Women बद्दल बायबलमधील वचने: Wore hair long
Wore hair long बद्दल वचने
तसेच जी स्त्री डोक्यावर आच्छादन न घेता प्रार्थना करते किंवा संदेश सांगते, ती आपल्या पतीचा अनादर करते. तसे करणे म्हणजे जणू काय तिने आपल्या डोक्याचे मुंडण केल्यासारखे आहे.
एखाद्या स्त्रीला डोक्यावर आच्छादन घेण्याची इच्छा नसेल, तर तिने केस कापावे किंवा मुंडण करावे आणि केस कापणे किंवा मुंडण करणे हे तिला लाजिरवाणे वाटत असेल, तर तिने डोक्यावर आच्छादन घ्यावे.
पुरुषाने आपले मस्तक झाकणे योग्य नाही, कारण तो परमेश्वराचे प्रतिरूप व गौरव आहे; परंतु स्त्री पुरुषाचे गौरव आहे.
कारण पुरुष स्त्रीपासून झाला नाही, परंतु स्त्री पुरुषापासून झाली.
पुरुष स्त्रीसाठी निर्माण करण्यात आला नव्हता, परंतु स्त्री पुरुषासाठी निर्माण करण्यात आली.
या कारणासाठी स्त्रीने आपल्या अधिकाराचे चिन्ह म्हणून देवदूतांकरिता स्वतःचे मस्तक आच्छादावे.
प्रभूमध्ये स्त्री पुरुषापासून स्वतंत्र नाही आणि पुरुषही स्त्रीपासून स्वतंत्र नाही.
कारण जशी स्त्री पुरुषापासून, त्याचप्रमाणे सर्व पुरुष स्त्रीपासूनच जन्मले, परंतु सर्वकाही परमेश्वरापासून आहे.
त्यासंबंधी तुम्हीच निर्णय घ्या: स्त्रीने आपले मस्तक आच्छादून न घेता परमेश्वराची प्रार्थना करणे योग्य आहे काय?
निसर्ग आपणास शिकवितो की लांब केस असणे हे पुरुषास लज्जास्पद आहे,
परंतु जर स्त्रीचे लांब केस आहेत तर ते तिचे गौरव आहे, कारण आच्छादन म्हणूनच तिला लांब केस दिलेले आहेत.