मुख्य मजकुरावर जा

Jerusalem

753 verses · 2 known names

हे नावानेही ओळखले जाते: Jerusalem's

31.7700, 35.2300 गूगल नकाशावर पाहा

Jerusalem चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याहवेह सीयोनातून तुला आशीर्वादित करो; तुझे आयुष्यभर तू यरुशलेमची समृद्धी बघशील.

  2. सीयोनातून याहवेहचे स्तवन होवो, अहो यरुशलेमातील सर्व रहिवाशांनो, याहवेहचे स्तवन करा. याहवेहचे स्तवन करा.

  3. हे यरुशलेम, मी तुला विसरलो, तर माझा उजवा हात त्याचे कौशल्य विसरो;

  4. जर मी यरुशलेमला माझा सर्वोच्च आनंद मानत नसेन, तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो.

  5. हे याहवेह, माझ्या देवा, यरुशलेमचा पाडाव झाला त्या दिवशी एदोमाच्या वंशजांनी काय केले याचे स्मरण करा. ते आरोळ्या मारत होते, “तिला जमीनदोस्त करा, तिचा पाया देखील ढासळून टाका.”

  6. यरुशलेम याहवेहची निर्मिती आहे; इस्राएलाच्या निर्वासितांचे तिथे पुनर्वसन करत आहेत.

  7. यरुशलेम, याहवेहचा महिमा कर; सीयोने, आपल्या परमेश्वराची स्तुती कर.

  8. यरुशलेम येथील दावीद राजाचा पुत्र, उपदेशकाची वचने:

  9. मी, उपदेशक, यरुशलेममध्ये इस्राएलचा राजा होतो.

  10. मी स्वतःला म्हटले, “पाहा, यरुशलेममध्ये माझ्या आधी राज्य करून गेलेल्या राजांपेक्षा, मी अधिक सुज्ञान प्राप्त केले आहे; सुज्ञान आणि विद्या यांचा मला सर्वात अधिक अनुभव घडला आहे.”

  11. मी दास व दासी खरेदी केले आणि माझ्या घरात जन्मलेले इतर दास देखील होते. माझ्यापूर्वी यरुशलेममध्ये कोणाही कडे नव्हते इतके जास्त कळप आणि गुरे माझ्या मालकीचे होते.

  12. माझ्यापूर्वी यरुशलेममध्ये असलेल्यांपेक्षा मी फार थोर झालो. या सर्वांमध्ये माझे ज्ञान माझ्यासोबत राहिले.

  13. अहो यरुशलेमच्या कन्यांनो, मी सावळी असूनही सुंदर आहे, केदारच्या काळ्या तंबूसारखी, शलोमोनच्या डेर्‍याच्या पडद्यासारखी.

  14. यरुशलेमच्या कन्यांनो, तुम्हाला रानातील मृगांची आणि हरिणीची शपथ, त्याची इच्छा आहे तोपर्यंत माझ्या प्रेमाला जागे करू नका.

  15. यरुशलेमच्या कन्यांनो, तुम्हाला रानातील मृगांची आणि हरिणीची शपथ, त्याची इच्छा आहे तोपर्यंत माझ्या प्रेमाला जागे करू नका.

  16. त्याचे खांब चांदीचे आहेत, त्याचे तळ सोन्याचे आहे. त्यातील बैठक जांभळ्या वस्त्रांची आहे, तिच्या आतील भागाला यरुशलेमच्या कन्यांनी प्रेमाने वेलबुट्टीने मढविले आहे. यरुशलेमच्या तरुणीकडून प्रेमपूर्वक भेट.

  17. यरुशलेमच्या कन्यांनो, मला हे वचन द्या, मी तुम्हावर एक कामगिरी सोपविते— जर तुम्हाला माझा प्रियकर सापडला, तर तुम्ही त्याला काय सांगाल? मी त्याच्या प्रेमासाठी झुरत आहे, असे सांगा.

  18. त्याचे मुख परममधुर आहे; तो सर्वस्वी सुंदर आहे. यरुशलेमच्या कन्यांनो, हाच माझा प्रियकर, हाच माझा मित्र आहे.

  19. माझ्या प्रिये, तू तिरजाह नगरीसारखी सुंदर आहेस, जसे यरुशलेम मनोहर आहे, जसे ध्वज फडकविणारे विजयी सैन्य तशी तू ऐश्वर्यशाली आहे.

  20. यरुशलेमच्या कन्यांनो, मी तुम्हाला शपथ घालते: इच्छा आहे तोपर्यंत माझ्या प्रेमाला जागे करू नका.

  21. यहूदीयाचे राजे उज्जीयाह, योथाम, आहाज आणि हिज्कीयाहच्या शासनकाळात आमोजाचा पुत्र यशायाहने यहूदीया आणि यरुशलेम संबंधी दृष्टान्त पाहिला.

  22. यहूदीया व यरुशलेमविषयी आमोजाचा पुत्र यशायाहने पाहिलेला दृष्टान्त:

  23. अनेक लोक येतील आणि म्हणतील, “चला, आपण याहवेहच्या पर्वताकडे, याकोबाच्या परमेश्वराच्या मंदिराला जाऊ. ते आपले मार्ग आम्हाला शिकवतील, म्हणजे आम्ही त्या मार्गावर चालू.” कारण सीयोनमधून नियमशास्त्र, यरुशलेमातून याहवेहचे वचन बाहेर जाईल.

  24. आता बघा, प्रभू सर्वसमर्थ याहवेह यरुशलेम व यहूदीयाचा अन्नपुरवठा आणि पाठिंबा दोन्हीही बंद करणार आहेत— सर्व अन्नाचा पुरवठा आणि पाण्याचा पुरवठा,

  25. यरुशलेम डगमगत आहे, यहूदीया कोसळत आहे; त्यांचे बोलणे आणि कृत्ये याहवेहच्या विरोधात आहेत, त्यांच्या गौरवशाली उपस्थितीला त्यांनी विरोध केला.