर्मपत्र जाळून टाकल्यावर, यिर्मयाहला याहवेहची वचने आली:

  16. यिर्मयाह ३६:२८सुमारे इ.स.पू. ६०६

    “दुसरे एक चर्मपत्र घे व त्यावर यहूदीयाचा राजा यहोयाकीमने जाळून टाकलेल्या पहिल्या चर्मपत्रावर लिहिलेली सर्व वचने लिहून काढ.

  17. यिर्मयाह ३६:२९सुमारे इ.स.पू. ६०६

    याशिवाय यहूदीयाचा राजा यहोयाकीमला सांग, ‘याहवेह असे म्हणतात: तू ते चर्मपत्र जाळले व म्हटले, “बाबेलचा राजा निश्चितच येईल व हा देश नष्ट करेल आणि मनुष्य व पशूंना पूर्णपणे नाहीसे करेल, असे त्या चर्मपत्रावर का लिहिले?”

  18. यिर्मयाह ३६:३०सुमारे इ.स.पू. ६०६

    म्हणून यहूदीयाचा राजा यहोयाकीमविषयी, याहवेह असे म्हणतात: दावीदाच्या राजासनावर बसण्यासाठी त्याला कोणीही वारस असणार नाही; त्याचे प्रेत बाहेर दिवसा उन्हामध्ये व रात्रीच्या हिवात पडून राहील.

  19. यिर्मयाह ३६:३१सुमारे इ.स.पू. ६०६

    मी त्याला, त्याच्या लेकरांना व त्याच्या सेवेकऱ्यांना त्यांच्या सर्व दुष्टतेकरिता शिक्षा देईन; मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे त्यांच्यावर, तसेच यहूदीयात राहणाऱ्या लोकांवर व यरुशलेम येथील सर्व लोकांवर घोषित केलेली अरिष्टे आणेन, कारण त्यांनी माझे ऐकले नाही.’ ”

  20. यिर्मयाह ३६:३२सुमारे इ.स.पू. ६०६

    मग यिर्मयाहने पुन्हा दुसरे चर्मपत्र घेतले, यहूदीयाचा राजा यहोयाकीमने जाळलेल्या चर्मपत्रावर लिहिलेली सर्व वचने नेरीयाहचा पुत्र लेखनिक बारूखाला पुन्हा सांगून त्याच्याकडून लिहून घेतली. आणि त्यासारख्या आणखी पुष्कळ वचनाची त्यामध्ये भर घातली गेली.

  21. यिर्मयाह ३७:१सुमारे इ.स.पू. ५९८

    बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने यहोयाकीमचा पुत्र कोन्याह याची यहूदीयाचा नवा राजा म्हणून नेमणूक केली नाही. त्याऐवजी त्याने योशीयाहचा पुत्र सिद्कीयाह याची निवड केली.

  22. यिर्मयाह ३७:२सुमारे इ.स.पू. ५९८

    याहवेह यिर्मयाह संदेष्ट्याद्वारे जी वचने सांगत होते, त्याकडे सिद्कीयाह राजा, त्याचे सेवेकरी व देशातील लोक यापैकी कोणीही लक्ष दिले नाही.

  23. यिर्मयाह ३७:३सुमारे इ.स.पू. ५९८

    तरीपण सिद्कीयाह राजाने शेलेम्याहचा पुत्र यहूकल व मासेयाहचा पुत्र सफन्याह याजक यांना यिर्मयाह संदेष्ट्याकडे अशी विनंती करण्यास पाठविले: “तू आमच्यासाठी आमचे परमेश्वर याहवेह यांच्याकडे प्रार्थना कर.”

  24. यिर्मयाह ३७:४सुमारे इ.स.पू. ५९८

    यावेळी यिर्मयाह अद्यापही बंदिवासात टाकला गेला नव्हता, त्यामुळे तो आपल्या इच्छेप्रमाणे लोकांमध्ये जाणे-येणे करू शकत असे.

  25. यिर्मयाह ३७:५सुमारे इ.स.पू. ५९८

    इजिप्तच्या फारोहच्या सैन्याने इजिप्तमधून कूच केले आहे, ही बातमी जेव्हा बाबेल्यांनी ऐकली, तेव्हा त्यांनी यरुशलेमच्या वेढ्यापासून माघार घेतली.