मुख्य मजकुरावर जा

Sin (1) बद्दल बायबलमधील वचने

240 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “ते वारा पेरतात आणि ते वावटळीची कापणी करतात. त्यांच्या पिकांना कणसे येत नाहीत; त्यातून पीठ तयार होत नाही. जर त्यातून अन्न तयार झाले तर परकीय ते गिळून टाकतील.

  2. पण तुम्ही दुष्टतेची नांगरणी केली आहे आणि अन्यायाचे पीक काढले आहे, तुम्ही लबाडीचे फळ खाल्ले आहे. कारण तुम्ही स्वतःच्या सामर्थ्यावर आणि आपल्या अनेक योद्धांवर विश्वास ठेवला आहे,

  3. पण एफ्राईमने त्यांचा कोप भयंकर चेतविला आहे; त्याचे प्रभू त्याच्या रक्ताचा दोष त्याच्यावरच राहू देतील आणि त्याला त्याच्या अपमानाची भरपाई देतील.

  4. “हे इस्राएला, तुझा नाश झाला आहे, कारण तू माझ्याविरुद्ध, तुझ्या साहाय्यकर्त्यांच्या विरुद्ध आहेस.

  5. पृथ्वीवरील रहिवाशांमुळे, त्यांच्या कृतींचा परिणाम म्हणून, पृथ्वी उजाड होईल.

  6. कारण आतून, मनुष्याच्या हृदयातून, दुष्ट विचार, खून, जारकर्म, व्यभिचार, चोरी, लैंगिक पापे,

  7. बदफैलीपणा, दुष्कृत्ये, फसवेगिरी, कामातुरपणा, मत्सर, निंदा, गर्विष्ठपणा आणि मूर्खपणा

  8. या सर्व अमंगळ गोष्टी आतून निघतात आणि मनुष्याला अशुद्ध करतात.”

  9. “शेवटी तो शुद्धीवर आला आणि स्वतःशीच म्हणाला, ‘माझ्या पित्याच्या घरी नोकर चाकरांनाही पुरून उरेल इतके अन्न असते, पण मी मात्र इकडे उपाशी मरत आहे.

  10. मी आता माझ्या पित्याकडे जाईन आणि म्हणेन: बाबा, मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्याविरुद्ध पाप केले आहे.

  11. आता तुमचा पुत्र म्हणवून घेण्यास लायक राहिलो नाही; मला एका चाकरांसारखे ठेवा.’

  12. तेव्हा तो उठला आपल्या पित्याकडे निघाला. “तो अजून दूर अंतरावर असतानाच वडिलांनी त्याला पाहिले आणि वडिलांचे हृदय कळवळले. ते धावत त्याच्याकडे गेले, त्याला मिठी मारून त्याचे चुंबन घेतले.

  13. “मुलगा म्हणाला, ‘बाबा, मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास लायक राहिलो नाही. मला तुमच्या नोकरासारखे ठेवा.’

  14. शौलाने विचारले, “प्रभूजी, आपण कोण आहात?” “ज्याचा तू छळ करीत आहेस, तो मी येशू आहे,

  15. एका मनुष्याच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाद्वारे मरण जगात आले; सर्व लोकांमध्ये मरण पसरले, कारण सर्वांनी पाप केले आहे.

  16. नियमशास्त्र देण्यापूर्वी पाप जगात होतेच; पण नियमशास्त्र अस्तित्वात नसल्यामुळे, कोणालाही पापाबद्दल दोषी ठरविता येत नव्हते.

  17. आदामापासून मोशेपर्यंत मृत्यूचे राज्य होते, कारण आदामासारखा आज्ञेचा भंग त्यांनी स्वतः कधीही केलेला नव्हता. आदाम, जो येणार होता त्याचे प्रतिरूप होता.

  18. तरी देणगी ही आज्ञाभंगासारखी नाही. कारण या एका मनुष्याने, म्हणजे आदामाने, आपल्या पापांमुळे अनेक मानवांवर मृत्यू आणला. परंतु परमेश्वराची कृपा व देणगी एका मनुष्याद्वारे म्हणजे येशू ख्रिस्ताच्या कृपेद्वारे अनेकांना प्राप्त झाली.

  19. परमेश्वराचे वरदान एका मनुष्याने केलेल्या पापाच्या परिणामासारखे नाही आणि एकाच्या पापामुळे न्याय दंड मिळाला, परंतु वरदान अनेक अपराधानंतर आले आणि आपल्याला नीतिमान गणण्यात आले.

  20. कारण जर एका मनुष्याच्या अपराधामुळे, त्याच मनुष्याच्या द्वारे मरणाने राज्य केले, तर ज्यांना कृपेची व नीतिमत्वाची विपुल दाने मिळाली आहेत, ते येशू ख्रिस्त जे एक मानव आहेत, त्यांच्याद्वारे जीवनात किती विशेषकरून राज्य करतील!

  21. यास्तव एका अपराधामुळे सर्व मनुष्यजाती दंडास पात्र झाली, तसेच न्यायीपणाच्या एका कृत्यामुळे सर्व मनुष्यजात जीवनासाठी नीतिमान ठरविली जाते.

  22. कारण जसे एक मनुष्याच्या आज्ञाभंगामुळे अनेक लोक पापी ठरविले गेले, तसेच एका मनुष्याच्या आज्ञापालनामुळे अनेक लोक नीतिमान ठरविले जातील.

  23. पापाची जाणीव वाढावी म्हणून नियमशास्त्राचा प्रवेश झाला, कारण जिथे पाप वाढले, तिथे कृपा अति विपुल झाली,

  24. यासाठी की ज्याप्रमाणे पापाने मरणाद्वारे राज्य केले, त्याचप्रमाणे कृपेने नीतिमत्वाद्वारे राज्य करावे आणि येशू ख्रिस्त आपल्या प्रभूद्वारे सार्वकालिक जीवन मिळावे.

  25. आपण पापी स्वभावाच्या नियंत्रणात होतो, व ज्या कृत्यांचे फळ मरण आहे, ती करावयास आपल्या वासना नियमानुसार आपल्यामध्ये कार्य करीत होत्या.