मुख्य मजकुरावर जा

Jerusalem

753 verses · 2 known names

हे नावानेही ओळखले जाते: Jerusalem's

31.7700, 35.2300 गूगल नकाशावर पाहा

Jerusalem चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. पहिल्या महिन्याच्या बाराव्या दिवशी अहवा कालव्यापासून तळ उठवून आम्ही यरुशलेमकडे निघालो. आमच्या परमेश्वराचा वरदहस्त आम्हावर होता आणि वाटेत त्यांनी शत्रू व लुटारू यांच्यापासून आमचे रक्षण केले.

  2. अशा तर्‍हेने आम्ही यरुशलेमला पोहोचलो, तिथे तीन दिवस विश्रांती घेतली.

  3. आम्ही गुलाम आहोत, पण आमच्या परमेश्वराने आम्हाला गुलामगिरीतही सोडून दिले नाही. त्याऐवजी पर्शियाच्या राजाच्या नजरेत आम्हाला अशी कृपा दिली आहे: आमच्या परमेश्वराच्या मंदिराची पुनर्बांधणी करण्यासाठी आणि त्याचा जीर्णोद्धार करण्यासाठी आम्हाला नवीन जीवन दिले आहे. आम्हाला यहूदीया आणि यरुशलेम येथे संरक्षणासाठी तटबंदी दिली आहे.

  4. मग संबध यहूदीयात व यरुशलेमात असे जाहीर करण्यात आले की बंदिवासातून परतलेल्या प्रत्येक इस्राएलीने यरुशलेमला यावे.

  5. तीन दिवसांच्या आत, नवव्या महिन्याच्या विसाव्या दिवशी, यहूदाहचे व बिन्यामीनचे सर्व लोक यरुशलेमात येऊन पोहोचले व परमेश्वराच्या मंदिरासमोर चौकात बसले. या प्रकरणाच्या गांभीर्यामुळे व जोरदार पावसामुळे ते अत्यंत क्लेशजनक स्थितीत होते.

  6. माझ्या यहूदी बांधवांपैकी हनानी नावाचा एक बंधू मला भेटण्यासाठी काही लोकांना बरोबर घेऊन यहूदीयाहून आला. बंदिवासातील अवशिष्ट यहूदाहचे व यरुशलेमचे कसे काय चालले आहे याची मी चौकशी केली.

  7. त्यांनी उत्तर दिले, “जे बंदिवासातील उरलेले बंधू आहेत व त्या प्रदेशात राहू लागले आहेत, ते फारच कष्टात व निंदनीय परिस्थितीत आहेत. यरुशलेमचा तट पडलेल्याच अवस्थेत आहे आणि त्याच्या वेशी जाळून टाकलेल्या आहेत.”

  8. यरुशलेमला पोहोचल्यावर तिथे तीन दिवस राहिल्यानंतर,

  9. मी थोडे लोक बरोबर घेऊन रात्रीचा बाहेर पडलो. यरुशलेमबद्दल परमेश्वराने माझ्या मनात उत्पन्न केलेली योजना मी कोणालाही सांगितलेली नव्हती. मी स्वार असलेल्या पशूशिवाय इतर कोणताही पशू आमच्यासोबत नव्हता.

  10. आम्ही खोरेवेशीतून बाहेर पडलो आणि कोल्ह्याच्या विहिरीवरून, उकिरडा वेशीतून, यरुशलेमच्या पडलेल्या भिंती व जळालेल्या वेशी पाहण्यास गेलो.

  11. मग मी त्यांना सांगितले, “आपल्या शहराची दुर्दशा तुम्हा सर्वांना माहीतच आहे: यरुशलेम उद्ध्वस्त झालेले आहे आणि त्याच्या वेशी जळालेल्या आहेत. आपण यरुशलेमच्या तटाची पुनर्बांधणी करू आणि आपल्यावरील हा कलंक धुऊन टाकू.”

  12. पण मी उत्तर दिले, “स्वर्गाचे परमेश्वर आम्हाला यश देतील. आम्ही त्यांचे सेवक या तटाची पुनर्बांधणी करू, परंतु यरुशलेममध्ये वा त्यातील ऐतिहासिक कार्यात तुमचा काहीही सहभाग व अधिकार असणार नाही.”

  13. हरहयाहचा पुत्र उज्जीएल व्यवसायाने सोनार होता, त्यानेही पुढच्या तटाची डागडुजी केली. त्याच्या शेजारी अत्तरे तयार करणारा हनन्याह होता. त्यानेसुद्धा डागडुजी केली. या दोघांनी यरुशलेमातील रुंद भिंती पर्यंत डागडुजी केली.

  14. यरुशलेमच्या अर्ध्या जिल्ह्याचा अधिकारी हूरचा पुत्र रफायाहने त्यांच्या शेजारच्या तटाची डागडुजी केली.

  15. त्याच्या शेजारी यरुशलेमच्या दुसर्‍या अर्ध्या जिल्ह्याचा अधिकारी हल्लोहेशचा पुत्र शल्लूमाने व त्याच्या कन्यांनी डागडुजी केली.

  16. पण सनबल्लट, तोबीयाह अरबी, अम्मोनी व अश्दोदी यांनी ऐकले की यरुशलेमच्या तटाचे काम झपाट्याने पुढे चालले आहे आणि तटाची खिंडारे बुजू लागलेली आहेत, तेव्हा ते अतिशय संतप्त झाले.

  17. त्यांनी यरुशलेममध्ये दंगे व गोंधळ निर्माण करण्याचा कट केला.

  18. त्यावेळी मी सर्व लोकांना सांगितले, “प्रत्येकाने रात्रीच्या मुक्कामाला यरुशलेमच्या आतच राहावे, म्हणजे ते रात्री पहार्‍याचे व दिवसा तटाच्या बांधकामाचे कार्य करू शकतील.”

  19. आणि अशी घोषणा करण्यासाठी तू यरुशलेममध्ये संदेष्ट्याची नेमणूक केली आहेस की: ‘यहूदीयामध्ये आता एक राजा आहे!’ ही बातमी राजाकडे जाणार आहे; म्हणून इकडे येऊन या गोष्टी आमच्याशी बोल.”

  20. मी यरुशलेमच्या शासनाची जबाबदारी माझा भाऊ हनानी व गढीचा अधिपती हनन्याह यांना दिली. हनन्याह अत्यंत विश्वासू असून सर्व लोकांपेक्षा तो परमेश्वराचे भय अधिक बाळगत असे.

  21. मी त्यांना म्हणालो, “यरुशलेमच्या वेशी सूर्य बराच उष्ण होईपर्यंत उघडण्यात येऊ नयेत. पहारेकरी कामावर असतानाच, सर्व वेशींना अडसर लावून त्या बंद करण्यात याव्या. तसेच यरुशलेममधील रहिवाशांनाच पहारेकरी म्हणून नेमावे. काहीजण त्यांच्या चौकीवर तर काहींनी त्यांच्या घराजवळच्या भागाचे रक्षण करावे.”

  22. बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने जे लोक धरून नेले होते, त्यातील जे बंदिवासातून प्रांतात परतले त्यांच्या नावांची यादी ही आहे (ते यरुशलेम व यहूदीया येथे येऊन आपआपल्या गावी परतले.

  23. देशातील सर्व शहरांमध्ये आणि विशेषतः यरुशलेममध्ये हे वचन जाहीर करावेः “लोकांनी डोंगरावर जाऊन जैतून, रानजैतून, मेंदी, खजुरी व दाट पालवीच्या वृक्षांच्या फांद्या व डाहळ्या आणून त्याचे शास्त्रात लिहिल्याप्रमाणे तात्पुरते मांडव तयार करावे व सणाच्या काळामध्ये या मांडवांमध्येच राहावे.”

  24. आता लोकांचे अधिकारी यरुशलेममध्ये स्थायिक झाले. बाकीच्या लोकातील दहापैकी एकाने यरुशलेम, पवित्र नगरीत येऊन राहावे म्हणून चिठ्ठ्या टाकून त्यांची निवड करण्यात आली, व उरलेल्या नऊ लोकांनी स्वतःच्या नगरात राहावे.

  25. यावेळी यरुशलेमला जे स्वखुशीने गेले त्यांचा लोकांनी बहुमान केला.