मुख्य मजकुरावर जा

circa AD 30–62

The Early Church

Pentecost ignites a movement; Peter, Paul, and countless others carry the gospel from Jerusalem to the ends of the earth.

1,007 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. प्रेषित २७:४४सुमारे इ.स. ६२

    त्याप्रमाणे बाकीच्यांनी कोणी फळ्यांवर तर कोणी तारवाच्या तुकड्यावर बसून जावे. याप्रमाणे प्रत्येकजण किनार्‍यावर सुरक्षितपणे पोहोचला.

  2. प्रेषित २८:१सुमारे इ.स. ६२

    किनार्‍यावर सुरक्षित पोहोचल्यावर, आम्हाला समजले की त्या बेटाचे नाव मलता असे होते.

  3. प्रेषित २८:२सुमारे इ.स. ६२

    त्या बेटावरील लोकांनी आम्हाला असाधारण दया दाखविली. त्यांनी आमच्यासाठी शेकोटी पेटवून आमचे स्वागत केले कारण पाऊस असून थंडी पडली होती.

  4. प्रेषित २८:३सुमारे इ.स. ६२

    तेव्हा पौलाने काटक्या आणून शेकोटीवर ठेवल्या, इतक्यात उष्णता झाल्यामुळे एक विषारी साप बाहेर निघाला व पौलाच्या हाताला विळखा घालून राहिला.

  5. प्रेषित २८:४सुमारे इ.स. ६२

    त्या बेटावरील लोकांनी त्या सर्पाला त्याच्या हाताला झोंबलेले पाहिले, तेव्हा ते एकमेकास म्हणाले, “हा मनुष्य खात्रीने खुनी असला पाहिजे; तो जरी समुद्रातून वाचला, तरी न्याय देवी त्याला जगू देणार नाही.”

  6. प्रेषित २८:५सुमारे इ.स. ६२

    परंतु पौलाने तो साप झटकून अग्नीत टाकला आणि त्याला काहीच इजा झाली नाही.

  7. प्रेषित २८:६सुमारे इ.स. ६२

    आता पौल सुजेल किंवा तत्काळ मरून पडेल अशी लोकांची अपेक्षा होती; परंतु पुष्कळ वेळ वाट पाहिल्यानंतर, काही विशेष झाले नाही हे दिसल्यावर, त्यांनी आपले मन बदलले आणि तो परमेश्वर असावा असे म्हणाले.

  8. प्रेषित २८:७सुमारे इ.स. ६२

    जवळच त्या बेटाच्या पुबल्य नावाच्या मुख्याधिकाऱ्याची मालमत्ता होती. त्याने त्याच्या घरी आमचे स्वागत केले आणि तीन दिवस आदरातिथ्य केले.

  9. प्रेषित २८:८सुमारे इ.स. ६२

    त्याचे वडील बिछान्यावर तापाने व जुलाबाने आजारी होते. पौल त्याला पाहावयास गेला आणि प्रार्थना केल्यानंतर त्याचे हात त्याच्यावर ठेऊन त्याला बरे केले.

  10. प्रेषित २८:९सुमारे इ.स. ६२

    हे घडून आल्यावर, बेटावरील इतर आजारी माणसे त्याच्याकडे आली आणि बरी होऊन गेली.

  11. प्रेषित २८:१०सुमारे इ.स. ६२

    अनेक प्रकारे त्यांनी आमचा सन्मान केला आणि जेव्हा आम्ही समुद्रप्रवासाला निघण्यास तयार झालो, त्यांनी आम्हाला लागणार्‍या सर्व आवश्यक गोष्टींचा पुरवठा केला.

  12. प्रेषित २८:११सुमारे इ.स. ६२

    तीन महिन्यानंतर आलेक्सांद्रियाचे जहाज हिवाळ्यासाठी थांबले होते त्याने आम्ही प्रवास सुरू केला. त्यावर त्याची निशाणी क्यास्टर व पोलक या जुळ्या दैवतांची मूर्ती बसवलेली होती.

  13. प्रेषित २८:१२सुमारे इ.स. ६२

    सुराकूस येथे आम्ही तीन दिवस राहिलो.

  14. प्रेषित २८:१३सुमारे इ.स. ६२

    तिथून आम्ही निघालो आणि रेगियमला पोहोचलो. दुसर्‍या दिवशी दक्षिणेकडील वारा वाहू लागल्यावर, तिथून आम्ही निघालो व एका दिवसाच्या प्रवासानंतर पुत्युलास जाऊन पोहोचलो.

  15. प्रेषित २८:१४सुमारे इ.स. ६२

    तिथे आम्हाला काही विश्वासणारे आढळले आणि त्यांनी आम्हाला त्यांच्याबरोबर एक आठवडाभर राहण्याची विनंती केली. मग आम्ही रोमला आलो.

  16. प्रेषित २८:१५सुमारे इ.स. ६२

    तेथील बंधुजनांनी आम्ही येणार असे ऐकले आणि ते प्रवास करून अप्पियाची पेठ व तीन उतार शाळा या ठिकाणी आम्हाला येऊन भेटले. त्यांना पाहून पौलाने परमेश्वराचे आभार मानले आणि त्याला प्रोत्साहन प्राप्त झाले.

  17. प्रेषित २८:१६सुमारे इ.स. ६२

    पुढे आम्ही रोममध्ये आल्यानंतर, पौलाला एकटे राहण्याची परवानगी देण्यात आली, मात्र पहारा करणारा एक सैनिक त्याच्याबरोबर असे.

  18. प्रेषित २८:१७सुमारे इ.स. ६२

    तीन दिवसानंतर पौलाने स्थानिक यहूदी पुढार्‍यांना एकत्र बोलाविले. ते आल्यावर तो म्हणाला: “माझ्या बंधूंनो, मी आपल्या लोकांविरुद्ध किंवा आपल्या पूर्वजांच्या रूढींचे उल्लंघन केलेले नाही, तरी यरुशलेममध्ये मला बंदिवान करून रोमी सरकारच्या हवाली केले.

  19. प्रेषित २८:१८सुमारे इ.स. ६२

    रोमी लोकांनी माझी चौकशी केली आणि मला सोडून देण्याची त्यांची इच्छा होती, कारण मरणदंडास पात्र असा गुन्हा मी केलेला नव्हता.

  20. प्रेषित २८:१९सुमारे इ.स. ६२

    परंतु यहूद्यांनी माझ्या सुटकेला विरोध केल्यामुळे, कैसराजवळ न्याय मागण्याशिवाय मला दुसरा पर्यायच राहिला नाही. मला खरोखरच माझ्या लोकांविरुद्ध आरोप करावयाचे नव्हते

  21. प्रेषित २८:२०सुमारे इ.स. ६२

    या कारणामुळे मी तुम्हाला आज येथे येण्याची विनंती केली की आपली प्रत्यक्ष भेट घ्यावी व आपल्याबरोबर बोलावे. कारण मी इस्राएलाच्या आशेमुळे या साखळीने बांधलेला आहे.”

  22. प्रेषित २८:२१सुमारे इ.स. ६२

    तेव्हा त्यांनी उत्तर दिले, “तुमच्यासंबंधात आम्हाला यहूदीयातून पत्रेही आली नाहीत आणि तिथून आलेल्या आमच्या बांधवांकडून काही अहवाल कळविण्यात आला नाही

  23. प्रेषित २८:२२सुमारे इ.स. ६२

    परंतु आम्हाला तुमचे विचार ऐकायला हवे आहेत, कारण या पंथाच्या विरुद्ध सर्वत्र लोक बोलत आहेत.”

  24. प्रेषित २८:२३सुमारे इ.स. ६२

    तेव्हा पौलाला भेटण्यासाठी त्यांनी एक दिवस ठरविला आणि फार मोठ्या संख्येने तो राहत होता त्या ठिकाणी आले. तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत, धर्मशास्त्रातून म्हणजे मोशेचे नियमशास्त्र व संदेष्ट्यांचे ग्रंथ यामधून परमेश्वराच्या राज्याविषयी आणि येशूंविषयी शिक्षण देऊन प्रमाण पटवीत राहिला.

  25. प्रेषित २८:२४सुमारे इ.स. ६२

    ऐकणार्‍यांपैकी काहींनी खात्रीपूर्वक विश्वास ठेवला, परंतु काहींनी ठेवला नाही.