- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa AD 30–62
The Early Church
Pentecost ignites a movement; Peter, Paul, and countless others carry the gospel from Jerusalem to the ends of the earth.
या कालखंडातील वचने
- प्रेषित २६:२६सुमारे इ.स. ६२
महाराजांना या गोष्टी माहीत आहेत आणि या गोष्टी मोकळेपणाने मी तुमच्याबरोबर बोलू शकतो. कारण माझी खात्री आहे की या सर्व घटना आपल्या परिचयाच्या आहेत, कारण या गोष्टी कुठे जगाच्या कानाकोपर्यात घडलेल्या नाहीत.
- प्रेषित २६:२७सुमारे इ.स. ६२
अग्रिप्पा महाराज, संदेष्ट्यांवर आपला विश्वास आहे ना? आपण विश्वास ठेवता हे मला माहीत आहे.”
- प्रेषित २६:२८सुमारे इ.स. ६२
अग्रिप्पा मध्येच पौलास म्हणाला, “एवढ्या थोड्या वेळात माझे मन वळवून मला ख्रिस्ती करता येईल असे तुला वाटते का?”
- प्रेषित २६:२९सुमारे इ.स. ६२
पौलाने उत्तर दिले, “पुष्कळ अथवा थोड्या वेळात—परंतु मी परमेश्वराजवळ अशी प्रार्थना करतो की आज माझे बोलणे जे सर्वजण ऐकत आहेत व आपण सुद्धा या बेड्यांशिवाय माझ्यासारखे व्हावे.”
- प्रेषित २६:३०सुमारे इ.स. ६२
तेव्हा राजा, राज्यपाल, बर्णीका व इतर सर्वजण जाण्यासाठी उभे राहिले.
- प्रेषित २६:३१सुमारे इ.स. ६२
आणि त्या दालनातून निघून गेल्यावर, त्यांचे एकमेकाशी असे एकमत झाले, “या मनुष्याला मरणदंडाची अथवा तुरुंगवासाची शिक्षा द्यावी, असे त्याने काहीही केलेले नाही.”
- प्रेषित २६:३२सुमारे इ.स. ६२
अग्रिप्पा फेस्तास म्हणाला, “त्याने कैसराजवळ न्याय मागितला नसता, तर त्याची सुटका करता आली असती.”
- प्रेषित २७:१सुमारे इ.स. ६२
आम्ही इटलीस तारवातून जावे असे ठरले, तेव्हा पौल आणि इतर काही बंदिवानांना बादशाही रक्षकांच्या फलटणीतील यूल्य नावाच्या शताधिपतीच्या ताब्यात देण्यात आले.
- प्रेषित २७:२सुमारे इ.स. ६२
तेव्हा आशियाच्या प्रांतातील किनार्यावरील अनेक बंदरावर थांबत जाणार्या व अद्रमुत्तीय शहरापासून निघालेल्या जहाजात बसून आम्ही समुद्राकडे निघालो, तेव्हा मासेदोनियातील थेस्सलनीका येथील रहिवासी अरिस्तार्ख नावाचा एक मनुष्य आमच्याबरोबर होता.
- प्रेषित २७:३सुमारे इ.स. ६२
दुसर्या दिवशी आम्ही सीदोन बंदरात पोहोचलो; तेव्हा यूल्याने प्रेमाने पौलाला किनार्यावर उतरून मित्रांकडे जाण्याची परवानगी दिली म्हणजे त्याच्या मित्रांद्वारे त्याच्या गरजा भागविल्या जातील.
- प्रेषित २७:४सुमारे इ.स. ६२
तिथून आम्ही पुन्हा समुद्र प्रवासास निघाल्यावर तोंडासमोर वारा येत असल्यामुळे सायप्रसच्या उत्तरेला असलेले बेट आणि मुख्य भूमी यांच्यामधून गेलो.
- प्रेषित २७:५सुमारे इ.स. ६२
आम्ही समुद्राची यात्रा करून किलिकिया व पंफुल्या या प्रांतांच्या किनार्याने जाऊन लुक्यातील मूर्या येथे जाऊन पोहोचलो.
- प्रेषित २७:६सुमारे इ.स. ६२
तिथे शताधिपतीला इटलीस जाणारे आलेक्सांद्रियाचे तारू सापडले तेव्हा त्याने आम्हाला त्या तारवात बसविले.
- प्रेषित २७:७सुमारे इ.स. ६२
मग पुष्कळ दिवस आम्हाला मंद गतीने प्रवास करावा लागला आणि शेवटी आम्ही कनीदस बंदराजवळ आलो. वारा अद्याप तोंडासमोर येत असल्यामुळे क्रेताला वळसा घालून सलमोने शहराकडे जावे लागले.
- प्रेषित २७:८सुमारे इ.स. ६२
पुढे वादळी वार्यातून मोठ्या प्रयासाने हळूहळू मार्ग काढीत दक्षिणेकडील किनार्याने आम्ही सुंदर बंदर जे लसया शहराच्या जवळ होते तिथे आलो.
- प्रेषित २७:९सुमारे इ.स. ६२
बराच वेळ व्यर्थ गेलेला होता आणि समुद्रावरून जाणे धोक्याचे झाले होते आणि आता प्रायश्चित्ताचा दिवस होऊन गेला होता. तेव्हा पौलाने अधिकार्यांना इशारा दिला,
- प्रेषित २७:१०सुमारे इ.स. ६२
तो म्हणाला, “माणसांनो, आपला हा जलप्रवास भीषण आहे कदाचित आपले तारू फुटेल, मालाची हानी होईल आणि आपले जीवसुद्धा धोक्यात येतील.”
- प्रेषित २७:११सुमारे इ.स. ६२
परंतु शताधिपतीने, पौलाच्या सूचनेपेक्षा तांडेल व तारवाचा कप्तान यांचा सल्ला स्वीकारला.
- प्रेषित २७:१२सुमारे इ.स. ६२
कारण हे बंदर खुले असून हिवाळा घालविण्यासाठी सुरक्षित नव्हते, म्हणून बहुतेकांनी सल्ला दिला की, प्रवास पुढे चालू ठेवावा आणि जमल्यास फेनिके बंदरात जाऊन तिथे हिवाळा घालवावा. ते बंदर क्रेता या ठिकाणी होते, दक्षिण-पश्चिम आणि उत्तर-पश्चिम अशा दोन्ही दिशांकडे या बंदराचे तोंड होते.
- प्रेषित २७:१३सुमारे इ.स. ६२
जेव्हा दक्षिणी वारा मंद गतीने वाहू लागला, तेव्हा त्यांना वाटले की आता योग्य संधी आहे; म्हणून त्यांनी नांगर उचलला आणि क्रेताच्या काठाकाठाने ते प्रवास करू लागले.
- प्रेषित २७:१४सुमारे इ.स. ६२
ते फारसे दूर गेलेही नव्हते तोच, युरकुलोन नावाचा ईशान्येकडील तुफानी वारा बेटावरून अतिशय झपाट्याने वाहू लागला.
- प्रेषित २७:१५सुमारे इ.स. ६२
या वादळामध्ये तारू सापडले आणि वारा नेईल तिकडे तारू वाहत जाऊ लागले. आम्हीही तारू वार्याबरोबर वाहू दिले.
- प्रेषित २७:१६सुमारे इ.स. ६२
आम्ही कौदा नावाच्या एका लहान बेटाजवळून जात असताना, मोठ्या प्रयासाने जीवनरक्षक होडी तारवाला बांधू शकलो,
- प्रेषित २७:१७सुमारे इ.स. ६२
मग ती होडीवर घेतल्यानंतर, तारवाचा खालील भाग मजबूत करण्यासाठी दोरांनी आवळून बांधले. कारण त्यांना असे भय वाटू लागले की तारू सुर्तीच्या किनार्यावर जाऊन वाळूत रुतून बसेल. म्हणून त्यांनी जहाजाचे शीड उतरविले आणि जहाजाला वाहवत जाऊ दिले.
- प्रेषित २७:१८सुमारे इ.स. ६२
दुसर्या दिवशी समुद्र अधिकच खवळला. तेव्हा तारू हलके करण्यासाठी खलाशी तारवातील माल समुद्रात टाकू लागले.