मुख्य मजकुरावर जा

Gilead

80 verses · 2 known names

हे नावानेही ओळखले जाते: Gileadites

32.0400, 35.7200 गूगल नकाशावर पाहा

Gilead चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यार्देनेच्या पूर्वेकडे (यरीहोच्या पलीकडे) त्यांनी रऊबेन गोत्राच्या पठारावरील रानात असलेले बेसेर, गाद गोत्राच्या प्रदेशातील गिलआदातील रामोथ; आणि मनश्शेहच्या गोत्राच्या प्रदेशातील बाशानातील गोलान ही आश्रयस्थाने म्हणून वेगळी केली.

  2. गादच्या गोत्राकडून: गिलआद मधील रामोथ (हत्येचा आरोप असलेल्या व्यक्तीसाठी आश्रय शहर), महनाईम,

  3. तेव्हा रऊबेनचे गोत्र, गादचे गोत्र आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रांनी गिलआद, जो प्रदेश त्यांना याहवेहच्या आज्ञेनुसार मोशेकडून मिळाला होता, त्याकडे परत जाताना कनानातील शिलोह येथे इस्राएली लोकांचा निरोप घेतला.

  4. म्हणून इस्राएली लोकांनी एलअज़ार याजकाचा पुत्र फिनहासला गिलआदाच्या प्रदेशाकडे रऊबेन, गाद व मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राकडे पाठविले.

  5. जेव्हा ते गिलआद येथे रऊबेन, गाद, आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राकडे गेले; आणि त्यांना म्हणाले:

  6. मग एलअज़ार याजकाचा पुत्र फिनहास आणि पुढार्‍यांचे रऊबेनी व गाद लोकांशी गिलआद येथे बोलणे झाल्यावर ते कनानाकडे परतले व इस्राएली लोकांना वृत्तांत सांगितला.

  7. गिलआद यार्देनेपलीकडे राहिला, पण दान आपल्या जहाजांपाशीच का राहिला? आशेर सागरकिनारीच राहिला आणि खाडीतील त्याच्या सुरक्षित स्थळी राहिला.

  8. त्याचे तीस पुत्र होते, जे तीस गाढवांवर स्वार होत असत. गिलआद येथील तीस नगरे त्यांच्या अधिकारात होती. ती आज देखील हव्वोथ-याईर म्हणून संबोधली जातात.

  9. ज्यांनी त्या वर्षी त्यांची दाणादाण केली आणि त्यांना चिरडून टाकले. अठरा वर्षे त्यांनी अमोऱ्यांचा देश असलेल्या गिलआदामध्ये यार्देन नदीच्या पूर्वेकडील सर्व इस्राएली लोकांवर अत्याचार केला.

  10. जेव्हा अम्मोनी लोकांना युद्धासाठी एकत्र करण्यात आले आणि त्यांनी गिलआदामध्ये तळ ठोकला, तेव्हा इस्राएली लोक एकत्र आले आणि त्यांनी मिस्पाह येथे तळ दिला.

  11. गिलआदाच्या लोकांचे पुढारी एकमेकांना म्हणाले, “जो कोणी अम्मोनी लोकांवर हल्ला करण्यास पुढाकार घेईल तो गिलआदामध्ये राहणार्‍या सर्वांचा प्रमुख होईल.”

  12. जेव्हा अम्मोनी इस्राएल लोकांशी लढत होते, तेव्हा गिलआदाचे वडीलजन इफ्ताहाला आणण्यास तोब येथे गेले.

  13. गिलआदाच्या वडीलजनांना इफ्ताह म्हणाला, “तुम्ही माझा द्वेष केला नाही का आणि मला माझ्या वडिलांच्या घरातून हाकलून लावले होते ना? जेव्हा तुम्ही संकटात आहात तेव्हा आता तुम्ही मजकडे का आलात?”

  14. गिलआदाच्या वडीलजनांनी इफ्ताहाला म्हटले, “आम्ही तुझ्याकडे यासाठी आलो आहेत की; तू आमच्यासोबत अम्मोनी लोकांविरुद्ध युद्ध करण्यास ये आणि गिलआद मधील रहिवाशांचा प्रमुख हो.”

  15. गिलआदाच्या वडीलजनांना इफ्ताहाने उत्तर दिले, “समजा तुम्ही मला अम्मोनी लोकांशी लढण्यासाठी परत नेले आणि याहवेहने ते मला दिले तर मी खरोखर तुमचा प्रमुख होईन काय?”

  16. गिलआदाच्या वडिलांनी इफ्ताहाला उत्तर दिले, “याहवेह आमचे साक्षी आहेत; तुम्ही सांगाल तसे आम्ही नक्कीच करू.”

  17. तेव्हा इफ्ताह गिलआदाच्या वडिलांसोबत गेला आणि लोकांनी त्याला त्यांचा प्रमुख व सेनापती केले. आणि त्याने मिस्पाह येथे याहवेहसमोर आपले सर्व शब्द पुन्हा सांगितले.

  18. मग याहवेहचा आत्मा इफ्ताहावर आला. तो गिलआद व मनश्शेह पार करून गिलआदाच्या मिस्पेह येथे गेला आणि तिथून त्याने अम्मोनी लोकांवर आक्रमण केले.

  19. मग इफ्ताहाने गिलआदाच्या माणसांना एकत्र बोलाविले आणि एफ्राईमच्या विरुद्ध युद्ध केले. गिलआदाच्या माणसांनी एफ्राईमच्या लोकांना मारले, कारण ते म्हणाले होते, “तुम्ही गिलआदाचे लोक एफ्राईमातून व मनश्शेहतून पळपुटे आहात.”

  20. गिलआदांनी एफ्राईमकडे जाणारे यार्देनेचे खोरे काबीज केले आणि जेव्हा एफ्राईममधील कोणी वाचला व म्हणाला, “मला ओलांडू दे,” तेव्हा गिलआदाचे लोक त्याला विचारीत, “तू एफ्राईमी आहेस का?” जर तो म्हणाला, “नाही,”

  21. इफ्ताहाने सहा वर्षे इस्राएलचे नेतृत्व केले. मग गिलआदी इफ्ताह मरण पावला आणि त्याला गिलआदाच्या एका गावात पुरण्यात आले.

  22. तेव्हा दानपासून ते बेअर-शेबापर्यंतचे आणि गिलआदाच्या प्रदेशातून सर्व इस्राएली एकत्र आले आणि मिस्पाह येथे याहवेहसमोर जमा झाले.

  23. काही इब्री लोक तर यार्देनपासून गाद आणि गिलआदापलिकडे गेले. परंतु शौल गिलगालातच राहिला आणि जे लोक त्याच्याबरोबर होते ते भीतीने कंपित झाले होते.

  24. त्याने गिलआद, अशुरी, येज्रील आणि एफ्राईम, बिन्यामीन व सर्व इस्राएलवर त्याला राजा नेमले.

  25. अबशालोम व इस्राएली सैन्याने गिलआद देशात तळ दिला.