मुख्य मजकुरावर जा

The Christ Jesus बद्दल बायबलमधील वचने

607 वचने · 25 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जे सर्व त्या खडकावर आदळतील त्यांचे तुकडे होतील, परंतु ज्यांच्यावर हा खडक आदळेल त्यांचा चुराडा होईल.”

  2. येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही शहरात जा आणि एक मनुष्य पाण्याने भरलेली मोठी घागर घेऊन जात असलेला तुम्हाला भेटेल. ज्या घरात तो जाईल तिथे त्याच्यामागे जा.

  3. त्या घराच्या मालकाला सांगा, ‘गुरुजी विचारत आहेत की, ज्या ठिकाणी मला माझ्या शिष्यांबरोबर वल्हांडणाचे भोजन करता येईल ती पाहुण्यांची खोली कुठे आहे?’

  4. तो तुम्हाला माडीवरील मोठी तयार असलेली एक खोली दाखवेल. तिथे तयारी करा.”

  5. ते गेले आणि येशूंनी सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळून आले. तेव्हा त्यांनी वल्हांडणाच्या भोजनाची तयारी केली.

  6. परंतु तुम्ही त्यांच्यासारखे असू नये. तुमच्यामध्ये जो कोणी श्रेष्ठ होऊ पाहतो, त्याने लहानासारखे झाले पाहिजे आणि जो अधिकार चालवितो त्याने तुमचा सेवक असावे.

  7. श्रेष्ठ कोण आहे, जो भोजन करतो, की जो सेवा करतो? अर्थात् जो बसून जेवतो तोच ना? पाहा, सेवा करणार्‍यासारखा मी तुम्हामध्ये आहे.

  8. मी तुम्हाला राज्य बहाल करतो, ज्याप्रमाणे माझ्या पित्याने मला एक राज्य बहाल केले आहे,

  9. तसेच माझ्या राज्यामध्ये माझ्याबरोबर बसून खातापिता येईल आणि तुम्ही सिंहासनावर बसून इस्राएलाच्या बारा वंशाचा न्यायनिवाडा कराल.

  10. “शिमोना, शिमोना, तुम्हा सर्वांची गव्हासारखी चाळणी करावी म्हणून सैतानाने विचारले आहे.

  11. परंतु शिमोना, तुझा विश्वास डळमळू नये म्हणून मी प्रार्थना केली आहे, की तू आपल्या विश्वासात खचू नये. ज्यावेळी तू परत वळशील, त्यावेळी आपल्या बंधूंना बळकट कर.”

  12. शिमोन म्हणाला, “प्रभूजी, आपल्याबरोबर तुरुंगात जाण्यास व जीव देण्याचीही माझी तयारी आहे.”

  13. तेव्हा येशूंनी त्याला म्हटले, “पेत्रा, मी तुला निश्चित सांगतो, आज कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.”

  14. नंतर येशूंनी त्यांना विचारले, “मी तुम्हाला झोळी, पिशवी किंवा पायतणे न घेता पाठविले, तेव्हा तुम्हाला काही कमी पडले का?” “नाही,” त्यांनी उत्तर दिले.

  15. यावर येशू त्यांना म्हणाले, “पण आता तुमच्याजवळ झोळी असल्यास ती घ्या आणि पिशवी पण घ्या. तुमच्याजवळ तरवार नसली, तर आपली वस्त्रे विका व ती विकत घ्या.

  16. कारण माझ्याविषयीचे भविष्य पूर्ण होण्याचा समय आला आहे. ते भविष्य हे: ‘अधर्मी लोकांत त्याची गणना झाली.’ संदेष्ट्यांनी माझ्याविषयी जे काही लिहून ठेवले आहे; ते सर्व पूर्णतेस जाईल.”

  17. तेव्हा शिष्य त्यांना म्हणाले, “हे पाहा प्रभू, येथे दोन तरवारी आहेत.” येशू म्हणाले, “पुरे आहे.”

  18. शेवटी त्यांनी येशूंना अटक करून महायाजक कयफाच्या घरी नेले. पेत्र काही अंतरावरून, त्यांच्यामागे चालत होता.

  19. आणि जेव्हा काहीजणांनी तिथे अंगणाच्या मधोमध शेकोटी पेटवली होती आणि एकत्रित खाली बसले होते, पेत्र त्यांच्याबरोबर खाली बसला.

  20. एका दासीने त्याला शेकोटीच्या उजेडात बसलेले पाहिले आणि ती त्याच्याकडे निरखून पाहून म्हणाली, “हा मनुष्य येशूंच्या बरोबर होता.”

  21. पेत्र नकार देत म्हणाला, “बाई, मी त्या मनुष्याला ओळखत नाही.”

  22. थोड्या वेळाने दुसर्‍या एकाने त्याच्याकडे पाहून म्हटले, “तू पण त्यांच्यापैकी एक आहेस.” “महाराज, मी तो नाही,” पेत्र नाकारून म्हणाला.

  23. सुमारे तासाभराने आणखी एकाने खात्रीपूर्वक विधान केले व पेत्राला म्हटले, “हा मनुष्य त्यांच्याबरोबर होता. कारण तो गालील प्रांताचा आहे!”

  24. हे ऐकून पेत्र त्यांना म्हणू लागला, “अरे माणसा, तू काय बोलतोस हे मला समजत नाही.” तेवढ्यात कोंबडा आरवला.

  25. प्रभू येशूंनी पेत्राकडे वळून पाहिले तेव्हा त्याच क्षणाला पेत्राला येशूंचे शब्द आठवले, “पेत्रा, आज कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.”