Skip to content

Sin (1) बद्दल बायबलमधील वचने

240 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. नंतर मी माझी सर्व पातके तुमच्याजवळ कबूल केली आणि माझे अपराध लपविले नाही. मी स्वतःशी म्हणालो, “मी याहवेहजवळ माझी पातके कबूल करेन.” तेव्हा तुम्ही माझ्या पातकांच्या दोषाची क्षमा केली. सेला

  2. तुमच्या संतापामुळे माझे शरीर रोगजर्जर झाले आहे; माझ्या पातकांमुळे माझ्या हाडांमध्ये स्वस्थता नाही.

  3. माझे दोष इतके भारी आहेत की ते वाहून नेणे अशक्य आहे.

  4. मी माझी पातके पदरी घेतो; माझ्या पापामुळे मी दुःखी आहे.

  5. याहवेह, तुमची कृपा माझ्यापासून राखून धरू नका; तुमची प्रीती आणि विश्वासूपणा मला नेहमी सुरक्षित ठेवील.

  6. असंख्य समस्यांनी माझ्यावर मात केली आहे; माझ्या अपराधांनी माझा पिच्छा पुरविला आहे आणि ते मी पाहू शकत नाही. ते माझ्या डोक्यावरील केसांपेक्षा जास्त आहेत, आणि माझे हृदय विव्हळत आहे.

  7. मी म्हणालो, “याहवेह, माझ्यावर दया करा; मला रोगमुक्त करा, कारण मी तुमच्याविरुद्ध पातके केली आहेत.”

  8. मला धुऊन माझे अपराध काढून टाका आणि माझ्या पापदोषापासून मला शुद्ध करा.

  9. कारण माझे अपराध मला माहीत आहेत; माझी पापे नित्य माझ्यापुढे आहेत.

  10. तुमच्याविरुद्ध आणि केवळ तुमच्याविरुद्धच मी पातक केले आहे आणि तुमच्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे; म्हणून तुम्ही यथायोग्य न्याय दिला आहे आणि जेव्हा तुम्ही न्याय देता तेव्हा ते दोषमुक्त असतात.

  11. मी तर जन्माचाच पापी आहे, माझ्या आईने गर्भधारण केले, तेव्हापासूनच मी पातकी आहे.

  12. हे परमेश्वरा, माझा मूर्खपणा तुम्हाला माहीत आहे; माझे दोष तुमच्यापासून लपलेले नाहीत.

  13. जेव्हा माझे हृदय दुःखित झाले आणि माझा आत्मा कटुतेने भरून गेला होता,

  14. त्यावेळस मी मूर्ख आणि अज्ञानी होतो; मी तुमच्यापुढे जनावरासारखा होतो!

  15. तेच त्यांच्या दुष्टतेचा सूड घेतील, आणि त्यांच्या दुष्टतेबद्दल त्यांचा नाश करतील; याहवेह आमचे परमेश्वर त्यांचा नायनाट करतील.

  16. आम्ही आमच्या पूर्वजांप्रमाणे पाप केले; आम्ही अपराध केला आणि दुष्टतेने वागलो.

  17. माझ्या मार्गासंबंधी मी विचार केला, आणि तुमच्या नियमाचे पालन करण्याकडे माझी पावले वळविली आहेत.

  18. मी त्वरा करेन, आणि तुमच्या आदेशांचे अविलंब पालन करेन.

  19. हरवलेल्या मेंढराप्रमाणे मी बहकलो, माझा शोध घ्या, कारण तुमच्या आज्ञा मी विसरलो नाही.

  20. याहवेह, तुम्ही आमच्या पापांचा हिशोब ठेवला, तर प्रभू आमच्यापैकी कोण उभा राहील?

  21. दुर्जन त्यांच्याच जाळ्यांमध्ये अडकू दे, आणि मी मात्र सुखरुपपणे निसटून जाईन.

  22. त्यांना त्यांच्या मार्गाचे प्रतिफळ मिळेल, आणि त्यांच्या वाईट कृत्यांचे पुरेपूर परिणाम मिळतील.

  23. ज्ञानी लोकांना सन्मानाचा वारसा मिळतो, परंतु मूर्खांना फक्त लज्जा मिळते.

  24. दुष्ट मनुष्याचा नाश स्वतःच्याच पातकांनी होतो; त्याचीच पातके दोर बनून त्याला पाशात पकडून ठेवतात.

  25. कारण शिस्त नसल्यामुळे त्यांना मरण येईल, आणि स्वतःच्याच अतिमूर्खपणाने ते फसविले जातील.