- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- यशायाह १०:५सुमारे इ.स.पू. ७१३
“अश्शूरचा धिक्कार असो, जो माझ्या क्रोधाची काठी आहे, ज्याच्या हातामध्ये माझ्या क्रोधाचा सोटा आहे!
- यशायाह १०:६सुमारे इ.स.पू. ७१३
मी त्याला अधार्मिक राष्ट्राविरुद्ध पाठवितो, मला जे संताप आणतात, अशा लोकांविरुद्ध पाठवितो, त्यांची लूटमार करण्यासाठी आणि लूट हिसकावून घेण्यासाठी, आणि त्यांना रस्त्यांवरील चिखलाप्रमाणे तुडविण्यासाठी.
- यशायाह १०:७सुमारे इ.स.पू. ७१३
परंतु हा त्याचा उद्देश नाही, त्याच्या मनात हे नाही; त्याचा उद्देश आहे की नाश करावा, अनेक राष्ट्रांचा नाश करून त्यांचा अंत करावा.
- यशायाह १०:८सुमारे इ.स.पू. ७१३
‘माझे सेनापती सर्व राजे नाहीत काय?’ असे ते म्हणतात.
- यशायाह १०:९सुमारे इ.स.पू. ७१३
‘कालनो कर्कमीश सारखे नाही काय? हमाथ अर्पादसारखा आणि शोमरोन दिमिष्कसारखा नाही काय?
- यशायाह १०:१०सुमारे इ.स.पू. ७१३
जशी माझ्या हाताने मूर्तींपूजक राज्ये ताब्यात घेतली, अशी राज्ये ज्यांच्या प्रतिमा यरुशलेम आणि शोमरोनपेक्षा श्रेष्ठ होत्या—
- यशायाह १०:११सुमारे इ.स.पू. ७१३
शोमरोन आणि तिच्या मूर्तींबरोबर मी जसा व्यवहार केला तसा व्यवहार मी यरुशलेम आणि तिच्या मूर्तींबरोबर करू नये काय?’ ”
- यशायाह १०:१२सुमारे इ.स.पू. ७१३
जेव्हा प्रभूने सीयोन पर्वत आणि यरुशलेमविरुद्ध त्यांचे सर्व कार्य पूर्ण केले, तेव्हा ते म्हणतील, “मी अश्शूरच्या राजाला त्याच्या अंतःकरणाच्या हेतुपुरस्सर अभिमानाबद्दल आणि त्याच्या नजरेतील गर्विष्ठपणाबद्दल शिक्षा करेन.
- यशायाह १०:१३सुमारे इ.स.पू. ७१३
कारण ते म्हणतात: “ ‘माझ्या हाताच्या शक्तीने मी हे केले आहे, आणि माझ्या शहाणपणाने हे केले आहे, कारण माझ्याकडे समंजसपणा आहे. मी राष्ट्रांच्या सीमा काढून टाकल्या, मी त्यांचे खजिने लुटले; एका बलवानाप्रमाणे मी त्यांच्या राजांना वश केले.
- यशायाह १०:१४सुमारे इ.स.पू. ७१३
जसा कोणी घरट्यात पोहोचतो, तसेच राष्ट्रांच्या संपत्तीसाठी माझा हात पोहोचला. जसे लोक सोडून दिलेली अंडी गोळा करतात, तसे मी सर्व देशांना एकत्र केले; कोणीही पंख फडफडविला नाही, किंवा किलबिल करण्यासाठी तोंड उघडले नाही.’ ”
- यशायाह १०:१५सुमारे इ.स.पू. ७१३
जो कुर्हाड फिरवितो त्याच्यावरच कुऱ्हाड उठते काय, किंवा करवतीचा जो वापर करतो त्याच्याचविरुद्ध ती बढाई मारते काय? जसे एखादा व्यक्ती जी काठी उचलतो तीच त्याच्यावर उगारते काय, किंवा जे लाकूड नाही, त्याला धमकावण्यासाठी जड काठी हवेत फिरते काय!
- यशायाह १०:१६सुमारे इ.स.पू. ७१३
म्हणून, प्रभू, सर्वसमर्थ याहवेह, त्याच्या दणकट योद्ध्यांवर विनाशकारी रोग पाठवतील; त्यांच्या ऐश्वर्यात धगधगत्या ज्योतीसारखा अग्नी प्रज्वलित केला जाईल अग्नी प्रज्वलित केला जाईल.
- यशायाह १०:१७सुमारे इ.स.पू. ७१३
इस्राएलचा प्रकाश अग्नी होईल, त्यांचे पवित्र परमेश्वर एक ज्वाला होतील; त्याचे काटे आणि काटेरी झुडपे ते एकाच दिवसात जळतील व भस्म करतील.
- यशायाह १०:१८सुमारे इ.स.पू. ७१३
ज्याप्रकारे एखादा रोगी क्षय पावतो त्याप्रकारे त्याच्या जंगलांचे आणि सुपीक शेत जमिनींचे वैभव, ते पूर्णपणे नष्ट करतील.
- यशायाह १०:१९सुमारे इ.स.पू. ७१३
आणि त्याच्या जंगलातील राहिलेली झाडे इतकी कमी असतील की, एखादे लहान बालकही त्याची नोंद करेल.
- यशायाह १०:२०सुमारे इ.स.पू. ७१३
त्या दिवशी इस्राएलचे अवशिष्ट, जिवंत राहिलेले याकोबाचे लोक, ज्याने त्यांना मारून टाकले त्याच्यावर यापुढे अवलंबून राहणार नाहीत, परंतु याहवेह, इस्राएलच्या पवित्र परमेश्वरावर ते खरोखरच भरवसा ठेवतील.
- यशायाह १०:२१सुमारे इ.स.पू. ७१३
याकोबाचा राहिलेला प्रत्येकजणही परत येईल, सर्वसमर्थ परमेश्वराकडे परत येईल.
- यशायाह १०:२२सुमारे इ.स.पू. ७१३
हे, इस्राएला, तुझे लोक समुद्राच्या वाळूच्या कणासारखे असली तरी, उरलेलेच मात्र परत येतील. नाश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, परिपूर्ण आणि न्याययुक्त.
- यशायाह १०:२३सुमारे इ.स.पू. ७१३
प्रभू, सर्वसमर्थ याहवेह, नाश करण्याचा हुकूमनामा संपूर्ण देशामध्ये अंमलात आणतील.
- यशायाह १०:२४सुमारे इ.स.पू. ७१३
म्हणून प्रभू, सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “माझे लोकहो, जे तुम्ही सीयोनमध्ये राहता, अश्शूरी लोकांना घाबरू नका, जे तुम्हाला दांडक्याने मारतात. आणि इजिप्तने केले त्याप्रमाणे तुमच्याविरुद्ध सोटा उगारतात.
- यशायाह १०:२५सुमारे इ.स.पू. ७१३
तुमच्याविरुद्ध असलेला माझा राग लवकरच संपेल आणि माझा क्रोध त्यांच्या नाशाच्या मार्गाकडे वळेल.”
- यशायाह १०:२६सुमारे इ.स.पू. ७१३
सर्वसमर्थ याहवेह त्यांना चाबकाने फोडून काढतील, जसे त्यांनी मिद्यानाला ओरेबच्या खडकावर मारले होते; आणि ते त्यांची काठी पाण्यावर उंच करतील, जसे त्यांनी इजिप्तमध्ये केले होते.
- यशायाह १०:२७सुमारे इ.स.पू. ७१३
त्या दिवशी त्यांचे ओझे तुमच्या खांद्यावरून, त्यांचे जू तुमच्या मानेवरून काढून घेतले जाईल. तुमच्या खांद्यावरून जू तुटले जाईल.
- यशायाह १०:२८सुमारे इ.स.पू. ७१३
ते अयाथमध्ये प्रवेश करतात; ते मिग्रोनमधून पुढे जातात; ते मिकमाश येथे पुरवठा साठवितात.
- यशायाह १०:२९सुमारे इ.स.पू. ७१३
ते पुढे पलीकडे जातात आणि म्हणतात, “आम्ही गेबा येथे रात्रभर छावणी टाकू.” रामाह थरथर कापतो; शौलाचा गिबियाह पळून जातो.