मुख्य मजकुरावर जा

Syria बद्दल बायबलमधील वचने

235 वचने · 61 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परंतु बाबेलच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला व सिद्कीयाहला यरीहोच्या मैदानात पकडले व बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर, याच्याकडे हमाथ राज्यातील रिब्लाह या शहरात आणण्यात आले. त्या ठिकाणी सिद्कीयाला शिक्षा सुनाविण्यात आली.

  2. दिमिष्क विषयी: “हमाथ व अर्पाद ही शहरे भीतीने घाबरी झाली आहेत, कारण त्यांना वाईट बातमी समजली आहे. ते निराश झाले आहेत, एखाद्या खवळलेल्या समुद्रागत अस्वस्थ झाले आहेत.

  3. दिमिष्क दुर्बल झाले आहे, पलायन करण्यासाठी ती माघारी फिरली आहे आणि भयाने त्यांना धडकी भरली आहे; जशा प्रसूत होणार्‍या वेदना स्त्रियांना घेरतात, त्याप्रमाणे वेदना व पीडा यांनी त्यांना घेरले आहे.

  4. जी नगरी मला प्रसन्न करते, त्या प्रसिद्ध नगरीस टाकून देण्यात का आले नाही?

  5. निश्चितच तुझे तरुण रस्तोरस्ती मरून पडतील; तुझे सर्व सैनिक त्या दिवशी निःशब्द केल्या जातील,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.

  6. “आणि मी दिमिष्कच्या सीमेवर अग्नी पेटवेन व तो अग्नी बेन-हदादचे राजवाडे जाळून टाकील.”

  7. “ ‘तुझ्या पुष्कळ उत्पादनांमुळे व महान संपत्तीमुळे दिमिष्कने तुझ्याबरोबर व्यापार केला. त्यांनी तुला हेल्बोनचा द्राक्षारस व झहारची लोकर

  8. त्या ज्योतिषांनी राजाला उत्तर दिले, “महाराज, चिरायू असा! आपले स्वप्न काय होते ते आपल्या सेवकांना सांगावे, म्हणजे आम्ही त्याचा अर्थ सांगू.”

  9. काही वर्षानंतर ते एकमेकांशी सलोखा करतील. दक्षिणेच्या राजाची कन्या उत्तरेच्या राजाकडे तह करण्यासाठी जाईल, परंतु तिच्याकडे सामर्थ्य राहणार नाही आणि तो व त्याची शक्ती टिकणार नाही. त्या दिवसांत, शाही रक्षकांसह आणि तिचे वडील आणि मदतनीस तिच्यासोबत विश्वासघात करतील.

  10. “तिच्या कुळातील एकाचा उदय होईल जो तिची जागा घेईल. तो उत्तरेच्या राजाच्या सैन्यावर हल्ला करेल आणि त्याच्या किल्ल्यात प्रवेश करेल; तो त्यांच्याशी युद्ध करेल आणि विजयी होईल.

  11. तो त्यांचे दैवत, त्यांच्या धातूच्या मूर्ती आणि सोन्या-चांदीच्या मौल्यवान पात्रांना ताब्यात घेऊन इजिप्तला नेईल. काही वर्षे तो उत्तरेकडील राजाला एकटा सोडेल.

  12. मग उत्तरेकडील राजा दक्षिणेकडील राजाच्या राज्यावर कूच करेल, परंतु तो आपल्या देशात परत जाईल.

  13. त्याचे पुत्र युद्धाची तयारी करतील आणि प्रचंड सैन्य गोळा करतील. जे एका अप्रतिकार्य पुरासारखे पुढे जातील आणि युद्ध त्याच्या किल्ल्यापर्यंत घेऊन जातील.

  14. “नंतर दक्षिणेचा राजा क्रोधिष्ट होऊन पुढे जाईल आणि उत्तरेच्या राजाशी युद्ध करेल, जो एक मोठे सैन्य उभारेल, परंतु त्याचा पराभव होईल.

  15. जेव्हा सैन्याचा नाश होईल, तेव्हा दक्षिणेचा राजा गर्वाने धुंद होऊन जाईल आणि अनेक हजारो लोकांचा वध करेल, तरीही तो विजयी होणार नाही.

  16. कारण उत्तरेचा राजा दुसरे सैन्य उभे करेल, जे त्याच्या आधीच्या सैन्यापेक्षा मोठे असेल; आणि बर्‍याच वर्षानंतर तो पूर्ण तयारीने मोठ्या सैन्यासह पुढे जाईल.

  17. “त्या काळात अनेक दक्षिणेच्या राजाविरुद्ध उभे राहतील. तुझ्या स्वतःच्या लोकांपैकीच काही बंडखोर विचारांचे हिंसक लोकसुद्धा दृष्टान्त पूर्णतेसाठी विद्रोह करतील, परंतु ते अपयशी होतील.

  18. नंतर उत्तरेचा राजा येईल आणि आणि वेढा बांधून तटबंदी असलेले शहर ताब्यात घेईल. दक्षिणेकडील सैन्यांना प्रतिकार करण्यास शक्ती राहणार नाही; त्यांच्या सर्वोत्तम सैन्यालाही सामना करण्याची ताकद नसेल.

  19. आक्रमण करणारा त्याला वाटेल तसे तो करेल; त्याच्या विरोधात कोणीही उभे राहू शकणार नाही. तो सुंदर देशात स्वतःची स्थापना करेल आणि त्याचा नाश करण्याची शक्ती त्याच्याकडे असेल.

  20. तो आपल्या राज्याच्या सर्व सामर्थ्याने येण्याचा निर्धार करेल आणि तो दक्षिणेच्या राजाबरोबर करार करेल. त्याचे राज्य जिंकण्यासाठी तो आपली एक मुलगी विवाहात देईल, परंतु त्याची ही योजना यशस्वी होणार नाही वा त्याला काही मदत मिळणार नाही.

  21. यानंतर तो आपले लक्ष किनारपट्टीवरील शहरांकडे वळवील व त्यातील अनेक जिंकून घेईल. परंतु एक सेनापती त्याला प्रतिकार करेल व त्याला लाजिरवाणी माघार घ्यावी लागेल.

  22. यानंतर तो आपल्या स्वतःच्या देशातील दुर्गाकडे मोर्चा फिरवेल, पण तो ठेच लागून पडेल व त्याचे अस्तित्व सापडणार नाही.

  23. “त्याच्या जागी एकजण येईल, जो त्या वैभवी देशात कर वसूल करणार्‍यास पाठवेल. काही वर्षात, त्याचा नाश केला जाईल, तरीही त्याचा नाश क्रोधाने किंवा युद्धात होणार नाही.

  24. “त्याच्या जागी असा नीच मनुष्य येईल ज्याला राजघराण्याचा मान मिळालेला नाही. जेव्हा जनतेला सुरक्षित वाटत असेल, तेव्हाच तो राज्यावर आक्रमण करेल आणि कट रचून राज्य आपल्या ताब्यात घेईल.

  25. मग त्याच्यापुढे मोठ्या सैन्याचा नाश होईल; तो आणि कराराचा राजपुत्र दोघेही नष्ट होतील.