मुख्य मजकुरावर जा

circa AD 48–96

Letters to the Churches

Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.

2,767 वचने · 21 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. गलातीकरांस ५:१९सुमारे इ.स. ५८

    देहस्वभावाची कृत्ये उघड आहेत: लैंगिक अनैतिकता, अशुद्धता आणि दुर्व्यसनीपणा,

  2. गलातीकरांस ५:२०सुमारे इ.स. ५८

    मूर्तिपूजा आणि जादूटोणा, द्वेष, मतभेद, मत्सर, क्रोध, स्वार्थी इच्छा, कलह, तट,

  3. गलातीकरांस ५:२१सुमारे इ.स. ५८

    हेवा, दारुबाजी, गोंधळ आणि अशा प्रकारच्या गोष्टी ज्याबद्दल मी तुम्हाला पूर्वी सावध केले होते की जे कोणी असे जीवन जगतात त्यांना परमेश्वराच्या राज्याचे वतन मिळणार नाही.

  4. गलातीकरांस ५:२२सुमारे इ.स. ५८

    परंतु आत्म्याचे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, दयाळूपणा, चांगुलपणा, विश्वासूपणा,

  5. गलातीकरांस ५:२३सुमारे इ.स. ५८

    सौम्यता व आत्मसंयमन; अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही.

  6. गलातीकरांस ५:२४सुमारे इ.स. ५८

    जे ख्रिस्त येशूंचे आहेत, त्यांनी आपल्या दैहिक वासनांना व इच्छांना क्रूसावर खिळले आहे.

  7. गलातीकरांस ५:२५सुमारे इ.स. ५८

    जर आपण आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो, तर आत्म्याच्या प्रेरणेने चालावे.

  8. गलातीकरांस ५:२६सुमारे इ.स. ५८

    तर आता आपण गर्विष्ठ होऊ नये व एकमेकांना चीड आणू नये.

  9. गलातीकरांस ६:१सुमारे इ.स. ५८

    प्रिय बंधू व भगिनींनो, जर कोणी पापात सापडला, तर तुम्ही जे आत्मिक आहात त्या तुम्ही त्याला सौम्य रीतीने सुधारावे. तुम्ही स्वतःस सांभाळा, कदाचित तुम्हीही मोहात पडाल.

  10. गलातीकरांस ६:२सुमारे इ.स. ५८

    एकमेकांची ओझी वाहा, आणि अशा रीतीने ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल.

  11. गलातीकरांस ६:३सुमारे इ.स. ५८

    आपण कोणी नसताना कोणी आहोत असा विचार करणारा स्वतःचीच फसगत करतो.

  12. गलातीकरांस ६:४सुमारे इ.स. ५८

    प्रत्येकाने आपल्या कृतींची परीक्षा करावी, कारण मगच त्याला स्वतःबद्दल आढ्यता बाळगता येईल आणि स्वतःची इतरांबरोबर तुलना करण्याची गरज वाटणार नाही.

  13. गलातीकरांस ६:५सुमारे इ.स. ५८

    आपल्यातील प्रत्येकाने आपापला भार वाहिला पाहिजे.

  14. गलातीकरांस ६:६सुमारे इ.स. ५८

    ज्यांना परमेश्वराच्या वचनातून शिक्षण मिळाले आहे, त्यांनी शिक्षण देणार्‍याला सर्व चांगल्या गोष्टींचा वाटा द्यावा.

  15. गलातीकरांस ६:७सुमारे इ.स. ५८

    फसविले जाऊ नका; परमेश्वराचा उपहास करू शकत नाही. कारण मनुष्य जे पेरतो तेच कापतो!

  16. गलातीकरांस ६:८सुमारे इ.स. ५८

    जो देहाकरीता पेरतो, त्याला देहापासून नाशाचे पीक मिळेल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याला संतुष्ट करण्यासाठी पेरतो त्याला पवित्र आत्म्यापासून सार्वकालिक जीवनाचे पीक मिळेल.

  17. गलातीकरांस ६:९सुमारे इ.स. ५८

    योग्य ते करण्याचा आपल्याला कंटाळा येऊ नये, कारण आपण थकलो नाही तर योग्य वेळी पिकांची कापणी करू.

  18. गलातीकरांस ६:१०सुमारे इ.स. ५८

    म्हणून शक्य होईल आणि जशी आपणास संधी मिळेल तसे आपण सर्वांचे भले करावे, विशेषकरून विश्वासणार्‍यांच्या कुटुंबाचे चांगले करावे.

  19. गलातीकरांस ६:११सुमारे इ.स. ५८

    मी स्वतःच्याच हाताने मोठ्या अक्षरांनी तुम्हाला लिहित आहे!

  20. गलातीकरांस ६:१२सुमारे इ.स. ५८

    जे दैहिकरितीने लोकांवर छाप पाडावयास पाहतात ते तुम्ही सुंता करून घ्यावी यासाठी दबाव टाकतात. ते एकाच कारणामुळे की ख्रिस्ताच्या क्रूसामुळे होणारा छळ त्यांना टाळता यावा.

  21. गलातीकरांस ६:१३सुमारे इ.स. ५८

    ज्यांची सुंता झाली ते सुद्धा नियम पाळीत नाहीत; तरी देखील तुमची सुंता व्हावी ही त्यांची इच्छा आहे, म्हणजे त्यांना तुमच्या दैहिक सुंतेची प्रौढी मिरविता येईल.

  22. गलातीकरांस ६:१४सुमारे इ.स. ५८

    आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाशिवाय इतर कशाचीही प्रौढी मिरवावी असे माझ्याकडून न होवो त्याद्वारे मी जगाला व जग मला क्रूसावर खिळलेले आहे.

  23. गलातीकरांस ६:१५सुमारे इ.स. ५८

    सुंता होणे किंवा न होणे याला काही महत्त्व नाही; नवी उत्पत्ती हेच महत्त्वाचे आहे.

  24. गलातीकरांस ६:१६सुमारे इ.स. ५८

    जे हा नियम पाळतील त्या सर्वांवर व परमेश्वराच्या इस्राएलावर शांती व दया असो.

  25. गलातीकरांस ६:१७सुमारे इ.स. ५८

    येथून पुढे मला कोणी त्रास देऊ नये, कारण माझ्या शरीरावर मी येशूंची चिन्हे वागवितो.