मुख्य मजकुरावर जा

Joab

120 वचने · 3 कुटुंब सदस्य

Joab चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. दावीदाने मिल्लोपासून गडाभोवतालच्या शहराच्या भागाचा विस्तार केला आणि योआबाने बाकी यरुशलेमची पुनर्बांधणी केली.

  2. योआबाचा भाऊ अबीशाई हा तिघांचा प्रमुख होता. त्याने आपला भाला तीनशे लोकांविरुद्ध उगारून त्यांचा वध केला होता, म्हणून तो या तिघांप्रमाणेच प्रसिद्ध झाला होता.

  3. दावीदाचे पराक्रमी योद्धे हे होते: योआबाचा भाऊ असाहेल, बेथलेहेमकर दोदोचा पुत्र एलहानान,

  4. अम्मोनी सेलेक, जेरुइयाहचा पुत्र योआब याचा शस्त्रवाहक बैरोथचा नाहाराई,

  5. जेरुइयाहचा पुत्र योआब सर्व सैन्याचा सेनापती होता; आणि अहीलुदचा पुत्र यहोशाफाट नोंदणी करणारा.

  6. हे ऐकून, दावीदाने संपूर्ण लढाऊ सैन्यासह योआबाला पाठवले.

  7. शत्रूचे सैन्य आपल्यापुढे व मागे आहे हे योआबाला समजले; तेव्हा त्याने इस्राएली सैन्यातून उत्तम योद्धे निवडले व त्यांना अरामी सैन्याशी लढण्यास पाठविले.

  8. तेव्हा योआब आणि त्याच्या बरोबरचे सैन्य अराम्यांशी लढण्यास पुढे गेले आणि ते अरामी त्याच्यापुढून पळून गेले.

  9. जेव्हा अम्मोनी सैन्याला समजले की, अरामी सैन्याने पळ काढला आहे, तेव्हा त्यांनी सुद्धा त्याचा भाऊ अबीशाई याच्यापुढून पळ काढून ते शहरात गेले. तेव्हा योआब यरुशलेमास परत गेला.

  10. त्याकाळी वसंतॠतूमध्ये, राजे लोक युद्धावर जात असे, योआबाने इस्राएली सैन्याला युद्धासाठी नेले. त्याने अम्मोन्यांची भूमी उद्ध्वस्त केली व राब्बाह शहराला वेढा घातला, परंतु दावीद यरुशलेमात राहिला. योआबने राब्बाहवर हल्ला करून त्याचा नाश केला.

  11. म्हणून दावीदाने योआब आणि इतर मुख्य सेनापतींना सांगितले, “जा आणि संपूर्ण इस्राएलींची बेअर-शेबापासून दानापर्यंत शिरगणती करा, म्हणजे ते किती आहेत ते मला कळेल.”

  12. परंतु योआबाने उत्तर दिले, “याहवेह आपल्या सैन्याची शंभरपटीने वाढ करो. माझ्या धनीराजा, ती सर्व आपलीच प्रजा नाही का? मग गणती करावी अशी इच्छा राजा का बाळगतात? इस्राएलवर आपण दोष का आणावा?”

  13. तथापि, राजाच्या शब्दापुढे योआब व सेनापतींचे म्हणणे सफल झाले नाही; आणि योआब सर्व इस्राएलभर प्रवास करून यरुशलेमास परतला.

  14. योआबाने दावीदाला योद्धे पुरुषांच्या संख्येचा अहवाल दिला: यहूदीयामधील चार लक्ष सत्तर हजार मिळून सर्व इस्राएलमध्ये अकरा लाख धनुर्धारी पुरुष होते.

  15. या गणतीमध्ये त्याने लेवी व बिन्यामीन वंशजांचा समावेश केला नाही, कारण राजाने सांगितलेल्या या कामाचा योआबाला वीट आला होता.

  16. शमुवेल संदेष्टा, कीशाचा पुत्र शौल, नेराचा पुत्र अबनेर आणि जेरुइयाहचा पुत्र योआब यांनी अर्पण केलेले सर्वकाही आणि इतर अर्पणे सांभाळण्याची जबाबदारी शेलोमीथ आणि त्याच्या नातेवाईकांवर टाकण्यात आली.)

  17. चौथ्या महिन्याचा चवथा सेनापती योआबाचा भाऊ असाहेल होता; त्याच्यानंतर त्याचा पुत्र जबद्याह त्याच्या जागी आला. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते.

  18. जेरुइयाहचा पुत्र योआबाने गणती सुरू केली, परंतु तो ती पूर्ण करू शकला नाही. कारण इस्राएलावर परमेश्वराचा कोप भडकला आणि गणतीची पूर्ण संख्या दावीद राजाच्या इतिहासात लिहिली गेली नाही.

  19. बेनाइयाहचा पुत्र यहोयादा आणि अबीयाथार नंतर अहीथोफेल त्यांच्या जागी आला. योआब राजाच्या शाही सेनेचा सरसेनापती होता.

  20. संगीत दिग्दर्शकासाठी. “शूशन एदूथ” कराराची कुमुदिनीच्या चालीवर आधारित. दावीदाचे मिक्ताम गाण्याची रचना. हे शिकविण्यासाठी लिहिले गेले आहे. दावीद अराम-नहराईम आणि अराम-झोबाह देशांशी युद्ध करीत असतानाच्या परिस्थितीचा हा उल्लेख आहे. त्याचवेळी सेनापती योआब, क्षार खोर्‍यात परतला, त्याने बारा हजार एदोमाच्या सैनिकांचा नाश केला. हे परमेश्वरा, तुम्ही आमचा त्याग केला, आम्हाला फोडून टाकले आहे; तुम्ही आमच्यावर कोपला आहात—आता आम्हाला पूर्वस्थितीवर आणा!