मुख्य मजकुरावर जा

Jerusalem

753 verses · 2 known names

हे नावानेही ओळखले जाते: Jerusalem's

31.7700, 35.2300 गूगल नकाशावर पाहा

Jerusalem चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यरुशलेमला येणार्‍या प्रांताधिकार्‍यांच्या नावांची यादी पुढे दिली आहे (आता काही इस्राएली, याजक, लेवी, मंदिराचे सेवक व शलोमोनच्या सेवकांचे वंशज यहूदीयाच्या नगरात स्वतःच्या वतनांतच राहिले, प्रत्येकजण निरनिराळ्या नगरातील स्वतःच्या मालकीच्या भूमीवर स्थायी झाला.

  2. पण यहूदाह व बिन्यामीन यांच्या गोत्रातील इतर सर्व यरुशलेमात राहिले): यहूदीयाच्या गोत्रातील: अथायाह, हा उज्जीयाहचा पुत्र, तो जखर्‍याहचा पुत्र, तो अमर्‍याहचा पुत्र, तो शफाट्याहचा पुत्र, तो महलालेलाचा पुत्र, तो पेरेसाचा वंशज होता;

  3. पेरेसाचे जे वंशज यरुशलेममध्ये राहत होते ते सर्व 468 वीरपुरुष होते.

  4. यरुशलेमच्या लेव्यांवर व परमेश्वराच्या भवनात सेवेकर्‍यांचा प्रमुख अधिकारी उज्जी, हा बानीचा पुत्र, तो हशब्याहाचा पुत्र, तो मत्तन्याहचा पुत्र, जो मीखाहचा पुत्र होता. उज्जी, हा आसाफाचा वंशज होता. त्याचे कूळ परमेश्वराच्या भवनातील संगीतकार म्हणून सेवा करीत होते.

  5. यरुशलेमच्या नवीन तटाच्या समर्पणविधीमध्ये भाग घेण्यासाठी देशातील सर्वच लेवी जिथे कुठे असतील तिथून शोधून यरुशलेम येथे पाचारण करण्यात आले, जेणेकरून या विधीमध्ये त्यांनी भाग घेऊन साह्य करावे, झांजा, सारंग्या, वीणा यांच्या संगीतासह गीते गाऊन उपकारस्तुती करावी आणि हा आनंदोत्सवाचा सोहळा साजरा करावा.

  6. संगीतकारांनाही यरुशलेम सभोवतालच्या प्रदेशातून व नटोफाथी प्रांतातून आणले.

  7. बेथ-गिलगाल, गेबाच्या प्रांतातून व अजमावेथ येथूनही हे संगीतकार आले, कारण त्यांनी यरुशलेमच्या सभोवती आपली उपनगरे बांधली होती.

  8. या आनंदाच्या दिवशी अनेक मोठमोठी अर्पणे करण्यात आणली, कारण परमेश्वराने त्यांना फार मोठा हर्ष दिला होता. स्त्रिया व मुलांनी देखील आनंद व्यक्त केला. यरुशलेममधील लोकांच्या आनंदाचे निनाद दूरवर ऐकू आले.

  9. हे सर्वकाही होत असताना, मी यरुशलेमात नव्हतो, कारण बाबेलचा राजा अर्तहशश्तच्या कारकिर्दीच्या बत्तिसाव्या वर्षी मी त्याच्याकडे परतलो होतो. काही काळानंतर मी त्याला परवानगी मागितली,

  10. आणि मी यरुशलेमला परत आलो. तेव्हा मला एल्याशीबाने तोबीयाहास परमेश्वराच्या मंदिरातील अंगणात एका कोठार देण्याचे गैरकृत्य केल्याचे कळले.

  11. त्या दिवसात मी यहूदीयातील काही पुरुषांना शब्बाथ दिवशी द्राक्षकुंडांत द्राक्षे तुडविताना व धान्यांच्या पेंढ्या आणून गाढवांवर लादतांना, त्याचप्रमाणे द्राक्षारस, द्राक्षे, अंजीर व इतर पदार्थांचे ओझे शब्बाथ दिवशी यरुशलेमला विक्रीसाठी घेऊन जाताना पाहिले. तेव्हा मी त्यांना त्या दिवशी हे विक्री करण्यास विरोध केला.

  12. सोरचेही काही लोक मासे व नाना प्रकारचे पदार्थ यरुशलेमला आणून शब्बाथ दिवशी यहूदीयांना लोकांना विकत असत.

  13. यरुशलेमच्या वेशींवर संध्याकाळचा अंधार पडेपर्यंत सर्व दारे बंद केली जावीत व ती शब्बाथ संपेपर्यंत उघडली जाऊ नयेत असा मी आदेश दिला. मग मी माझी काही माणसे वेशीवर पहारा ठेवण्यासाठी नेमली. यासाठी की कुठल्याही प्रकारचा माल शब्बाथ दिवशी शहरात आणला जाऊ नये.

  14. सर्वप्रकारच्या सामानाचे व्यापारी व विक्रेते यांनी यरुशलेमबाहेर एक दोनदा रात्र घालविली.

  15. बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने यरुशलेमातील यहूदीयाचा राजा यकोन्याह च्याबरोबर व इतर अनेकांना बाबेलला बंदिवासात नेले, तेव्हा मर्दखय यालाही पकडून नेले.

  16. सीयोनचे हित करणे, यरुशलेमेचे कोट बांधणे तुम्हाला प्रसन्न करो.

  17. पृथ्वीवरील राजे यरुशलेमातील तुमच्या मंदिराच्या गौरवामुळे तुम्हाला भेटी घेऊन येत आहेत.

  18. आसाफाचे एक स्तोत्र. हे परमेश्वरा, इतर राष्ट्रांनी तुमच्या वतनावर आक्रमण केले आहे; त्यांनी तुमचे पवित्र मंदिर भ्रष्ट केले आहे, आणि यरुशलेम नगरी नासधुशीचा ढीग झाली आहे.

  19. त्यांनी लोकांचे रक्त यरुशलेमच्या सभोवती पाण्याप्रमाणे वाहविले आहे, मृतांना पुरण्यासाठी कोणीही जिवंत नाही.

  20. म्हणजे सर्व लोक याहवेह देवाची महिमा सीयोनात जाहीर करतील आणि यरुशलेमात त्यांची स्तुती करतील.

  21. यरुशलेमात, तुमच्यासमक्ष याहवेहच्या या मंदिराच्या अंगणात ते पूर्ण करेन. याहवेहचे स्तवन करा.

  22. अगे यरुशलेमे, आम्ही आता आपले पाऊल तुझ्या वेशीच्या आत ठेवले आहे.

  23. यरुशलेम नगरी अशी बांधलेली आहे, जशी एखादी सुसंबद्धपणे रचलेली नगरी.

  24. यरुशलेमवरील शांतीसाठी प्रार्थना करा की या नगरीवर प्रीती करणार्‍या सर्वांची सुरक्षा होवो.

  25. यरुशलेमला वेष्टण करणारे पर्वत जसे तिचे रक्षण करतात, तसेच आता आणि सदासर्वकाळ, याहवेह आपल्या लोकांना वेष्टून त्यांचे रक्षण करतात.