मुख्य मजकुरावर जा

Titles and Names of Saints बद्दल बायबलमधील वचने

122 वचने · 81 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. सीयोनातील जे सर्व शोक करतात त्यांना— राखेऐवजी सौंदर्याचा मुकुट, विलापाऐवजी आनंदाचे तेल, निराशेच्या आत्म्याऐवजी स्तुतीचे वस्त्र बहाल करण्यासाठी. कारण त्यांचे गौरव प्रकट करण्यासाठी ते नीतिमत्तेचे एला वृक्ष याहवेहने स्वतः रोपलेले असे संबोधले जातील.

  2. त्यांना पवित्र लोक, याहवेहने खंडणी भरून सोडविलेले, असे म्हणण्यात येईल, आणि तुला खूप मागणी असलेला देश, कधीही न टाकलेले नगर असे म्हणतील.

  3. सीयोनच्या लोकांनो, आनंद करा; तुमच्या याहवेहच्या ठायी आनंद करा, कारण त्यांनी शरदॠतूतील पाऊस दिला आहे कारण ते विश्वासयोग्य आहेत. परमेश्वर तुमच्यासाठी विपुल वृष्टी करतात, शरदॠतूतील आणि वसंतॠतूतील भरपूर पाऊस पाहिल्याप्रमाणे दिला आहे.

  4. “बघ, शत्रू फुशारक्या मारत आहे; त्याच्या इच्छा दुष्ट आहेत— पण नीतिमान व्यक्ती त्याच्या विश्वासयोग्यतेमुळे जगेल.

  5. “तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, पण मिठाचा खारटपणा गेला तर त्याचा खारटपणा परत कशाने आणू शकता? ते बाहेर टाकून दिले पाहिजे व असे मीठ पायदळी तुडविण्याच्या लायकीचे आहे.

  6. “तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर वसलेले शहर लपू शकत नाही.

  7. अशा वागण्याने तुम्ही स्वर्गीय पित्याचे पुत्र व्हाल. कारण ते आपला सूर्यप्रकाश चांगले आणि वाईट करण्यार्‍या अशा दोघांनाही देतात आणि नीतिमान व अनीतिमान या दोघांवरही पाऊस पाडतात.

  8. येशूंनी उत्तर दिले, “वराचे पाहुणे वर त्यांच्याबरोबर असताना शोक कसे करू शकतात? परंतु अशी वेळ येत आहे की, वर त्यांच्यापासून काढून घेण्यात येईल आणि मग ते उपास करतील.

  9. जग हे शेत आहे आणि चांगले बी हे परमेश्वराच्या राज्याचे लोक आहेत. रानगवत सैतानाच्या लोकांचे प्रतीक आहे.

  10. “परंतु तुम्ही स्वतः ‘रब्बी,’ म्हणून घेऊ नका, कारण तुमचा गुरू एकच आहे आणि तुम्ही सर्व एकमेकांचे भाऊ आहात.

  11. “मग राजा त्याच्या उजवीकडे असलेल्या लोकांना म्हणेल, ‘अहो, माझ्या पित्याने दिलेल्या आशीर्वादांनी धन्य झालेले लोकहो, या आणि जगाच्या उत्पत्तीपासून जे राज्य तुम्हाकरिता तयार करून ठेवले आहे ते वतन करून घ्या.

  12. तुमच्या शत्रूवर प्रेम करा, त्यांचे भले करा आणि परतफेड करण्याची आशा बाळगू नका. असे केले म्हणजे तुम्हाला फार मोठे प्रतिफळ मिळेल आणि तुम्ही परात्पराची लेकरे व्हाल, कारण ते अनुपकारी आणि दुष्ट यांनाही दयाळूपणाने वागवितात.

  13. तेव्हा ते म्हणाले, “जो कोणी परमेश्वराचे वचन ऐकतो व त्यानुसार आचरण करतो, तोच माझा भाऊ व बहीण आणि माझी आई.”

  14. “त्या लबाड कारभार्‍याची ही धूर्तता पाहून धन्याने त्याची वाहवा केली. या जगाचे लोक त्यांच्यासारख्यांशी व्यवहार करताना फार धूर्ततेने वागतात. प्रकाशाच्या लोकांना मात्र तसे वागता येत नाही.

  15. आणि ते मरणार नाहीत, कारण ते देवदूतांसारखे आहेत. ती परमेश्वराची लेकरे आहेत, कारण ती पुनरुत्थानाची लेकरे झाली आहेत.

  16. परंतु ज्या सर्वांनी त्यांना स्वीकारले, त्यांच्या नावावर विश्वास ठेवला, त्यांना परमेश्वराची मुले होण्याचा अधिकार दिला—

  17. ज्या यहूदी पुढार्‍यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता, त्यांना येशू म्हणाले, “जर तुम्ही माझी शिकवण घट्ट धरून ठेवाल, तर तुम्ही माझे खरे शिष्य व्हाल.

  18. “परूश्यांनो मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जो कोणी मेंढवाड्यात दारातून आत प्रवेश करत नाही आणि दुसरीकडून चढून जातो, तो चोर व लुटारू असला पाहिजे.

  19. जो दाराने आत जातो तो मेंढरांचा मेंढपाळ आहे.

  20. दारावरचा पहारेकरी त्याच्यासाठी दार उघडतो आणि मेंढरे त्यांची वाणी ओळखतात. तो आपल्या मेंढरांना त्यांच्या नावाने हाक मारतो व त्यांना बाहेर घेऊन जातो.

  21. आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर, तो त्यांच्यापुढे चालतो व मेंढरे त्याला अनुसरतात, कारण ती त्याची वाणी ओळखतात.

  22. ती परक्याच्या मागे कधीच जाणार नाहीत; उलट ती त्याच्यापासून दूर पळून जातील, कारण ती त्या परक्याची वाणी ओळखीत नाहीत.”

  23. येशू हे अलंकारिकरित्या बोलले, परंतु परूश्यांना ते समजले नाही.

  24. यास्तव येशू त्यांना पुन्हा म्हणाले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो की, मी मेंढरांचे दार आहे.

  25. जे सर्व माझ्यापूर्वी आले होते ते सर्व चोर व लुटारू होते, मेंढरांनी त्यांचे ऐकले नाही.