circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- यिर्मयाह ३८:१०सुमारे इ.स.पू. ५९८
मग राजाने कूशी एबेद-मेलेखला सांगितले, “तू तीस माणसे घेऊन जा आणि यिर्मयाह संदेष्टा मरण्याआधीच त्याला त्या अंधार विहिरीतून बाहेर काढ.”
- यिर्मयाह ३८:११सुमारे इ.स.पू. ५९८
तेव्हा इथिओपी एबेद-मेलेखने माणसे घेतली आणि तो राजवाड्यातील एका कोठारात गेला. तिथे टाकून दिलेल्या वस्तू व जुने कपडे ठेवलेले होते. तिथून काही चिंध्या व जुने कपडे घेऊन तो अंधार विहिरीकडे गेला व दोरीला बांधून ते बोचके त्याने खाली यिर्मयाहकडे विहिरीत सोडले.
- यिर्मयाह ३८:१२सुमारे इ.स.पू. ५९८
कूशी एबेद-मेलेखने यिर्मयाहला सांगितले, “तुला दोर्या काचू नयेत म्हणून या चिंध्या आपल्या बगलेत ठेव.” यिर्मयाहने त्याप्रमाणे केल्यावर
- यिर्मयाह ३८:१३सुमारे इ.स.पू. ५९८
यिर्मयाहला त्यांनी ओढून अंधार विहिरीतून बाहेर काढले व परत राजवाड्यातील अंगणात आणले व तिथे तो राहिला.
- यिर्मयाह ३८:१४सुमारे इ.स.पू. ५९८
एके दिवशी सिद्कीयाह राजाने निरोप पाठविला की यिर्मयाह संदेष्ट्याला याहवेहच्या मंदिराच्या बाजूच्या देवडीत घेऊन यावे. राजा यिर्मयाहला म्हणाला, “मी तुला काही विचारणार आहे. तर खरे तेच सांग. मजपासून काहीही लपविण्याचा प्रयत्न करू नकोस.”
- यिर्मयाह ३८:१५सुमारे इ.स.पू. ५९८
त्यावर यिर्मयाह सिद्कीयाह राजा म्हणाला, “मी तुम्हाला उत्तर दिले, तर तुम्ही मला ठार करणार नाही का? आणि मी तुम्हाला काही सल्ला जरी दिला तरी तुम्ही माझे ऐकणार नाहीच.”
- यिर्मयाह ३८:१६सुमारे इ.स.पू. ५९८
तेव्हा सिद्कीयाह राजाने यिर्मयाहला त्याचे उत्पन्नकर्ता, सर्वसमर्थ याहवेह, यांची गुप्तपणे शपथ वाहिली: “मी तुला ठार मारणार नाही किंवा तुझा जीव घेऊ पाहणार्यांच्या हाती तुला देणार नाही.”
- यिर्मयाह ३८:१७सुमारे इ.स.पू. ५९८
मग यिर्मयाह सिद्कीयाहला म्हणाला, “सर्वसमर्थ परमेश्वर याहवेह, इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: तुम्ही बाबेलच्या राजाला शरण गेलात तर तुमचा जीव वाचेल आणि हे शहर जाळण्यात येणार नाही; तुम्ही व तुमचे घराणे जगेल.
- यिर्मयाह ३८:१८सुमारे इ.स.पू. ५९८
परंतु तुम्ही बाबेलच्या राजाच्या अधिकाऱ्यांना शरण जाण्याचे नाकारलेस, तर हे शहर बाबेल्यांच्या हाती देण्यात येईल आणि ते या शहराला आग लावील आणि तुम्हीही त्यांच्या हातून सुटणार नाहीस.”
- यिर्मयाह ३८:१९सुमारे इ.स.पू. ५९८
यावर राजा सिद्कीयाह यिर्मयाहला म्हणाला, “मला पुढे बाबेलला गेलेल्या यहूद्यांची भीती वाटते, कारण बाबिलोनचे लोक मला यहूद्यांच्या हाती देतील व ते माझे हाल करतील.”
- यिर्मयाह ३८:२०सुमारे इ.स.पू. ५९८
यिर्मयाहने उत्तर दिले, “ते तुम्हाला त्यांच्या हवाली करणार नाही. तुम्ही याहवेहच्या आज्ञा पाळा व मी काय सांगतो ते करा. तर ते तुम्हाला हितकारक ठरेल आणि तुमचा जीव वाचेल.
- यिर्मयाह ३८:२१सुमारे इ.स.पू. ५९८
मात्र आत्मसमर्पण करण्याचे नाकारले, तर याहवेहने मला हे प्रगट केले आहे:
- यिर्मयाह ३८:२२सुमारे इ.स.पू. ५९८
तुमच्या यहूदीयाच्या राजाच्या राजवाड्यात उरलेल्या सर्व स्त्रियांना बाहेर आणून बाबिलोनच्या सरदारांच्या स्वाधीन केले जाईल, तेव्हा त्या स्त्रिया तुम्हाला म्हणतील: “ ‘त्यांनी तुला चुकीच्या मार्गावर नेले व तुझ्यावर मात केली— ते तुझे विश्वसनीय मित्र. तुझी पावले आता गाळात रुतली आहेत; त्यांनी टाकून दिले आहे.’
- यिर्मयाह ३८:२३सुमारे इ.स.पू. ५९८
“तुमच्या सर्व स्त्रिया व मुले यांना बाबिलोनच्या लोकांच्या हवाली केले जाईल, आणि तुम्हीही त्यांच्या हातून सुटणार नाही. बाबिलोनचा राजा तुम्हाला पकडेल आणि हे शहर जळून खाक होईल.”
- यिर्मयाह ३८:२४सुमारे इ.स.पू. ५९८
मग सिद्कीयाह यिर्मयाहला म्हणाला, “या चर्चेबद्दल कोणाला काही कळू देऊ नकोस, नाहीतर तुझा वध होईल.
- यिर्मयाह ३८:२५सुमारे इ.स.पू. ५९८
मी तुझ्याशी बोललो, हे माझ्या अधिकार्यांना कळले, व ‘आम्हाला सांग, राजाला तू काय सांगितले व राजाने तुला काय सांगितले; काहीही लपवू नकोस नाहीतर, आम्ही तुला ठार करतो,’ अशी त्यांनी तुला धमकी दिली,
- यिर्मयाह ३८:२६सुमारे इ.स.पू. ५९८
तर त्यांना एवढेच सांग, ‘योनाथानच्या घरच्या अंधारकोठडीत मला पुन्हा पाठवू नका, नाहीतर तिथे मी मरेन, एवढीच विनवणी मी राजाला केली.’ ”
- यिर्मयाह ३८:२७सुमारे इ.स.पू. ५९८
सर्व नगराधिकारी यिर्मयाहकडे आले व त्याला प्रश्न विचारू लागले. तेव्हा राजाने आज्ञापिल्याप्रमाणे यिर्मयाहने त्यांना सांगितले. मग त्यांनी त्याला काहीही विचारले नाही व राजाशी त्याचा झालेला संवाद कोणीही ऐकला नव्हता.
- यिर्मयाह ३८:२८सुमारे इ.स.पू. ५९८
आणि बाबिलोनच्या लोकांनी यरुशलेम पुन्हा जिंकून घेईपर्यंत, यिर्मयाह राजवाड्यातील अंगणात राहिला. यरुशलेमचा अशाप्रकारे पाडाव झाला.
- यिर्मयाह ३९:१सुमारे इ.स.पू. ५९०
यहूदीयाचा राजा सिद्कीयाह याच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी, दहाव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आपले सर्व सैन्य घेऊन यरुशलेमवर चालून आला व त्याभोवती वेढा घातला.
- यिर्मयाह ३९:२सुमारे इ.स.पू. ५८८
आणि सिद्कीयाह राजाच्या राजवटीच्या अकराव्या वर्षी, चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी त्यांनी नगराच्या तटाला खिंड पाडली.
- यिर्मयाह ३९:३सुमारे इ.स.पू. ५८८
बाबिलोनच्या सैन्यातील सर्व अधिकारी—सामगरचा नेरगल-शरेसर उच्चाधिकारी, प्रमुख अधिकारी नेबो-सर्सखीम, उच्चाधिकारी नेर्गल-शरेसर व बाबिलोनच्या राजाचे इतर सर्व अधिकाऱ्यांनी आत प्रवेश केला व ते मधल्या वेशीत येऊन बसले.
- यिर्मयाह ३९:४सुमारे इ.स.पू. ५८८
हे पाहताच यहूदीयाचा राजा सिद्कीयाह व त्याचे सैनिक रात्रीच्या वेळी शहर सोडले, त्यांनी राजाच्या बागेजवळ दोन भिंतीमध्ये असलेल्या वेशीतून अराबाहच्या दिशेने पळून गेले.
- यिर्मयाह ३९:५सुमारे इ.स.पू. ५८८
परंतु बाबेलच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला व सिद्कीयाहला यरीहोच्या मैदानात पकडले व बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर, याच्याकडे हमाथ राज्यातील रिब्लाह या शहरात आणण्यात आले. त्या ठिकाणी सिद्कीयाला शिक्षा सुनाविण्यात आली.
- यिर्मयाह ३९:६सुमारे इ.स.पू. ५८८
बाबेलचा राजाने रिब्लाहात सिद्कीयाहच्या डोळ्यादेखत त्याच्या मुलांचा वध केला व यहूदीयाचे सर्व प्रतिष्ठित लोक यांचाही वध केला.