- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Jonathan
Jonathan चा उल्लेख असलेली वचने
योनाथान रागाने संतप्त होऊन मेजावरून उठला; चंद्रदर्शन सणाच्या दुसर्या दिवशी त्याने भोजन केले नाही; कारण दावीदाप्रित्यर्थ आपल्या पित्याची लज्जास्पद वागणूक पाहून त्याला फार वाईट वाटले.
सकाळी योनाथान एका लहान मुलाला घेऊन दावीदाची भेट घेण्यासाठी शेतात गेला.
जेव्हा तो मुलगा योनाथानचा बाण ज्या ठिकाणी पडला होता तिथे आला, तेव्हा योनाथान त्याला ओरडून म्हणाला, “बाण तुझ्या पलीकडे नाही काय?”
तेव्हा योनाथान ओरडला, “घाई कर. लवकर जा! थांबू नकोस!” त्या मुलाने बाण उचलला आणि त्याच्या धन्याकडे परतला.
(त्या मुलाला या सर्व गोष्टीबद्दल काही माहीत नव्हते; फक्त योनाथान आणि दावीद यांनाच ते माहीत होते.)
नंतर योनाथानने आपली शस्त्रे त्या मुलाकडे देत म्हटले, “जा, हे घेऊन परत नगराकडे जा.”
योनाथान दावीदाला म्हणाला, “शांतीने जा, कारण याहवेहच्या नावाने आपण एकमेकांशी मैत्रीची शपथ घेतली आहे, आपण असे म्हटले आहे, ‘तुझ्या आणि माझ्यामध्ये आणि तुझे वंशज आणि माझे वंशज यामध्ये याहवेह साक्षी आहेत.’ ” तेव्हा दावीद तिथून निघाला आणि योनाथान नगराकडे परत गेला.
आणि शौलाचा पुत्र योनाथान होरेश येथे दावीदाकडे गेला आणि त्याने दावीदाला मदत केली व परमेश्वराठायी सबळ केले.
तेव्हा त्या दोघांनी याहवेहसमोर एक करार केला. नंतर योनाथान घरी गेला, परंतु दावीद होरेश येथेच राहिला.
पलिष्ट्यांनी शौल आणि त्याच्या पुत्रांचा जोरात पाठलाग केला आणि त्यांनी त्याचे पुत्र योनाथान, अबीनादाब आणि मलकी-शुआ यांना ठार मारले.
दावीदाने विचारले, “काय झाले आहे, ते मला सांग.” त्याने उत्तर दिले, “सैनिक युद्धातून पळून गेले, पुष्कळजण पडले आणि मरण पावले. शौल आणि त्याचा पुत्र योनाथान हे सुद्धा मरण पावले आहेत.”
तेव्हा ज्या तरुणाने निरोप आणला होता त्याला दावीदाने विचारले, “शौल आणि त्याचा पुत्र योनाथान हे मरण पावले हे तुला कसे समजले?”
शौल आणि त्याचा पुत्र योनाथान आणि याहवेहचे सैन्य आणि इस्राएली राष्ट्र यांच्यासाठी त्यांनी शोक केला आणि ते रडले आणि संध्याकाळपर्यंत उपास केला कारण ते तलवारीने मारले गेले होते.
शौल आणि त्याचा पुत्र योनाथान यांच्याविषयी दावीदाने हे विलापगीत रचले,
“वध केलेल्यांच्या रक्तापासून शूरवीरांच्या मांसापासून योनाथानचा बाण मागे फिरला नाही, शौलाची तलवार असमाधानाने परत आली नाही.
शौल आणि योनाथान, जिवंत असता प्रिय व आवडते होते, मृत्यूमध्येही त्यांचा वियोग झाला नाही. ते गरुडांपेक्षा वेगवान होते, सिंहांपेक्षा बलवान असे होते.
“हे बलवान युद्धात कसे पडले! योनाथान तुमच्या डोंगरावर मारला गेला आहे.
योनाथान माझ्या भावा, मी तुझ्यासाठी शोक करतो; तू मला फार प्रिय होतास. माझ्यावरील तुझे प्रेम अद्भुत असे होते, स्त्रीच्या प्रेमापेक्षा ते अधिक अद्भुत होते!
(शौलाचा पुत्र योनाथानचा एक पुत्र होता तो दोन्ही पायांनी अधू होता. येज्रील येथून शौल आणि योनाथान यांच्याविषयी वर्तमान आले, तेव्हा तो पाच वर्षाचा होता. त्याची दाई त्याला घेऊन पळाली, परंतु ती निघण्याच्या घाईत असताना तो पडला आणि अपंग झाला. त्याचे नाव मेफीबोशेथ असे होते.)
दावीदाने विचारले, “योनाथानप्रीत्यर्थ ज्याच्यावर मी कृपा करावी असा शौलाच्या घराण्यातील कोणी अजून राहिला आहे काय?”
राजाने विचारले, “मी परमेश्वराची कृपा दाखवावी असा शौलाच्या घराण्यातील कोणीही जिवंत नाही काय?” सीबाने राजाला उत्तर दिले, “योनाथानचा एक पुत्र अजूनही जिवंत आहे; तो दोन्ही पायांनी अधू आहे.”
जेव्हा शौलाचा पुत्र योनाथानचा पुत्र मेफीबोशेथ दावीदाकडे आला व त्याच्या आदरार्थ त्याने खाली वाकून दंडवत घातले. दावीद म्हणाला, “मेफीबोशेथ!” “मी तुमच्या सेवेस हजर आहे,” त्याने उत्तर दिले.
दावीद त्याला म्हणाला, “भिऊ नकोस! कारण तुझा पिता योनाथान याच्याप्रीत्यर्थ मी तुझ्यावर अवश्य दया करेन. तुझे आजोबा शौल यांच्या मालकीची सर्व जमीन मी तुला परत देईन आणि तू नेहमी माझ्या मेजावर भोजन करशील.”
शौलाचा पुत्र योनाथान व दावीदामध्ये याहवेहसमोर झालेल्या शपथेमुळे राजाने शौलाचा पुत्र योनाथान याचा पुत्र मेफीबोशेथ याची गय केली.
दावीद गेला आणि याबेश-गिलआद येथील नागरिकांकडून शौल आणि त्याचा पुत्र योनाथान यांच्या अस्थी घेतल्या. (त्यांनी त्यांची शरीरे बेथ-शान नगराच्या चौकातून चोरली होती, जिथे पलिष्ट्यांनी शौलाला गिलबोआत मारून टाकल्यानंतर त्यांना तिथे टांगले होते.)