circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- यिर्मयाह ३७:६सुमारे इ.स.पू. ५९८
त्यावेळी यिर्मयाह संदेष्ट्याला याहवेहचे हे वचन आले:
- यिर्मयाह ३७:७सुमारे इ.स.पू. ५९८
“इस्राएलचे परमेश्वर याहवेह असे म्हणतात: यहूदीयाच्या राजाने माझा संदेश विचारण्यासाठी तुला पाठविले आहे, तर त्याला सांग, ‘फारोहचे सैन्य इजिप्तमधून तुमच्या साहाय्यासाठी आले असले, तरी ते इजिप्तला परत जातील.
- यिर्मयाह ३७:८सुमारे इ.स.पू. ५९८
बाबिलोनचे सैन्य माघारी येतील, हे शहर हस्तगत करून ते जाळून जमीनदोस्त करतील.’
- यिर्मयाह ३७:९सुमारे इ.स.पू. ५९८
“याहवेह असे म्हणतात: ‘बाबिलोनचे सैन्याने आपल्याला निश्चितच सोडणार आहेत.’ असा गैरसमज करून घेऊ नका. ते सोडून जाणार नाहीत!
- यिर्मयाह ३७:१०सुमारे इ.स.पू. ५९८
तू बाबेलच्या सैन्याचा पराभव केलास, व त्यांच्यातील घायाळ झालेले सैनिकच त्यांच्या तंबूत उरले, तरी ते बाहेर येतील व हे शहर पेटवून देतील!”
- यिर्मयाह ३७:११सुमारे इ.स.पू. ५९८
जेव्हा फारोहच्या सैन्यामुळे बाबेलच्या सैन्याने यरुशलेमहून माघार घेतली,
- यिर्मयाह ३७:१२सुमारे इ.स.पू. ५९८
तेव्हा यिर्मयाह शहरातून बाहेर पडू लागला व बिन्यामीन प्रांतातील त्याने विकत घेतलेल्या जमिनीचा ताबा घेण्यासाठी यरुशलेमहून निघाला.
- यिर्मयाह ३७:१३सुमारे इ.स.पू. ५९८
परंतु तो बिन्यामीन वेशीतून बाहेर जात असता, हनन्याहचा नातू, शेलेम्याहचा पुत्र इरीयाह या पहारेकर्याच्या प्रमुखाने त्याला पकडले व यिर्मयाह संदेष्ट्याला म्हणाला, “तू बाबेलच्या सैन्यास फितूर झाला आहेस!”
- यिर्मयाह ३७:१४सुमारे इ.स.पू. ५९८
तेव्हा यिर्मयाह म्हणाला, “हे खोटे आहे! मी बाबेलच्या सैन्यास फितूर झालो नाही.” परंतु इरीयाहने त्याचे ऐकले नाही; याउलट त्याने यिर्मयाहला अटक करून अधिकार्यांपुढे उभे केले.
- यिर्मयाह ३७:१५सुमारे इ.स.पू. ५९८
ते यिर्मयाहवर संतापले आणि त्यांनी त्याला फटके मारवले आणि योनाथान चिटणीसाच्या घरात, जे त्यांनी कारागृह केले होते, त्यात त्याला कैद केले.
- यिर्मयाह ३७:१६सुमारे इ.स.पू. ५८९
यिर्मयाहास भुयारागत खोलीत ठेवण्यात आले. तिथेच तो अनेक दिवस राहिला.
- यिर्मयाह ३७:१७सुमारे इ.स.पू. ५८९
मग राजा सिद्कीयाहने यिर्मयाहला मुक्त केले व राजवाड्यात आणले, आणि खाजगीरित्या विचारले, “याहवेहकडून काही वचन आले आहे काय?” यिर्मयाह उत्तरला, “होय, तुम्हाला बाबेलच्या राजाच्या हातात सोपविण्यात येणार.”
- यिर्मयाह ३७:१८सुमारे इ.स.पू. ५८९
नंतर यिर्मयाहने सिद्कीयाह राजाला विचारले, “मी तुमच्याविरुद्ध किंवा तुमच्या अधिकार्यांविरुद्ध किंवा लोकांविरुद्ध कोणते पाप केले आहे, की मला तुरुंगवासाची शिक्षा व्हावी?
- यिर्मयाह ३७:१९सुमारे इ.स.पू. ५८९
बाबेलचा राजा तुमच्यावर किंवा या देशावर हल्ला करणार नाही, असे तुम्हाला सांगणारे ते संदेष्टे आता कुठे आहेत?
- यिर्मयाह ३७:२०सुमारे इ.स.पू. ५८९
महाराज, माझे स्वामी, कृपया माझे ऐका. माझी विनंती तुमच्यापुढे ठेऊ द्या: मला परत त्या योनाथान चिटणीसाच्या घरात पाठवू नका, नाहीतर मी तिथे मरेन.”
- यिर्मयाह ३७:२१सुमारे इ.स.पू. ५८९
त्यावर यिर्मयाहला अंधारकोठडीत पाठवू नये, तर त्याऐवजी राजवाड्यातील तुरुंगात ठेवावे, आणि शहरात भाकरीचा पुरवठा संपेपर्यंत, त्याला रोज एक ताजी भाकर देण्यात यावी, असा सिद्कीयाह राजाने हुकूम दिला. त्याप्रमाणे यिर्मयाहला राजवाड्यातील पहारेकरांच्या अंगणात ठेवण्यात आले.
- यिर्मयाह ३८:१सुमारे इ.स.पू. ५९८
परंतु यिर्मयाह लोकांना काय सांगत आहे हे मत्तानचा पुत्र शफाट्याह, पशहूरचा पुत्र गदल्याह, शेलेम्याहचा पुत्र युकाल व मल्कीयाहचा पुत्र पशहूर यांनी ऐकले.
- यिर्मयाह ३८:२सुमारे इ.स.पू. ५९८
यिर्मयाह सांगत होता, “याहवेह असे म्हणतात: ‘यरुशलेम नगरीमध्ये जे कोणी राहतील ते सर्व तलवार, दुष्काळ व मरी यांना बळी पडतील. पण जे बाबिलोनचे सेनेला शरण जातील ते जगतील. त्यांचा जीव वाचेल; ते जगतील.’
- यिर्मयाह ३८:३सुमारे इ.स.पू. ५९८
आणि याहवेह असे म्हणतात: ‘हे शहर निश्चितच बाबिलोनचे राजाच्या सेनेच्या हाती देण्यात येईल, तो ते हस्तगत करेल.’ ”
- यिर्मयाह ३८:४सुमारे इ.स.पू. ५९८
मग हे ऐकताच अधिकारी राजाकडे गेले व म्हणाले, “महाराज, या मनुष्याला जिवे मारलेच पाहिजे. कारण याच्या बोलण्याने नगरात आपल्या उरलेल्या सैनिकांचे आणि जनतेचेही मनोधैर्य खचत आहे, हा या लोकांच्या कल्याणाचे बोलत नाही, तर त्यांच्या नाशाबद्दल बोलतो.”
- यिर्मयाह ३८:५सुमारे इ.स.पू. ५९८
यावर सिद्कीयाह राजा म्हणाला, “तो तुमच्या हातात आहे. राजा तुमच्या विरोधात काही करू शकत नाही.”
- यिर्मयाह ३८:६सुमारे इ.स.पू. ५९८
मग त्यांनी यिर्मयाहला बाहेर काढले व त्याला दोरांच्या साहाय्याने राजपुत्र मल्कीयाह याच्या राजवाड्याच्या आवारातील एका अंधार विहिरीत सोडले; त्यात पाणी नव्हते, पण तळाशी खूप गाळ होता आणि यिर्मयाह त्या गाळात रुतला.
- यिर्मयाह ३८:७सुमारे इ.स.पू. ५९८
यिर्मयाहला राजवाड्यातील अंधार विहिरीत टाकले आहे, हे वृत्त यरुशलेमच्या राजवाड्यातील एबेद-मेलेख नावाच्या एका प्रमुख अधिकार्याने ऐकले. तो कूशी देशाचा मूळ रहिवासी होता. यावेळी राजा बिन्यामीन वेशीपाशी बसला होता.
- यिर्मयाह ३८:८सुमारे इ.स.पू. ५९८
एबेद-मेलेख लागलीच राजवाड्याच्या बाहेर गेला व राजाला म्हणाला,
- यिर्मयाह ३८:९सुमारे इ.स.पू. ५९८
“महाराज, माझे स्वामी, या माणसांनी यिर्मयाह संदेष्ट्याला अंधार विहिरीत टाकले, हे फार वाईट कृत्य केले आहे. तिथे तो उपासमारीने मरेल, कारण शहरातील सर्व भाकर संपली आहे.”