Skip to content

Sin (1) बद्दल बायबलमधील वचने

240 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. दुष्टांचा धिक्कार असो! अरिष्ट त्यांच्यावर येत आहे! त्यांनी केलेल्या कृत्याचा, त्यांना मोबदला मिळणार.

  2. “मला धिक्कार असो!” मी ओरडलो. “मी उद्ध्वस्त झालो! कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकांमध्ये राहतो आणि माझ्या डोळ्यांनी महाराज सर्वसमर्थ याहवेह यांचे मुखावलोकन केले आहे!”

  3. दुष्टता निश्चितच अग्नीप्रमाणे जळते. ती काटेरी झुडपे आणि काटेरी झाडे यांना भस्म करते, ती झाडेझुडपांचे रान पेटवून टाकते, त्यामुळे तो धुराचा एक स्तंभ होऊन गरगर फिरत वर जातो.

  4. भूमीचे वतन मिळविण्यासाठी ते उठू नये आणि त्यांच्या शहरांनी पृथ्वी व्यापली जाऊ नये, म्हणून त्याच्या पूर्वजांनी केलेल्या पापांसाठी त्याच्या मुलांना मारून टाकण्यासाठी जागा तयार करा.

  5. याहवेह, आमच्या परमेश्वरा, आम्ही केवळ तुमच्या नावाचा आदर करतो. तुमच्याशिवाय इतर प्रभूंनी आमच्यावर राज्य केले आहे,

  6. परंतु आता, तुम्ही जे अग्नी प्रज्वलित करता आणि स्वतःला जळत्या मशालीचा पुरवठा करता, जा, तुम्ही स्वतः प्रज्वलित केलेल्या, आणि तुम्ही ज्वलंत केलेल्या मशालीच्या प्रकाशात चला, माझ्यापासून मात्र तुम्हाला हे प्राप्त होईल: तुम्ही यातनामध्ये पडून राहाल.

  7. परंतु दुष्ट लोक खवळलेल्या सागरांसारखे आहेत, ज्याला विसावा नसतो, ज्याच्या लाटा उसळून चिखल व गाळ बाहेर टाकतात.

  8. माझे परमेश्वर म्हणतात, “दुष्टांना शांती नसते.”

  9. कारण तुमच्या नजरेत आमचे अनेक अपराध आहेत, आणि आमची पापेच आमच्याविरुद्ध साक्ष देतात. आमचे अपराध सतत आमच्यासह असतात आमचे हे घोर अन्याय आम्ही कबूल करतो:

  10. याहवेहच्या विरुद्ध केलेली बंडखोरी व लबाडी, परमेश्वराकडे फिरविलेली पाठ, बंडखोरी व छळवणूकीस प्रक्षुब्ध करणे, आमच्या अंतःकरणातून प्रसवलेले निखालस असत्य.

  11. म्हणून न्याय मागे सरला आहे, आणि नीतिमत्ता दूर उभी आहे; सत्य रस्त्यावर अडखळले आहे, प्रमाणिकपणा प्रवेश करू शकत नाही.

  12. सत्य कुठेही शोधून सापडत नाही, आणि जो कोणी दुष्टपणा टाळतो, तोच सावज बनतो. याहवेहने हे पाहिले व ते असंतुष्ट झाले कारण न्याय्य कुठेही नाही.

  13. जे आनंदाने चांगली कृत्ये करतात, व ज्यांना तुमच्या मार्गाचे स्मरण असते, त्यांच्या मदतीसाठी तुम्ही येता. परंतु जेव्हा आम्ही तुमच्याविरुद्ध सतत पाप करत राहिलो, तेव्हा तुमचा क्रोध आम्हावर भडकला. आता आमचा उद्धार कसा होणार?

  14. आम्ही सर्वच अशुद्ध व्यक्तीसारखे झालो आहोत. आणि आमच्या नीतीची कृत्ये घाणेरड्या चिंध्या आहेत; आम्ही सर्व पानांप्रमाणे कोमेजतो, वाऱ्याने उडवून न्यावे, तशी आमची पापे आम्हाला दूर वाहून नेतात.

  15. तरीही कोणी तुमच्या नावाचा धावा करीत नाही किंवा तुमचा ध्यास घेत नाही; कारण तुम्ही आमच्यापासून आपले मुख लपविले आहे आणि आम्हाला आमच्या पापांच्या स्वाधीन केले आहे.

  16. ज्या याहवेहनी तुम्हाला योग्य मार्गाने चालविले त्या तुमच्या परमेश्वराचा त्याग करून, ही परिस्थिती तुम्ही स्वतःवर ओढवून घेतली नाही का?

  17. तुमचा दुष्टपणाच तुम्हाला शिक्षा देईल; तुमचे माघार घेणे तुम्हाला दोषी ठरवेल. म्हणून विचार करा आणि तुमच्या लक्षात येईल याहवेह तुमच्या परमेश्वराचा त्याग करून दूर जाणे तुमच्यासाठी किती वाईट आणि कटू आहे, आणि माझे भय तुमच्यामध्ये नाही,” सर्वशक्तिमान याहवेह असे म्हणतात.

  18. उजाड पर्वतांवरून रडण्याचा आवाज ऐकू येत आहे, तो इस्राएलाच्या लोकांच्या विलाप करण्याचा व धावा करण्याचा आवाज, कारण ते मार्गभ्रष्ट झाले आहेत आणि त्यांच्या याहवेह परमेश्वराला विसरले आहेत.

  19. “विश्वासहीन लोकांनो परत या; मी तुमच्यामागे घसरणीस बरे करेन.” “होय, आम्ही तुमच्याकडे येऊ, कारण तुम्हीच आमचे परमेश्वर याहवेह आहात.

  20. आम्ही लज्जास्पद अवस्थेत लोळू आमची विटंबना आम्हाला झाकून टाको. आम्ही आमच्या याहवेह परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे, आम्ही आणि आमच्या पूर्वजांनी; तारुण्यापासून आजपर्यंत आमच्या याहवेह परमेश्वराची आज्ञा आम्ही पाळली नाही.”

  21. “तुमच्या वागणुकीमुळे व वाईट कृत्यामुळे हा प्रसंग तुम्ही स्वतःवर ओढवून घेतला आहे. तुमची ही शिक्षा आहे! किती कडू आहे हे! कसे अंतःकरण छेदून टाकले आहे!”

  22. तुमच्या अपराधांमुळे तुम्ही या सर्व गोष्टींपासून दूर आहात; तुमच्या पातकांमुळे तुम्ही उत्तम गोष्टींना मुकले आहात.

  23. याहवेह विचारतात, या त्यांच्या करणीने ते मला चिथावणी देतात का? नाही! यामुळे त्यांचेच मोठे नुकसान होत नाही का, त्यांचीच बेअब्रू होत नाही का?

  24. आम्ही इथे का बसलो आहोत? एकत्र होऊ या! आपण तटबंदीच्या शहरात पलायन करू आणि तिथेच मरू! कारण आमच्या याहवेह परमेश्वराने आमचा नाश होण्यासाठी आम्हाला टाकून दिले आहे आणि त्यांनी आम्हाला विषारी पाणी पिण्यासाठी दिले आहे, कारण आम्ही त्यांच्याविरुद्ध पाप केले आहे.

  25. आम्ही शांतीची आशा करीत होतो, परंतु चांगले काही लाभलेच नाही, आरोग्य मिळण्याच्या वेळेची आशा करीत होतो, केवळ भयंकर दहशत मिळाली.