मुख्य मजकुरावर जा

Gilead

80 verses · 2 known names

हे नावानेही ओळखले जाते: Gileadites

32.0400, 35.7200 गूगल नकाशावर पाहा

Gilead चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. नंतर ते गिलआद व तहतीम होदशी या प्रांतात गेले व तिथून दान यअनकडून वळसा घेऊन सीदोनकडे गेले.

  2. बेन-गेबेर हा रामोथ-गिलआदवर (मनश्शेहहचा पुत्र याईरची गावे, त्याचप्रमाणे बाशानातील अर्गोब व त्यातील तटबंदीची व कास्याच्या अडसरांची फाटके असलेली साठ मोठी नगरे याच्याकडे होती);

  3. उरीचा पुत्र गेबेर हा गिलआद प्रांतावर (अमोर्‍यांचा राजा सीहोन आणि बाशानचा राजा ओग यांचा प्रदेश). त्या जिल्ह्यावर तो एकटाच अधिकारी होता.

  4. गिलआद येथील तिश्बे नगरातील उपरी म्हणून राहणाऱ्यापैकी एलीयाह तिश्बे अहाबाला म्हणाला, “याहवेह, इस्राएलचे जिवंत परमेश्वर ज्यांची मी सेवा करतो त्यांची शपथ, मी सांगितल्याशिवाय येणार्‍या काही वर्षांमध्ये दहिवर किंवा पाऊस पडणार नाही.”

  5. यार्देनच्या पूर्वेकडील भागापासून संपूर्ण गिलआद (गाद, रऊबेन आणि मनश्शेहचा भाग), आर्णोन खोर्‍याच्या जवळील अरोएरापासून गिलआद व बाशानपर्यंतचे सर्व प्रदेश जिंकले.

  6. त्याचा एक मुख्य अधिकारी, रमाल्याहचा पुत्र पेकहने त्याच्याविरुद्ध कट रचला. गिलआदी लोकांपैकी पन्नास लोकांना बरोबर घेऊन त्याने पेकाहियाहला, अर्गोब आणि अरये यांच्यासह शोमरोन येथील राजवाड्याच्या वाड्यात मारले. पेकहने पेकाहियाहयाचा वध केला आणि त्याच्या जागी राजा झाला.

  7. इस्राएलचा राजा पेकहच्या कारकिर्दीत अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर याने इस्राएलवर स्वारी केली आणि इय्योन, आबेल-बेथ-माकाह, यानोहा, केदेश, हासोर, गिलआद, गालील व नफतालीचा सर्व भाग जिंकला आणि लोकांना कैद करून अश्शूरास नेले.

  8. सगूबास याईर झाला, याईराने गिलआद प्रांतात तेवीस शहरांचे नियंत्रण केले.

  9. पूर्वेकडे फरात नदीजवळील रानाच्या सीमेपर्यंत त्यांनी वस्ती केली, कारण गिलआद देशात त्यांचे पशुधन भरपूर वाढले होते.

  10. शौलाच्या कारकिर्दीत त्यांनी हगरी लोकांशी युद्ध करून त्यांचा संहार केला; व गिलआदाच्या पूर्वेकडे असलेल्या सगळ्या हगरी प्रदेशातील त्या लोकांच्या डेर्‍यात ते वस्ती करू लागले.

  11. गादचे लोक गिलआदात व बाशानात व तेथील गावात आणि शारोनच्या शिवारात आपल्या सीमेत वस्ती करून राहिले.

  12. आणि गाद गोत्रातून गिलआदी रामोथ व त्याचे शिवार, महनाईम व त्याचे शिवार,

  13. हेब्रोन्यातील यरीयाह हा त्यांच्या वंशावळीच्या नोंदीनुसार त्यांचा कुटुंबप्रमुख होता. (दावीद राजाच्या शासनकाळात चाळिसाव्या वर्षी शिरगणतीत शोध घेण्यात आला. गिलआदामधील हिब्रोनी याजेरमध्ये सक्षम पुरुष आढळून आले.

  14. गिलआदातील मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रावर: जखर्‍याहचा पुत्र इद्दो; बिन्यामीन गोत्रावर: अबनेरचा पुत्र यासीएल;

  15. गिलआद माझा आहे. मनश्शेह माझा आहे. एफ्राईम माझे शिरस्त्राण आहे. यहूदाह माझा राजदंड आहे.

  16. गिलआद माझा आहे. मनश्शेह माझा आहे; एफ्राईम माझे शिरस्त्राण आहे, यहूदाह माझा राजदंड आहे.

  17. किती सुंदर आहेस तू, माझ्या प्रिये! आहा, किती सुंदर आहेस! तुझ्या पडद्याआड तुझे नयन कबुतरे आहेत. तुझे केस त्या शेरडांच्या कळपाप्रमाणे आहेत ज्या गिलआदाच्या टेकड्यांवरून झळकतात.

  18. माझ्यावरून तू आपली दृष्टी काढ; कारण तुझे नयन मला भारावून सोडतात. तुझे केस गिलआद डोंगरावर चकाकणार्‍या शेळ्यांच्या कळपाप्रमाणे आहेत.

  19. गिलआदात काही औषध नाही का? तिथे कोणी वैद्य नाही का? मग माझ्या लोकांच्या जखमा तिथे बऱ्या का होत नाहीत?

  20. कारण या यहूदीयांच्या राजवाड्यासंबंधी, याहवेह असे म्हणाले: “जरी तू मला गिलआद प्रांतासारखा आहे, व लबानोनच्या शिखरासारखा आहेस, मी निश्चितच तुझा विध्वंस करून तुला ओसाड आणि निर्जन नगरीसारखे करेन.

  21. “हे इजिप्तच्या कुमारिके, वर गिलआदामध्ये जाऊन औषध आण. तुझे घाव बरे व्हावे म्हणून तू अनेक औषधे वापरलीस, पण तुझे घाव बरे करेल असे औषधच नाही.

  22. पण मी इस्राएलला त्यांच्या स्वतःच्या कुरणात परत आणेन, ते कर्मेल व बाशान येथे चरतील; एफ्राईम व गिलआदच्या डोंगरावर ते खाऊन तृप्त होतील.

  23. पूर्वेकडील सीमा हवरान व दिमिष्कमधून जात, यार्देन नदीच्या बाजूने गिलआद व इस्राएल देशातून, मृत समुद्रापर्यंत जाईल आणि पुढे तामारपर्यंत. ही पूर्वेकडील सीमा.

  24. गिलआद हे दुष्कर्म करणारे शहर आहे, त्यावर रक्ताची पावले उमटली आहेत.

  25. गिलआद दुष्ट आहे काय? त्याचे लोक निरुपयोगी आहेत! ते गिलगालात बैलांचे अर्पण करतात का? त्यांच्या वेद्या नांगरलेल्या शेतातील दगडांच्या ढिगार्‍यासारख्या असतील.