मुख्य मजकुरावर जा

Women बद्दल बायबलमधील वचने

304 वचने · 47 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्या ऐकणार्‍या स्त्रियांमध्ये थुवतीरा शहराची लुदिया नावाची कोणी एक स्त्री होती. ती जांभळ्या वस्त्रांचा व्यवसाय करीत असे, ती परमेश्वराची उपासना करणारी होती. पौलाच्या संदेशाचा स्वीकार करण्यासाठी प्रभूने तिचे हृदय उघडले.

  2. मग तिचा आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांचा बाप्तिस्मा झाला व तिने आम्हाला तिच्या घरी बोलाविले. ती म्हणाली, “मी प्रभूवर विश्वास ठेवणारी आहे, असे जर तुम्ही मान्य करीत असाल तर, या आणि माझ्या घरी राहा.” तिच्या आग्रहामुळे आम्हाला ते मान्य करावे लागले.

  3. ऐकणार्‍यांपैकी काही यहूदीयांची खात्री झाली आणि ती माणसे पौल व सीला यांना येऊन मिळाली. यामध्ये परमेश्वराचे भय धरणार्‍या ग्रीक लोकांची संख्या मोठी होती आणि त्यात काही प्रमुख स्त्रियाही समाविष्ट होत्या.

  4. याचा परिणाम असा झाला की अनेकांनी विश्वास ठेवला, यामध्ये बर्‍याच संख्येने प्रमुख ग्रीक स्त्रिया व अनेक ग्रीक पुरुष देखील होते.

  5. काही लोक पौलाचे अनुयायी झाले व त्यांनी विश्वास ठेवला. त्यात दिओनुस्य नावाचा अरीयपगाचा एक सभासद, दामारी नावाची एक स्त्री व इतर काहीजण होते.

  6. या कारणासाठी, परमेश्वराने त्यांना निर्लज्ज वासनांच्या स्वाधीन केले. त्यामुळे त्यांच्या स्त्रियांनी देखील नैसर्गिक लैंगिक संबंधापेक्षा अनैसर्गिक संबंध ठेवले.

  7. परंतु एक गोष्ट तुम्हाला समजावी अशी माझी इच्छा आहे, प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे आणि प्रत्येक स्त्रीचे मस्तक तिचा पती आहे, ख्रिस्ताचा मस्तक परमेश्वर आहे.

  8. जो प्रत्येक पुरुष प्रार्थना करताना किंवा संदेश सांगताना आपल्या डोक्यावर आच्छादन ठेवतो, तो त्याच्या मस्तकाचा अनादर करतो.

  9. तसेच जी स्त्री डोक्यावर आच्छादन न घेता प्रार्थना करते किंवा संदेश सांगते, ती आपल्या पतीचा अनादर करते. तसे करणे म्हणजे जणू काय तिने आपल्या डोक्याचे मुंडण केल्यासारखे आहे.

  10. एखाद्या स्त्रीला डोक्यावर आच्छादन घेण्याची इच्छा नसेल, तर तिने केस कापावे किंवा मुंडण करावे आणि केस कापणे किंवा मुंडण करणे हे तिला लाजिरवाणे वाटत असेल, तर तिने डोक्यावर आच्छादन घ्यावे.

  11. पुरुषाने आपले मस्तक झाकणे योग्य नाही, कारण तो परमेश्वराचे प्रतिरूप व गौरव आहे; परंतु स्त्री पुरुषाचे गौरव आहे.

  12. कारण पुरुष स्त्रीपासून झाला नाही, परंतु स्त्री पुरुषापासून झाली.

  13. पुरुष स्त्रीसाठी निर्माण करण्यात आला नव्हता, परंतु स्त्री पुरुषासाठी निर्माण करण्यात आली.

  14. या कारणासाठी स्त्रीने आपल्या अधिकाराचे चिन्ह म्हणून देवदूतांकरिता स्वतःचे मस्तक आच्छादावे.

  15. प्रभूमध्ये स्त्री पुरुषापासून स्वतंत्र नाही आणि पुरुषही स्त्रीपासून स्वतंत्र नाही.

  16. कारण जशी स्त्री पुरुषापासून, त्याचप्रमाणे सर्व पुरुष स्त्रीपासूनच जन्मले, परंतु सर्वकाही परमेश्वरापासून आहे.

  17. त्यासंबंधी तुम्हीच निर्णय घ्या: स्त्रीने आपले मस्तक आच्छादून न घेता परमेश्वराची प्रार्थना करणे योग्य आहे काय?

  18. निसर्ग आपणास शिकवितो की लांब केस असणे हे पुरुषास लज्जास्पद आहे,

  19. परंतु जर स्त्रीचे लांब केस आहेत तर ते तिचे गौरव आहे, कारण आच्छादन म्हणूनच तिला लांब केस दिलेले आहेत.

  20. स्त्रियांनी मंडळीमध्ये शांत राहवे. स्त्रियांना बोलण्याची परवानगी नाही. नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्यांनी अधीन राहवे.

  21. त्यांना काही गोष्टींची चौकशी करावयाची असल्यास, त्यांनी आपल्या पतीला घरी विचारावे. कारण एखाद्या स्त्रीने मंडळीला प्रवचन देणे ही लज्जास्पद बाब आहे.

  22. परंतु हव्वा जशी सापाकडून धूर्ततेने फसविली गेली, तसेच तुमची मने कशाने का होईना ख्रिस्तावरील तुमच्या शुद्ध व प्रामणिक भक्तीपासून भटकून जातील, अशी मला भीती वाटते.

  23. स्त्रियांनीही वागणुकीत शांत, समजूतदार, आदरणीय आणि वस्त्रे प्रावरणांत संयमी असावे. वेशभूषा, सोने किंवा मोती किंवा मोलवान पोशाख यामध्ये नव्हे,

  24. तर जे परमेश्वराची भक्ती करणार्‍यांना शोभेल, अशा आचरणामुळे त्यांच्याकडे लक्ष वेधले जावे.

  25. स्त्रियांनी शांतपणे व नम्रतेने शिकावे.