- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa AD 30–62
The Early Church
Pentecost ignites a movement; Peter, Paul, and countless others carry the gospel from Jerusalem to the ends of the earth.
या कालखंडातील वचने
- प्रेषित ४:२सुमारे इ.स. ३३
ते अत्यंत अस्वस्थ झाले, कारण प्रेषित शिक्षण देत होते व येशूंच्याद्वारे मृतांचे पुनरुत्थान होईल असे लोकांना जाहीरपणे सांगत होते.
- प्रेषित ४:३सुमारे इ.स. ३३
त्यांनी पेत्र व योहानाला अटक केली आणि संध्याकाळ झाल्यामुळे त्यांना दुसर्या दिवशीही कैदेतच ठेवले.
- प्रेषित ४:४सुमारे इ.स. ३३
त्यांच्यातील अनेकांनी संदेश ऐकला आणि विश्वास ठेवला; म्हणून विश्वास ठेवणार्या पुरुषांची संख्या सुमारे पाच हजारापर्यंत गेली.
- प्रेषित ४:५सुमारे इ.स. ३३
नंतर दुसर्या दिवशी असे झाले की शासक, वडीलजन आणि नियमशास्त्र शिक्षक यरुशलेममध्ये एकत्रित भेटले.
- प्रेषित ४:६सुमारे इ.स. ३३
महायाजक हन्ना तिथे होता, तसेच कयफा, योहान, आलेक्सांद्र आणि महायाजकांच्या कुटुंबातील इतर सर्वजण तिथे हजर होते.
- प्रेषित ४:७सुमारे इ.स. ३३
त्यांनी पेत्र व योहान यांना आपल्यासमोर बोलाविले व त्यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली: “तुम्ही कोणत्या अधिकाराने किंवा कोणाच्या नावाने हे केले आहे?”
- प्रेषित ४:८सुमारे इ.स. ३३
नंतर पेत्र पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन त्यांना म्हणाला: “अधिकारी आणि वडीलजनांनो!
- प्रेषित ४:९सुमारे इ.स. ३३
या लंगड्या मनुष्याच्या बाबतीत दयाळूपणाचे जे कृत्य करण्यात आले व तो कसा बरा झाला याची जर आपण चौकशी करीत असाल,
- प्रेषित ४:१०सुमारे इ.स. ३३
तर मला तुम्हाला आणि सर्व इस्राएली लोकांना सांगू द्या की, ज्या येशूंना तुम्ही क्रूसावर चढवून ठार मारले, परंतु परमेश्वराने त्यांना मरणातून पुनः उठविले, त्याच नासरेथकर येशू ख्रिस्ताच्या नावाने, हा मनुष्य येथे पूर्ण बरा होऊन तुमच्यासमोर उभा आहे.”
- प्रेषित ४:११सुमारे इ.स. ३३
धर्मशास्त्रात याच येशूंबद्दल असे लिहिले आहे, “ ‘जो दगड बांधणार्यांनी नाकारला, तोच इमारतीचा कोनशिला झाला आहे.’
- प्रेषित ४:१२सुमारे इ.स. ३३
तारण दुसर्या कोणामध्येही सापडणार नाही, कारण ज्या नावाने आपले तारण होईल, असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मानवजातीमध्ये दिलेले नाही.”
- प्रेषित ४:१३सुमारे इ.स. ३३
त्यांनी पेत्र व योहान यांचे धैर्य पाहिले तेव्हा त्याचे त्यांना नवल वाटले आणि त्यांना कळून आले की ती अशिक्षित व सर्वसामान्य माणसे असून ते येशूंच्या सहवासात राहत होते.
- प्रेषित ४:१४सुमारे इ.स. ३३
आणि त्या बरे झालेल्या मनुष्याला त्यांच्याजवळ उभे असलेले पाहून, त्यांच्याने काही बोलवेना.
- प्रेषित ४:१५सुमारे इ.स. ३३
त्यावेळी त्यांनी त्यांना न्यायसभेच्या बाहेर जाण्यास सांगितले आणि एकत्र चर्चा केली.
- प्रेषित ४:१६सुमारे इ.स. ३३
“आपण या मनुष्यांचे काय करावे?” ते म्हणाले, “यरुशलेमकरांना माहीत आहे की त्यांनी हा असाधारण चमत्कार करून दाखविला आहे आणि आम्ही हे नाकारू शकत नाही.
- प्रेषित ४:१७सुमारे इ.स. ३३
तरी या गोष्टी लोकांमध्ये अधिक पसरू नये म्हणून आपण त्यांना अशी धमकी द्यावी की यापुढे त्यांनी या नावाने कोणाबरोबर काहीही बोलू नये.”
- प्रेषित ४:१८सुमारे इ.स. ३३
तेव्हा त्यांनी त्यांना परत आत बोलाविले आणि येशूंच्या नावाने पुन्हा बोलू नये किंवा शिक्षण देऊ नये, अशी ताकीद दिली.
- प्रेषित ४:१९सुमारे इ.स. ३३
परंतु पेत्र व योहानाने उत्तर दिले, “परमेश्वराच्या दृष्टीने काय योग्य आहेः तुमचे ऐकावे की त्यांचे? याचा न्याय तुम्हीच करा!
- प्रेषित ४:२०सुमारे इ.स. ३३
ज्यागोष्टी आम्ही पाहिल्या आणि ऐकल्या आहेत, त्याबद्दल सांगण्याचे आम्ही थांबविणार नाही.”
- प्रेषित ४:२१सुमारे इ.स. ३३
अशी धमकी दिल्यानंतर, त्यांनी त्यांना जाऊ दिले. त्यांना कशी शिक्षा करावी, याचा निर्णय ते घेऊ शकले नाही, कारण घडलेल्या गोष्टीमुळे सर्व लोक परमेश्वराचे गौरव करीत होते,
- प्रेषित ४:२२सुमारे इ.स. ३३
जो मनुष्य आश्चर्यकारक रीतीने बरा झाला होता, त्याचे वय चाळीस वर्षांहून अधिक होते.
- प्रेषित ४:२३सुमारे इ.स. ३३
पेत्र व योहानाची सुटका झाल्याबरोबर, ते दुसर्या शिष्यांकडे गेले आणि मुख्य याजकगण आणि वडीलजन जे काही म्हणाले, ते सर्व त्यांना सांगितले.
- प्रेषित ४:२४सुमारे इ.स. ३३
त्यांचे हे विवरण ऐकून सर्व विश्वासणार्यांनी मोठ्या स्वराने मिळून परमेश्वराकडे प्रार्थना केली: “सार्वभौम प्रभू, तुम्ही आकाश, पृथ्वी, सागर व त्यातील सर्वकाही निर्माण केले आहे.
- प्रेषित ४:२५सुमारे इ.स. ३३
पवित्र आत्म्याद्वारे तुम्ही, तुमचा सेवक आणि आमचा पिता दावीदाच्या मुखातून बोलला आहात: “ ‘राष्ट्रे कट का रचत आहेत आणि लोक व्यर्थच कुटिल योजना का करीत आहेत?
- प्रेषित ४:२६सुमारे इ.स. ३३
प्रभू आणि त्यांच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीवरील राजे आणि अधिकारी एकत्र येऊन उठाव करीत आहेत.’