Skip to content

Sin (1) बद्दल बायबलमधील वचने

240 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “पण सर्व सुरळीत झाले की, ते परत तुमच्या नजरेत पाप करू लागले. मग तुम्ही त्यांना नाकारून, त्यांच्या शत्रूच्या हाती दिले, जे त्यांच्यावर शासन करीत. आणि जेव्हा ते परत तुमचा धावा करीत, तेव्हा तुम्ही तो स्वर्गातून ऐकून तुमच्या करुणेने त्यांना वेळोवेळी सोडवित असत!

  2. “त्यांनी तुमच्या आज्ञांकडे परत वळावे म्हणून तुम्ही त्यांना ताकीद दिली, पण ते गर्विष्ठ झाले व त्यांनी तुमच्या आज्ञा मोडल्या. त्यांनी तुमच्या आदेशाविरुद्ध पाप केले, ज्यात तुम्ही म्हटले होते, ‘जो या आदेशानुसार वागेल तो मनुष्य जगेल.’ दुराग्रहाने त्यांनी तुमच्याकडे पाठ फिरविली, गर्विष्ठ बनले व तुमचे ऐकण्याचे नाकारले.

  3. अनेक वर्षे तुम्ही त्यांच्याशी सहनशीलतेने वागलात. तुम्ही आपले संदेष्टे पाठवून त्यांच्या पापांबद्दल त्यांना आत्म्याद्वारे ताकीद दिली. परंतु तरीही त्यांनी दुर्लक्ष केले, तेव्हा तुम्ही शेजारील लोकांच्या हाती त्यांना दिले.

  4. पण तुमच्या महान दयेमुळे तुम्ही त्यांचा सर्वनाश केला नाही व त्यांचा त्याग केला नाही, कारण तुम्ही कृपाळू व दयाळू परमेश्वर आहात.

  5. “म्हणून आता, हे आमच्या महान, पराक्रमी व भयावह परमेश्वरा, तुम्ही तुमच्या प्रीतीचे वचन पाळता, म्हणून ज्या हालअपेष्टा आम्ही सहन केल्या, त्यांना तुमच्या नजरेत क्षुल्लक मानू नका—जी आमच्यावर, आमच्या राजांवर व अधिकार्‍यांवर, आमच्या याजक व संदेष्ट्यांवर, आमच्या पूर्वजांवर व तुमच्या सर्व लोकांवर, अश्शूरी राजाच्या राजवटीपासून आतापर्यंत संकटे आली.

  6. जे सर्वकाही आमच्याबाबत घडले, त्यात तुमची विश्वासार्हता कायम होती; तुमची वागणूक विश्वासयोग्य होती, पण आम्ही मात्र दुष्टपणे वागलो.

  7. आमचे राजे, आमचे अधिकारी, आमचे याजक आणि आमचे पूर्वज यांनी तुमचे नियम पाळले नाहीत किंवा तुमच्या आज्ञा व आदेश पाळण्याच्या ताकिदीकडे लक्ष दिले नाही.

  8. ते स्वतः राज्य करीत असताना, त्यांनी विशाल व सुपीक देशात तुमच्या थोर चांगुलपणाचा उपभोग घेतला. तरी देखील त्यांनी तुमची भक्ती केली नाही वा दुष्टपणापासून मागे वळले नाही.

  9. “पण पाहा, आज आम्ही गुलामगिरीत आहोत, आम्ही ज्या भूमीतील उत्तम फळे व इतर गोष्टींचा उपभोग घ्यावा त्या आमच्या पूर्वजांना तुम्ही दिलेल्या या समृद्ध देशात गुलाम आहोत.

  10. आमच्या पापांमुळे, या देशाचे विपुल उत्पन्न, आमच्यावर राज्य करणाऱ्या राजांकडे जात आहे. त्यांच्या इच्छेप्रमाणे ते आमच्या शरीरावर व आमच्या पशूंवर सत्ता करतात. खरोखर आम्ही घोर दैन्यावस्थेत आहोत.

  11. “हे सर्व बघता, आम्ही असे बंधनकारक, लिखित वचन देतो आणि आमचे अधिपती, आमचे लेवी व आमचे याजक या करारांवर त्यांची मोहर लावतो.”

  12. मी असे पाहिले आहे की, जे दुष्टाईची नांगरणी करतात आणि दुःख पेरतात तेच त्यांची कापणी करतात.

  13. क्रोध मूर्खाचा घात करतो, आणि सामान्य मनुष्याचा मत्सराने घात होतो.

  14. जर मी पाप केले, तर ज्या तुमची नजर लोकांवर लागलेली असते, त्या तुमचे मी काय केले? माझ्यावर नेम धरावा म्हणून तुम्ही मला निशाणा करून का ठेवले आहे? मी तुम्हाला ओझे असे झालो आहे का?

  15. मी जरी निर्दोष असलो, तरी माझे मुख माझा निषेध करेल; मी दोषरहित असतो, तरी माझे मुख मलाच दोषी ठरवेल.

  16. मी किती चुका आणि पाप केलेत? माझे पाप आणि माझे अपराध मला दाखवा.

  17. कारण माझ्याविरुद्ध तुम्ही कटुत्वाच्या गोष्टी लिहिता, आणि माझ्या तारुण्यातील पातकांची शिक्षा मला देता.

  18. तारुण्याचा जो जोम त्याच्या हाडात भरलेला आहे तो त्याच्याबरोबरच धुळीत मिळेल.

  19. “मी अयोग्य आहे; मी तुम्हाला काय उत्तर देणार? मी माझा हात माझ्या मुखावर ठेवतो.

  20. माझ्या कानांनी तुमच्याविषयी ऐकले होते परंतु आता माझ्या डोळ्यांनी तुम्हाला पाहिले आहे.

  21. म्हणून मी माझाच तिरस्कार करतो, आणि धूळ व राखेत बसून पश्चात्ताप करतो.”

  22. परमेश्वर, त्यांना दोषी घोषित करा! त्यांच्या कारस्थानामुळेच त्यांचे पतन होवो. त्यांच्या अनेक अपराधांमुळे त्यांना तुमच्यापासून दूर घालवून द्या, कारण त्यांनी तुमच्याविरुद्ध बंड केले आहे.

  23. दुसर्‍यांसाठी खणलेल्या खाचेतच राष्ट्रे पडली आहेत; स्वतःच लपवून ठेवलेल्या जाळ्यात त्यांचे पाय अडकले आहेत.

  24. याहवेहची नीतिपूर्ण कृत्ये हीच त्यांची ओळख आहे; दुष्ट स्वतःच्याच हस्तकर्माच्या सापळ्यात अडकले आहेत. सेला

  25. दुष्ट मनुष्य आपल्या उद्धटपणात दुर्बलांचा छळ करतो, त्याने योजलेल्या दुष्ट योजनांमध्ये असहाय अडकले जातात.