मुख्य मजकुरावर जा

The Christ Jesus बद्दल बायबलमधील वचने

607 वचने · 25 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. पेत्र दूर निघून गेला आणि मोठ्या दुःखाने रडला.

  2. तेव्हा येशू त्या स्त्रियांकडे वळून त्यांना म्हणाले, “यरुशलेमच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर स्वतःसाठी आणि आपल्या मुलाबाळांसाठी रडा.

  3. कारण असे दिवस येत आहेत की, त्या दिवसात तुम्ही म्हणाल, ‘लेकरे न झालेल्या स्त्रिया, न प्रसवलेली उदरे व न पाजलेली स्तने धन्य आहेत.’ ”

  4. त्यावेळी, “ ‘ते पर्वतांना म्हणतील, “आमच्यावर येऊन पडा!” आणि टेकड्यांना म्हणतील, आम्हाला “झाकून टाका!” ’

  5. कारण जर लोक हिरव्या वृक्षाची अशी गत करतात, तर सुकलेल्या वृक्षाचे काय होईल?”

  6. पण दुसर्‍या गुन्हेगाराने पहिल्याला दटावून म्हटले, “तुला परमेश्वराचे भय वाटत नाही काय, तू सुद्धा तीच शिक्षा भोगीत आहेस?

  7. आपल्या दुष्ट कृत्यांमुळे आपणास झालेली मरणाची शिक्षा अगदी यथायोग्य आहे. पण याने तर काहीही चूक केली नाही.”

  8. ते एकमेकांशी बोलत व चर्चा करीत असताना प्रत्यक्ष येशू तिथे आले आणि त्यांच्याबरोबर चालू लागले.

  9. परंतु ते त्यांना ओळखणार नाहीत असे करण्यात आले होते.

  10. येशूंनी त्यांना विचारले, “चालताना, तुम्ही काय चर्चा करीत आहात?” हा प्रश्न ऐकून ते शांत उभे राहिले, त्यांचे चेहरे दुःखी झाले.

  11. त्यांच्यापैकी क्लयपा नावाचा एकजण म्हणाला, “गेल्या काही दिवसात यरुशलेममध्ये घडलेल्या त्या घटनांची माहिती नसलेले असे तुम्ही एकटेच आहात काय?”

  12. “कशा घटना?” येशूंनी विचारले. ते म्हणाले, “नासरेथ या गावातून आलेल्या येशूंविषयी, जो परमेश्वराच्या आणि सर्व लोकांच्या दृष्टीने उक्ती व कृती यामध्ये सामर्थ्यशाली असा संदेष्टा होता.

  13. महायाजकांनी आणि आमच्या अधिकार्‍यांनी त्यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली, त्यांनी त्यांना क्रूसावर खिळून मारले.

  14. परंतु आम्हाला आशा होती की तोच इस्राएलास मुक्ती देणारा होता. या सर्वगोष्टी घडून आज तीन दिवस झाले आहेत.

  15. पण आमच्यातील काही स्त्रियांनी आम्हाला आश्चर्याचा मोठाच धक्का दिला आहे. त्या अगदी आज पहाटे कबरेकडे गेल्या.

  16. पण त्यांना त्यांचे शरीर सापडले नाही. तेव्हा त्यांनी येऊन सांगितले की त्यांना देवदूतांचे दर्शन झाले व ते म्हणाले की येशू जिवंत आहेत.

  17. तेव्हा आमच्यातील काही लोक कबरेकडे गेले आणि त्या स्त्रियांनी जसे सांगितले होते तसेच त्यांना दिसले. परंतु येशूंचे शरीर त्यांना दिसले नाही.”

  18. तेव्हा येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही मूर्ख आहात आणि संदेष्ट्यांनी जे लिहिले आहे त्यावर विश्वास ठेवण्यास मतिमंद आहात.

  19. आपण एखादा दुष्टात्मा पाहत आहोत असे वाटून, ते सर्व विलक्षण भयभीत झाले.

  20. येशूंनी त्यांना विचारले, “तुम्ही का घाबरला आणि तुमच्या मनात संशय का आला?

  21. माझे हात व माझे पाय पाहा. मी तोच आहे. भुतांना मांस व हाडे नसतात, पण मला ती आहेत हे तुम्ही पाहत आहात.”

  22. त्यांनी पुढे म्हटले, “ख्रिस्ताने दुःख सहन करावे, मरावे आणि तिसर्‍या दिवशी मरणातून पुन्हा उठावे या गोष्टी फार पूर्वी लिहून ठेवल्या होत्या.

  23. आणि यरुशलेमापासून आरंभ करून सर्व राष्ट्रांमध्ये त्यांच्या नावाने पापांच्या क्षमेसाठी पश्चात्तापाची घोषणा करण्यात यावी.

  24. परंतु येशूंनी स्वतःस त्यांच्या अधीन केले नाही, कारण ते सर्व लोकांस ओळखून होते.

  25. त्यांना मनुष्याविषयी कोणाच्याही साक्षीची गरज नव्हती, कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये काय आहे हे त्यांना माहीत होते.