मुख्य मजकुरावर जा

Joab

120 वचने · 3 कुटुंब सदस्य

Joab चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. पण तसे काही नाही. एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील एक मनुष्य, जो बिकरीचा पुत्र शबा याने दावीद राजाविरुद्ध आपला हात उगारला आहे. हा मनुष्य माझ्या स्वाधीन कर, म्हणजे मी शहर सोडून जाईन.” ती स्त्री योआबाला म्हणाली, “त्याचे शिर तुझ्याकडे तटावरून टाकले जाईल.”

  2. ती स्त्री आपल्या शहाणपणाचा हा सल्ला घेऊन सर्व लोकांकडे गेली आणि त्यांनी बिकरीचा पुत्र शबा याचे शिर कापून योआबाकडे फेकून दिले. तेव्हा योआबाने रणशिंग फुंकले आणि त्याचे लोक शहर सोडून आपआपल्या घरी निघून गेले. आणि योआब यरुशलेमास राजाकडे परत गेला.

  3. योआब इस्राएलच्या सर्व सैन्याचा सेनापती होता; यहोयादाचा पुत्र बेनाइयाह करेथी व पेलेथी यांचा प्रमुख होता;

  4. जेरुइयाहचा पुत्र योआबचा भाऊ अबीशाई हा तिघांचा प्रमुख होता. त्याने आपला भाला तीनशे लोकांवर उगारून त्यांना मारून टाकले होते, म्हणून तो या तिघांप्रमाणेच प्रसिद्ध झाला होता.

  5. तीस जण येणेप्रमाणे होते: योआबाचा भाऊ असाहेल, बेथलेहेमकर दोदोचा पुत्र एलहानान,

  6. अम्मोनी सेलेक, बैरोथचा नाहाराई, जो जेरुइयाहचा पुत्र योआब याचा शस्त्रवाहक होता,

  7. म्हणून राजाने योआब व त्याच्या बरोबरच्या सेनापतींना सांगितले, “दानपासून बेअर-शेबापर्यंत इस्राएलच्या सर्व गोत्रांमधून फिरून, लढाऊ पुरुषांची नोंदणी करा, म्हणजे ते किती आहेत ते मला कळेल.”

  8. परंतु योआबाने राजाला उत्तर दिले, “याहवेह आपले परमेश्वर आपल्या सैन्यातील संख्या शंभरपटीने वाढवो आणि माझे स्वामी ते आपल्या डोळ्यांनी पाहो. परंतु गणती करावी अशी इच्छा राजा का बाळगतात?”

  9. तथापि, राजाच्या शब्दापुढे योआब व सेनापतींचे म्हणणे सफल झाले नाही; तेव्हा ते इस्राएलच्या लढाऊ पुरुषांची गणती करण्यासाठी राजापुढून निघून गेले.

  10. योआबाने राजाला योद्धे पुरुषांच्या संख्येचा अहवाल दिला: इस्राएलमध्ये धनुर्धारी आठ लाख व यहूदीयामध्ये पाच लाख पुरुष होते.

  11. जेरुइयाहचा पुत्र योआब आणि अबीयाथार याजक यांच्याशी अदोनियाहने चर्चा केली आणि त्यांनी त्याला पाठिंबा दिला.

  12. त्याने मोठ्या संख्येने पशू, पुष्ट वासरे आणि मेंढरे यांचा यज्ञ केला आणि त्याने राजाच्या सर्व पुत्रांना, अबीयाथार याजक आणि सैन्याचा सेनापती योआब यांना आमंत्रित केले, पण आपला सेवक शलोमोनला त्याने बोलाविले नाही.

  13. अदोनियाह आणि त्याच्याबरोबर असलेल्या सर्व पाहुण्यांनी मेजवानी संपत असता हा आवाज ऐकला. कर्ण्यांचा आवाज ऐकताच योआबाने विचारले, “शहरात हा सर्व आवाज का येत आहे?”

  14. “तर तू स्वतः समजून घे की जेरुइयाहचा पुत्र योआब माझ्याशी कसा वागला; इस्राएलच्या सैन्याचे दोन सेनापती, नेरचा पुत्र अबनेर आणि येथेरचा पुत्र अमासा यांना त्याने काय केले. त्याने त्यांना जसे युद्धकाळात मारावे तसे शांतीच्या काळात जिवे मारले आणि त्या रक्ताने त्याचा कंबरपट्टा आणि पायतणे डागाळली आहेत.

  15. शलोमोन राजाने त्याच्या आईला उत्तर दिले, “तू अदोनियाहसाठी शूनेमकरीण अबीशग हिची विनंती का करतेस? तू त्याच्यासाठी राज्य मागू शकतेस; शेवटी तो माझा थोरला भाऊ आहे; होय, त्याच्यासाठी आणि अबीयाथार याजक व जेरुइयाहचा पुत्र योआब यांच्यासाठी देखील मागू शकतेस!”

  16. जेव्हा योआबाला ही बातमी कळली, तो याहवेहच्या मंडपाकडे पळून गेला आणि वेदीवरील शिंगे धरून राहिला. अबशालोमसोबत तो जरी मिळाला नव्हता तरीही अदोनियाहसोबत त्याने कट रचला होता.

  17. शलोमोन राजाला सांगण्यात आले की योआब याहवेहच्या मंडपात पळून जाऊन वेदीच्या बाजूला आहे. तेव्हा शलोमोनने यहोयादाचा पुत्र बेनाइयाह याला हुकूम दिला, “जा, त्याच्यावर वार कर.”

  18. तेव्हा बेनाइयाह याहवेहच्या मंडपामध्ये गेला आणि योआबाला म्हणाला, “राजा म्हणतो ‘बाहेर ये!’ ” परंतु त्याने उत्तर दिले, “नाही, मी येथेच मरेन.” तेव्हा बेनाइयाहने राजाला कळवले, “योआबाने मला असे उत्तर दिले.”

  19. तेव्हा राजाने बेनाइयाहला आज्ञा केली, “तो म्हणतो तसे कर. त्याला मारून त्याला गाडून टाक आणि योआबाने विनाकारण रक्त सांडल्याच्या दोषातून मला व माझ्या सर्व कुटुंबाला मुक्त कर.

  20. त्यांच्या रक्ताचा दोष योआबाच्या व त्याच्या वंशजांच्या माथ्यावर सर्वकाळ असो. परंतु दावीद व त्याचे वंशज, त्याचे घराणे आणि त्याचे राजासन यावर याहवेहची शांती सदा असो.”

  21. काही वर्षापूर्वी योआबाचा सेनापती एदोम, जो मृतांना पुरण्यास गेला होता, तेव्हा दावीदाने त्याच्याशी युद्ध केले होते आणि एदोमातील सर्व पुरुषांना मारून टाकले होते.

  22. एदोमातील सर्व पुरुषांना मारेपर्यंत योआब व सर्व इस्राएली लोक सहा महिने तिथेच राहिले.

  23. इजिप्तमध्ये असताना हदादने ऐकले की दावीद आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आहे आणि सैन्याचा अधिकारी योआब देखील मरण पावला होता. तेव्हा हदाद फारोहला म्हणाला, “मी आपल्या स्वदेशास जावे म्हणून मला जाऊ द्यावे.”

  24. त्यांच्या बहिणी सरुवा व अबीगईल. जेरुइयाहचे अबीशाई, योआब व असाहेल असे तिघे पुत्र होते.

  25. दावीद म्हणाला, “जो कोणी यबूसींवर हल्ला करण्यात पुढाकार घेईल तो सेनापती होईल.” मग जेरुइयाहचा पुत्र योआबने पहिल्याने आक्रमण करण्यास गेल्यामुळे तो दावीदाच्या सैन्याचा सेनापती झाला.