- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- यशायाह १०:३०सुमारे इ.स.पू. ७१३
गल्लीमच्या मुली, आरडाओरडा करा! ऐक, लईशाह! गरीब बिचारा अनाथोथ!
- यशायाह १०:३१सुमारे इ.स.पू. ७१३
मदमेनाह पळून गेला आहे; गेबीमचे लोक आश्रय घेत आहेत.
- यशायाह १०:३२सुमारे इ.स.पू. ७१३
आज ते नोब येथे थांबतील; सीयोन कन्येच्या डोंगराकडे, यरुशलेमच्या टेकडीकडे ते त्यांच्या मुठी वळवतील.
- यशायाह १०:३३सुमारे इ.स.पू. ७१३
हे पाहा, प्रभू, सर्वसमर्थ याहवेह, मोठ्या सामर्थ्याने झाडांच्या मोठ्या फांद्या छाटून टाकतील. भव्य झाडे पाडली जातील, उंच झाडे खाली आणली जातील.
- यशायाह १०:३४सुमारे इ.स.पू. ७१३
ते कुऱ्हाडीने जंगलातील झाडेझुडपांचे रान कापून टाकतील; लबानोन प्रतापी परमेश्वरासमोर पडेल.
- यशायाह ११:१सुमारे इ.स.पू. ७१३
इशायाच्या बुंध्यापासून एक अंकुर निघून वर येईल; त्याच्या मुळांपासून एक फांदी येऊन ती फळ देईल.
- यशायाह ११:२सुमारे इ.स.पू. ७१३
याहवेहचा आत्मा त्यांच्यावर विसावेल— शहाणपणाचा आणि समंजसपणाचा आत्मा, सल्ला आणि पराक्रमाचा आत्मा, ज्ञानाचा आत्मा आणि याहवेहच्या भयाचा आत्मा—
- यशायाह ११:३सुमारे इ.स.पू. ७१३
आणि ते याहवेहचे भय बाळगण्यात आनंद मानतील. ते तोंडदेखला न्याय करणार नाहीत, किंवा कानाने ऐकलेल्या गोष्टीवरून ते निर्णय घेणार नाहीत.
- यशायाह ११:४सुमारे इ.स.पू. ७१३
परंतु ते नीतिमत्त्वाने गरजवंत लोकांचा न्याय करतील, न्यायाने ते पृथ्वीवरील गरिबांसाठी निर्णय देतील. ते त्यांच्या मुखाच्या काठीने पृथ्वीवर हल्ला करतील; ते त्यांच्या ओठांच्या श्वासाने दुष्टांचा वध करतील.
- यशायाह ११:५सुमारे इ.स.पू. ७१३
धार्मिकता त्यांचा कटिबंध असेल आणि विश्वासूपणा त्यांचा कंबरपट्टा असेल.
- यशायाह ११:६सुमारे इ.स.पू. ७१३
लांडगा कोकऱ्याबरोबर राहील, चित्ता बकरीबरोबर झोपेल, वासरे आणि सिंह एकत्र राहतील; आणि एक लहान बालक त्यांचे मार्गदर्शन करेल.
- यशायाह ११:७सुमारे इ.स.पू. ७१३
गाई अस्वलाबरोबर चरतील, त्यांची पिल्ले एकत्र झोपतील, आणि सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल.
- यशायाह ११:८सुमारे इ.स.पू. ७१३
लहान बाळ नागाच्या गुहेजवळ खेळेल, आणि बालक विषारी फुरसे सर्पाच्या बिळात हात घालेल.
- यशायाह ११:९सुमारे इ.स.पू. ७१३
माझ्या पवित्र पर्वतावर सर्वठिकाणी ते कोणाचेही नुकसान किंवा नाश करणार नाहीत, कारण समुद्र जसा पाण्याने व्यापलेला आहे तशीच पृथ्वी याहवेहच्या ज्ञानाने भरून जाईल.
- यशायाह ११:१०सुमारे इ.स.पू. ७१३
त्या दिवशी इशायाचे मूळ लोकांसाठी ध्वज म्हणून उभे राहील; राष्ट्रे त्यांच्याकडे एकत्र येतील आणि त्यांचे विश्रामस्थान गौरवशाली असेल.
- यशायाह ११:११सुमारे इ.स.पू. ७१३
त्या दिवशी प्रभू अश्शूरमधून, इजिप्तच्या खालील भागामधून, इजिप्तच्या वरील भागामधून, कूशमधून, पथरोसमधून, एलाममधून, शिनारमधून, हमाथमधून आणि भूमध्यसागराच्या बेटांमधून त्यांच्या अवशिष्ट लोकांवर पुन्हा हक्क सांगण्यासाठी दुसऱ्या वेळेस त्यांचा हात पुढे करतील.
- यशायाह ११:१२सुमारे इ.स.पू. ७१३
राष्ट्रांसाठी ते एक ध्वज उभा करतील आणि इस्राएलच्या बंदिवासात गेलेल्यांना एकत्र करतील; पृथ्वीच्या चारही कोपऱ्यातून यहूदीयाच्या विखुरलेल्या लोकांना ते एकत्र जमवतील.
- यशायाह ११:१३सुमारे इ.स.पू. ७१३
एफ्राईमचा मत्सर नाहीसा होईल, आणि यहूदीयाच्या शत्रूंचा नाश होईल; एफ्राईमला यहूदाहचा मत्सर वाटणार नाही, किंवा यहूदाह एफ्राईमबरोबर शतृत्व करणार नाही.
- यशायाह ११:१४सुमारे इ.स.पू. ७१३
ते पश्चिमेला पलिष्ट्यांच्या उतारावर झेपावतील; एकत्र मिळून ते पूर्व दिशेकडील लोकांना लुटतील. एदोम आणि मोआब या देशांना ते जिंकून घेतील, आणि अम्मोनी लोक त्यांच्या अधीन होतील.
- यशायाह ११:१५सुमारे इ.स.पू. ७१३
याहवेह, इजिप्तच्या समुद्राचे आखात कोरडे करतील; होरपळणाऱ्या वाऱ्याने ते फरात नदीवर हात झटकून टाकतील. ते त्याचे सात ओढे पाडतील जेणेकरून पायतणे घालूनही ती ओलांडता येईल.
- यशायाह ११:१६सुमारे इ.स.पू. ७१३
अश्शूरपासून त्यांच्या अवशिष्ट लोकांसाठी जेव्हा ते इजिप्तमधून आले तेव्हा जसा इस्राएलसाठी केला होता, तसा एक राजमार्ग असेल.
- यशायाह १२:१सुमारे इ.स.पू. ७१२
त्या दिवशी तुम्ही म्हणाल: “याहवेह, मी तुमची स्तुती करेन, जरी तुम्ही माझ्यावर रागावला होता, तरी तुमचा राग दूर झाला आहे आणि तुम्ही माझे सांत्वन केले आहे.
- यशायाह १२:२सुमारे इ.स.पू. ७१२
निश्चितच परमेश्वर माझे तारण आहेत; मी भरवसा ठेवेन आणि घाबरणार नाही. याहवेह, याहवेह स्वतः माझे सामर्थ्य आणि माझे संरक्षण आहेत; ते माझे तारण झाले आहेत.”
- यशायाह १२:३सुमारे इ.स.पू. ७१२
तारणाच्या विहिरींतून तुम्ही आनंदाने पाणी काढाल.
- यशायाह १२:४सुमारे इ.स.पू. ७१२
त्या दिवशी तुम्ही म्हणाल: “याहवेहची स्तुती करा, त्यांच्या नावाची घोषणा करा; त्यांनी जे काही केले आहे ते राष्ट्रांमध्ये माहीत होऊ द्या, आणि असे घोषित करा की, त्यांचे नाव गौरवान्वित आहे.