मुख्य मजकुरावर जा

circa AD 48–96

Letters to the Churches

Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.

2,767 वचने · 21 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. गलातीकरांस ४:२५सुमारे इ.स. ५८

    आता हागार ही अरबस्थानातील सीनाय पर्वत असा आहे आणि आता अस्तित्वात असलेल्या यरुशलेम शहराचे प्रतीक आहे, कारण ती तिच्या संतानाबरोबर दास्यात आहे.

  2. गलातीकरांस ४:२६सुमारे इ.स. ५८

    परंतु यरुशलेम जी वर आहे ती स्वतंत्र आहे आणि ती आपली मातृनगरी आहे.

  3. गलातीकरांस ४:२७सुमारे इ.स. ५८

    जसे यशायाहने लिहिले आहे: “हे वांझ स्त्रिये, तू जी कधीही प्रसवली नाही; उचंबळून गीत गा, मोठ्याने जयघोष कर, कारण विवाहित स्त्रीपेक्षा, तू, जिला प्रसूती वेदना झाल्या नाही, त्या परित्यक्ता स्त्रीला अधिक लेकरे आहेत,”

  4. गलातीकरांस ४:२८सुमारे इ.स. ५८

    आता बंधू व भगिनींनो, आपण इसहाकासारखे अभिवचनाची मुले आहोत.

  5. गलातीकरांस ४:२९सुमारे इ.स. ५८

    त्यावेळेस दैहिकरित्या जन्मलेल्या पुत्राने आत्म्याच्या शक्तीने जन्मलेल्या पुत्राचा छळ केला तसेच आताही होत आहे.

  6. गलातीकरांस ४:३०सुमारे इ.स. ५८

    पण शास्त्रलेखात काय लिहिले आहे? “दासी व तिचा पुत्र यांना घालवून द्या, कारण दासीचा पुत्र स्वतंत्र स्त्रीच्या पुत्राबरोबर कधीही वारस होणार नाही.”

  7. गलातीकरांस ४:३१सुमारे इ.स. ५८

    प्रिय बंधू व भगिनींनो, आपण दासीपुत्र नाही, तर आपण स्वतंत्र स्त्रीची मुले आहोत.

  8. गलातीकरांस ५:१सुमारे इ.स. ५८

    ख्रिस्ताने स्वातंत्र्यासाठी आपल्याला मुक्त केले आहे, म्हणून त्यामध्ये स्थिर राहा व पुन्हा दास्यत्वाच्या जोखडाखाली सापडू नका.

  9. गलातीकरांस ५:२सुमारे इ.स. ५८

    माझे ऐकून घ्या! मी पौल तुम्हाला सांगतो की जर तुम्ही स्वतः सुंता करून घेत असाल, तर ख्रिस्ताचा तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही.

  10. गलातीकरांस ५:३सुमारे इ.स. ५८

    मी पुन्हा प्रत्येक मनुष्यास जाहीर करतो की जो कोणी आपली सुंता करून घेईल, तो पूर्ण नियमशास्त्र आचरण्यास बांधलेला आहे.

  11. गलातीकरांस ५:४सुमारे इ.स. ५८

    तुम्ही नीतिमान ठरावे म्हणून नियमांचे पालन करता ते तुम्ही ख्रिस्तापासून वेगळे झाले आहात; आणि परमेश्वराच्या कृपेला अंतरले आहात.

  12. गलातीकरांस ५:५सुमारे इ.स. ५८

    आम्ही पवित्र आत्म्याद्वारे नीतिमत्व प्राप्त करावे या विश्वासाने आशा धरून वाट पाहत आहोत.

  13. गलातीकरांस ५:६सुमारे इ.स. ५८

    ख्रिस्त येशूंमध्ये सुंता होणे किंवा न होणे याला काही महत्त्व नाही; फक्त एकच गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे विश्वास प्रीतीद्वारे प्रकट व्हावा.

  14. गलातीकरांस ५:७सुमारे इ.स. ५८

    तुम्ही चांगली धाव धावत होता तर तुम्हाला सत्याचे पालन करण्यास कोणी अडखळण केले?

  15. गलातीकरांस ५:८सुमारे इ.स. ५८

    हे मन वळविण्याचे काम ज्यांनी तुम्हाला पाचारण केले आहे त्याच्याकडून होत नाही.

  16. गलातीकरांस ५:९सुमारे इ.स. ५८

    “थोडे खमीर सर्व पिठाच्या गोळ्याला फुगविते.”

  17. गलातीकरांस ५:१०सुमारे इ.स. ५८

    मला प्रभूमध्ये विश्वास आहे, की तुम्ही अन्य विचारांचा स्वीकार करणार नाही. तुम्हाला गोंधळात टाकणारा मग तो कोणीही का असेना, त्याला दंड भोगावा लागेल.

  18. गलातीकरांस ५:११सुमारे इ.स. ५८

    बंधू व भगिनींनो, मी जर अजूनही सुंतेचा प्रचार करतो तर माझा छळ अजूनही का होतो? तर मग क्रूसाच्या अडथळ्याचे निर्मूलन झाले असते.

  19. गलातीकरांस ५:१२सुमारे इ.स. ५८

    जे तुम्हाला हैराण करणारे आहेत, त्यांनी स्वतःला पूर्णरीतीने नपुंसक करून घ्यावे एवढीच माझी इच्छा आहे.

  20. गलातीकरांस ५:१३सुमारे इ.स. ५८

    बंधू व भगिनींनो, तुम्हाला स्वतंत्र होण्यासाठी बोलाविले आहे. पण तुमचे स्वातंत्र्य देहवासना पूर्ण करण्यासाठी वापरू नका, तर प्रीतीने व नम्रपणाने एकमेकांची सेवा करा.

  21. गलातीकरांस ५:१४सुमारे इ.स. ५८

    कारण सर्व नियमशास्त्र या एका आज्ञेत सामावलेले आहे: “जशी तुम्ही स्वतःवर तशी तुमच्या शेजार्‍यावर प्रीती करा.”

  22. गलातीकरांस ५:१५सुमारे इ.स. ५८

    तुम्ही एकमेकांना टोचता व खाऊन टाकता तर एकमेकांचा नाश परस्परांच्या हातून होऊ नये म्हणून सांभाळा.

  23. गलातीकरांस ५:१६सुमारे इ.स. ५८

    मी तुम्हाला सांगतो, आत्म्याच्या प्रेरणेने चला, मग तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही.

  24. गलातीकरांस ५:१७सुमारे इ.स. ५८

    दैहिक इच्छा आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देहाविरुद्ध आहे. ते आपसात विरोधी आहेत, यासाठी की ज्यागोष्टी तुम्ही केल्या पाहिजे त्या तुम्ही करू नये.

  25. गलातीकरांस ५:१८सुमारे इ.स. ५८

    जर तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालता तर तुम्ही नियमशास्त्राधीन नाही.