मुख्य मजकुरावर जा

Sin (1) बद्दल बायबलमधील वचने

240 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परंतु जे माझा शोध घेण्यास चुकतात, ते स्वतःचे नुकसान करून घेतात; जे सर्व माझा तिरस्कार करतात, ते मृत्यूची आवड धरतात.”

  2. दुष्ट ज्याला भितो, तेच त्याच्यावर येईल; नीतिमान मनुष्याच्या इच्छा फलद्रूप होतील.

  3. याहवेहचा मार्ग निर्दोष मनुष्याचे आश्रयस्थान आहे, परंतु जे दुष्कर्म करतात त्यांच्यासाठी तो नाश आहे.

  4. नीतिमान लोक कधीही उपटून टाकले जाणार नाहीत, परंतु दुष्ट लोक भूमीवर राहणार नाहीत.

  5. धार्मिक मनुष्याच्या मुखाद्वारे सुज्ञानाचे फळ निघते; परंतु विकृत जिभेला शांत केले जाईल.

  6. निर्दोष मनुष्यांची नीतिमत्ता त्यांचे मार्ग सरळ ठेवते, परंतु दुष्ट लोक स्वतःच्या वाईट कृत्यांमुळे पतन पावतात.

  7. नीतिमानाची नीतिमत्ता त्यांची सुटका करते, परंतु विश्वासघातकी त्यांच्या वाईट इच्छांच्या सापळ्यात अडकतात.

  8. मर्त्य मानवांच्या मृत्यूने त्यांच्यावर ठेवलेली आशा नष्ट होते, त्यांच्या बळाने दिलेली सर्व अभिवचने निष्फळ होतात.

  9. दुष्ट मनुष्याला मिळणारे वेतन फसवे असते; परंतु जो नीतिमत्तेचे बीज पेरतो त्याला निश्चितच बक्षीस मिळते.

  10. खरोखरच नीतिमानाला जीवन प्राप्त होते, परंतु दुष्कर्मांच्या मागे लागणारा मृत्यू ओढवून घेतो.

  11. जो चांगल्या गोष्टींचा शोध घेतो त्याला कृपा प्राप्त होते, परंतु जो वाईटाचा शोध घेतो त्याला तेच प्राप्त होते.

  12. जो कोणी त्याच्या कुटुंबाचा नाश करतो, त्याला वारसा म्हणून केवळ वारा मिळेल, आणि मूर्खाला शहाण्याचा दास व्हावे लागेल.

  13. दुष्ट माणसे त्यांच्या वाईट बोलण्याने जाळ्यात सापडतात, आणि निर्दोष मनुष्य संकटातून बाहेर पडतो.

  14. ओठांच्या फळांनी मनुष्याला उत्तम गोष्टी लाभतात, आणि हाताने केलेले परिश्रम त्यांना बक्षीस मिळवून देतात.

  15. न्यायी मनुष्यावर काहीही आपत्ती येणार नाही, परंतु दुष्ट लोक आपत्तींनी व्याप्त होतात.

  16. नीतिमान आपल्या मित्रांची काळजीपूर्वकरित्या निवड करतो, परंतु दुष्ट लोकांचा मार्ग त्यांनाच बहकवितो.

  17. नीतिमान मनुष्य असत्याचा तिरस्कार करतो, परंतु दुष्ट मनुष्य स्वतःस दुर्गंधपूर्ण करतो आणि आपली बेअब्रू करून घेतो.

  18. नीतिमत्ता प्रामाणिक मनुष्याचे रक्षण करते, परंतु दुष्टता पापी मनुष्याचा संपूर्ण विनाश करते.

  19. उत्तम बोधामुळे अनुकूलता मिळते, परंतु विश्वासहीनांचे मार्ग त्यांना नाशाकडे नेतात.

  20. जो कोणी अन्यायाची पेरणी करतो, तो अरिष्टांची कापणी करेल, आणि त्यांनी रागाने उगारलेली काठी तुटून जाईल.

  21. घर सोडून भटकणारा मनुष्य घरटे सोडून भटकणार्‍या पक्ष्यासारखा आहे.

  22. कोणीही पाठलाग करीत नाही, तरी दुष्ट माणसे पळत असतात; पण नीतिमान सिंहासारखे निर्भय असतात.

  23. दुष्ट कृत्ये करणारे स्वतःच्या पापामुळेच सापळ्यात अडकतात, परंतु नीतिमान आनंदाने गर्जना करतात आणि हर्षित असतात.

  24. “व्यभिचारी स्त्रीचा मार्ग असा आहे: ती खाऊन तोंड पुसते, आणि म्हणते, ‘मी काहीच वाईट केले नाही.’

  25. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव त्यांच्याच विरोधात साक्ष देतात; त्यांच्या पापांचे ते सदोम नगरीप्रमाणे प्रदर्शन करतात; ते लपवित नाहीत. त्यांचा धिक्कार असो! त्यांनीच स्वतःवर आपत्ती ओढवून घेतली आहे.