Women बद्दल बायबलमधील वचने: Unclassified scriptures relating to
Unclassified scriptures relating to बद्दल वचने
याहवेह परमेश्वर म्हणाले, “मनुष्याने एकटे असावे हे बरे नाही; मी त्याच्यासाठी एक योग्य मदतनीस निर्माण करेन.”
नंतर याहवेह परमेश्वराने मानवाला गाढ निद्रा आणली आणि तो झोपेत असताना याहवेह परमेश्वराने त्याची एक फासळी काढली आणि ती जागा त्यांनी मांसाने भरून काढली.
याहवेह परमेश्वराने मानवाची जी फासळी काढली, त्याची त्यांनी एक स्त्री निर्माण केली आणि तिला त्यांनी मानवाकडे आणले.
तेव्हा मानव म्हणाला, “ही माझ्या हाडाचे हाड आणि मांसाचे मांस आहे; हिला नारी असे म्हणतील, कारण ती नरापासून बनविली आहे.”
या कारणासाठी पुरुष आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील आणि ती एकदेह होतील.
नंतर परमेश्वर स्त्रीला म्हणाले, “तुझ्या प्रसूतिकाळात मी तुझे क्लेश अत्यंत वाढवेन; वेदनांनी तू तुझ्या संतानास जन्म देशील, तुझ्या पतीकडे तुझी ओढ राहील, आणि तो तुजवर सत्ता गाजवील.”
तुमच्या या विशाल साम्राज्यातून ही राजाज्ञा प्रसिद्ध झाली तर सर्व ठिकाणच्या पतीचा, मग तो लहान असो वा थोर त्यांच्या पत्नीकडून आदर केला जाईल!”
राजा आणि त्याचे सर्व प्रतिष्ठित या सल्ल्याने प्रसन्न झाले, म्हणून राजाने ममुकानच्या सल्ल्याप्रमाणे केले.
त्याने आपल्या राज्यातील सर्व प्रांतांना सर्व स्थानिक भाषेत, प्रत्येक व्यक्तीस त्याच्या भाषेत कळेल असे पत्र पाठविले. ज्याद्वारे जाहीर करण्यात आले की त्यांच्यामधून प्रत्येक पुरुषाने आपल्या घरात सत्ता चालवावी आणि आपल्या अधिकाराची अंमलबजावणी आपल्या मातृभाषेत करावी.
दयाळू अंतःकरणाची स्त्री सन्मान संपादन करते, परंतु क्रूर पुरुष केवळ धन संपादन करतो.
विवेकहीन सुंदर स्त्री जणू डुकराच्या नाकातील सोन्याची नथच समजावी.
सद्गुणी स्त्री ही आपल्या पतीला मुकुटासारखी आहे, परंतु लज्जास्पद आचरणाची स्त्री त्याच्या हाडातील कुजकेपणासारखी आहे.
सुज्ञ स्त्री तिचे घर बांधते, परंतु मूर्ख स्त्री स्वतःच्याच हातांनी ते जमीनदोस्त करते.
ज्याला पत्नी लाभते, त्याला चांगुलपणा प्राप्त झाला आहे. ती त्याच्यासाठी याहवेहकडून आनंददायी भेट आहे.
मूर्ख संतान म्हणजे वडिलांच्या नाशाचे कारण आहे. आणि भांडखोर पत्नी ही सतत ठिबकणार्या गळक्या छप्परासारखी आहे.
पूर्वजांपासून वारसांना घरेदारे व संपत्ती मिळते, परंतु समंजस पत्नी याहवेहपासून मिळते.
भांडखोर पत्नीसह घरात राहण्यापेक्षा छतावरील एका कोपर्यात राहणे बरे.
भांडकुदळ व सतत टोचून बोलणार्या पत्नीबरोबर राहण्यापेक्षा वाळवंटात राहिलेले बरे!
भांडखोर पत्नीसह घरात राहण्यापेक्षा छतावरील एका कोपर्यात राहणे बरे.
भांडखोर पत्नी ही पावसाळ्यात गळक्या छप्परासारखी आहे.
तिला ताब्यात ठेवणे म्हणजे वार्याला ताब्यात ठेवण्यासारखे, किंवा हाताने तेल धरण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे.
“तीन गोष्टीमुळे पृथ्वी हादरते, चार गोष्टी ती सहन करू शकत नाही:
एक नोकर जो राजा होतो, देवहीन मूर्ख ज्याला भरपूर खाण्यास मिळते,
तिरस्करणीय स्त्री जी विवाहबद्ध होते, आणि एक मोलकरीण तिच्या मालकिणीची जागा घेते.
सद्गुणी पत्नी कोणाला मिळेल? तर तिचे मोल माणकाहूनही अधिक आहे.