मुख्य मजकुरावर जा

Syria बद्दल बायबलमधील वचने: God smote with blindness those sent against Elisha by the king of

4 वचने · 61 पैलू

God smote with blindness those sent against Elisha by the king of बद्दल वचने

  1. मग त्याने तिथे घोडे आणि रथ व एक मोठे सैन्य पाठविले. ते रात्री गेले आणि शहराला वेढा घातला.

  2. जेव्हा शत्रू खाली त्याच्याकडे आले, तेव्हा अलीशाने याहवेहकडे प्रार्थना केली, “कृपा करून या सर्व लोकांना आंधळे करून टाका.” अलीशाने विनंती केल्याप्रमाणे त्यांनी त्यांना आंधळे केले.

  3. मग अलीशा त्यांना म्हणाला, “हा तो रस्ता नाही आणि हे ते नगरही नाही. माझ्यामागे या म्हणजे जो मनुष्य तुम्हाला पाहिजे आहे, त्याच्याकडे मी तुम्हाला घेऊन जाईन.” आणि त्याने त्यांना शोमरोनात नेले.

  4. शोमरोनात प्रवेश केल्यानंतर, अलीशाने प्रार्थना केली, “हे याहवेह, आता या माणसांचे डोळे उघडा म्हणजे ते पाहू शकतील.” तेव्हा याहवेहने त्यांचे डोळे उघडले, आणि त्यांनी पाहिले की ते इस्राएलची राजधानी शोमरोनामध्ये आहेत.