मुख्य मजकुरावर जा

circa AD 30–62

The Early Church

Pentecost ignites a movement; Peter, Paul, and countless others carry the gospel from Jerusalem to the ends of the earth.

1,007 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. प्रेषित ५:१५सुमारे इ.स. ३३

    याचा परिणाम असा झाला की, पेत्र जवळून जात असताना निदान त्याची छाया तरी त्यांच्यातील काही जणांवर पडावी म्हणून आजारी लोकांना बाहेर रस्त्यावर आणून खाटांवर आणि अंथरुणावर ठेवीत असत.

  2. प्रेषित ५:१६सुमारे इ.स. ३३

    यरुशलेमच्या आसपासच्या गावातून लोकसमुदाय येताना त्यांच्याबरोबर आजारी व अशुद्ध आत्म्यांनी पीडलेल्यांना आणत होते आणि ते सर्वजण बरे होऊन जात.

  3. प्रेषित ५:१७सुमारे इ.स. ३३

    नंतर महायाजक आणि त्यांचे सहकारी जे सर्व सदूकी पंथाचे सभासद होते, ते मत्सराने भरून गेले.

  4. प्रेषित ५:१८सुमारे इ.स. ३३

    त्यांनी प्रेषितांना अटक करून सार्वजनिक तुरुंगात डांबले.

  5. प्रेषित ५:१९सुमारे इ.स. ३३

    परंतु रात्रीच्या समयी प्रभूच्या देवदूताने तुरुंगाचे दरवाजे उघडून त्यांना बाहेर काढले.

  6. प्रेषित ५:२०सुमारे इ.स. ३३

    तो म्हणाला, “मंदिराच्या आवारात जा आणि या नवजीवनाबद्दल लोकांना सांगा.”

  7. प्रेषित ५:२१सुमारे इ.स. ३३

    ते पहाटेच मंदिराच्या आवारात गेले आणि त्यांना सांगितल्याप्रमाणे लगेच त्यांनी शिक्षण देण्यास सुरुवात केली. जेव्हा महायाजक व त्यांचे सहकारी आले, तेव्हा त्यांनी न्यायसभा व यहूदी वडीलमंडळीला एकत्र बोलाविले आणि प्रेषितांना तुरुंगातून चौकशीसाठी घेऊन यावे अशी आज्ञा केली.

  8. प्रेषित ५:२२सुमारे इ.स. ३३

    तुरुंगामध्ये गेल्यानंतर, अधिकार्‍यांना तिथे प्रेषित आढळले नाहीत म्हणून ते परतले आणि त्यांना सांगितले की,

  9. प्रेषित ५:२३सुमारे इ.स. ३३

    “तुरुंगाचे दरवाजे व्यवस्थित बंद केलेले होते आणि पहारेकरी दाराबाहेर उभे होते. परंतु आम्ही दरवाजे उघडले, तेव्हा आम्हाला कोणीही आढळले नाही.”

  10. प्रेषित ५:२४सुमारे इ.स. ३३

    मंदिराच्या सुरक्षा अधिकार्‍याने व मुख्य याजकांनी हे ऐकले, तेव्हा पुढे काय घडेल याबद्दल ते घोटाळ्यात पडले.

  11. प्रेषित ५:२५सुमारे इ.स. ३३

    इतक्यात कोणीतरी येऊन सांगितले, “पाहा! ज्यांना तुम्ही तुरुंगात ठेवले होते ती माणसे मंदिराच्या आवारात उभे राहून लोकांना शिक्षण देत आहेत.”

  12. प्रेषित ५:२६सुमारे इ.स. ३३

    तेव्हा सुरक्षा अधिकारी आपल्याबरोबर काही शिपाई घेऊन गेला आणि त्याने प्रेषितांना जुलूम न करता आणले, कारण लोक आपल्याला धोंडमार करतील, अशी त्यांना भीती वाटत होती.

  13. प्रेषित ५:२७सुमारे इ.स. ३३

    प्रेषितांना घेऊन आल्यानंतर, महायाजकाने त्यांना प्रश्न विचारावे म्हणून न्यायसभेपुढे आणून उभे केले.

  14. प्रेषित ५:२८सुमारे इ.स. ३३

    ते म्हणाले, “या नावाने शिकवू नका, असे आम्ही तुम्हाला कडक शब्दात सांगितले होते तरी पाहा, तुम्ही तुमच्या शिक्षणाने सारे यरुशलेम भरून टाकले आहे आणि या मनुष्याच्या रक्ताचा दोष आम्हावर लावण्याचा निश्चय केला आहे.”

  15. प्रेषित ५:२९सुमारे इ.स. ३३

    परंतु पेत्र व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, “आम्ही मनुष्यापेक्षा परमेश्वराची आज्ञा पाळलीच पाहिजे.

  16. प्रेषित ५:३०सुमारे इ.स. ३३

    तुम्ही येशूंना क्रूसावर टांगून मारल्यानंतर आमच्या पूर्वजांच्या परमेश्वराने येशूंना मरणातून पुन्हा जिवंत केले.

  17. प्रेषित ५:३१सुमारे इ.स. ३३

    आता परमेश्वराने त्यांना उच्च केले व राजपुत्र आणि तारणारा म्हणून स्वतःच्या उजवीकडे बसविले आहे, ते यासाठी की इस्राएली लोकांना पश्चात्ताप व पापक्षमेचा लाभ व्हावा.

  18. प्रेषित ५:३२सुमारे इ.स. ३३

    या गोष्टींचे आम्ही साक्षी आहोत आणि पवित्र आत्मा, ज्याला परमेश्वराने जे त्यांची आज्ञा पाळतात त्यांना दिला आहे तोही साक्षी आहे.”

  19. प्रेषित ५:३३सुमारे इ.स. ३३

    हे ऐकल्यावर ते अतिशय संतापले व त्यांना मारून टाकण्याचे त्यांनी ठरविले.

  20. प्रेषित ५:३४सुमारे इ.स. ३३

    परंतु गमालियेल नावाचा एक परूशी, जो शास्त्राध्यापक व सर्व लोकांमध्ये सन्मान्य मानलेला, न्यायसभेपुढे उभा राहिला आणि त्याने या माणसांना थोडा वेळ बाहेर न्यावे, अशी आज्ञा केली.

  21. प्रेषित ५:३५सुमारे इ.स. ३३

    मग तो न्यायसभेला उद्देशून म्हणाला, “अहो इस्राएली लोकहो, या मनुष्यांच्या बाबतीत काही करण्याच्या तुमच्या उद्देशाचा काळजीपूर्वक विचार करा.

  22. प्रेषित ५:३६सुमारे इ.स. ३३

    काही काळापूर्वी थुदास नावाचा मनुष्य पुढे येऊन मी कोणीतरी आहे असे म्हणू लागला, त्याला सुमारे चारशे अनुयायी मिळाले. त्याचा वध करण्यात येऊन सर्व अनुयायांची पांगापांग झाली व सर्वकाही नष्ट झाले.

  23. प्रेषित ५:३७सुमारे इ.स. ३३

    त्याच्यानंतर शिरगणतीच्या वेळी, गालीलकर यहूदाह पुढे आला आणि त्याने एका टोळीस बंडास प्रवृत्त केले. परंतु तो सुद्धा मारला गेला आणि त्याच्या अनुयायांचीही पांगापांग झाली.

  24. प्रेषित ५:३८सुमारे इ.स. ३३

    म्हणून मी तुम्हाला या सद्य परिस्थितीत असा सल्ला देत आहे की या माणसांना सोडून द्या. त्यांना जाऊ द्या, कारण हा बेत किंवा कार्य मनुष्यांचे असेल, तर ते नष्ट होईल.

  25. प्रेषित ५:३९सुमारे इ.स. ३३

    परंतु जर हे परमेश्वराचे असेल, तर तुम्ही या माणसांना थांबविण्यास समर्थ होणार नाही आणि तुम्ही केवळ परमेश्वराविरुद्ध लढत आहात, असे तुम्हाला आढळून येईल.”