Skip to content

Self-Righteousness बद्दल बायबलमधील वचने

195 वचने · 30 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्या ठिकाणी आलेल्या दुसर्‍या पाहुण्यांनी एकमेकांमध्ये बोलण्यास सुरुवात केली, “हा कोण आहे जो पापांची सुद्धा क्षमा करतो?”

  2. येशू त्या स्त्रीला म्हणाले, “तुझ्या विश्वासाने तुझे तारण झाले आहे; शांतीने जा.”

  3. एका प्रसंगी एक नियमशास्त्र तज्ञ येशूंची परीक्षा पाहावी म्हणून आला, “गुरुजी, सार्वकालिक जीवन हे वतन मिळविण्याकरिता मी काय करावे?”

  4. येशू म्हणाले, “याबाबत नियमशास्त्र काय म्हणते? तू काय वाचतोस?”

  5. त्याने उत्तर दिले, “ ‘प्रभू तुमचा परमेश्वर यांच्यावर तुमच्या पूर्ण अंतःकरणाने आणि तुमच्या पूर्ण जिवाने’ आणि ‘तुमच्या पूर्णशक्तीने आणि तुमच्या पूर्ण मनाने प्रीती करा आणि जशी स्वतःवर तशी तुमच्या शेजार्‍यावर प्रीती करा.’”

  6. “अगदी बरोबर सांगितलेस,” येशू म्हणाले, “तसेच कर म्हणजे तू जगशील.”

  7. तरी आपले न्यायीपणाचे समर्थन करण्यासाठी त्याने येशूंना विचारले, “माझा शेजारी कोण?”

  8. उत्तर देत येशू म्हणाले: “एक मनुष्य खाली यरुशलेमाहून यरीहोला जात असताना, चोरांनी त्याच्यावर हल्ला केला, कपडे हिसकावून घेतले, मारहाण केली आणि त्याला अर्धमेल्या अवस्थेत टाकून ते निघून गेले.

  9. एक याजक त्या बाजूने आला आणि त्या मनुष्याला तिथे पडलेले पाहून, रस्ता ओलांडून निघून गेला.

  10. त्याचप्रमाणे एक लेवी आला, त्याने त्याला पाहिले, पण तो तसाच पुढे गेला.

  11. नंतर एक शोमरोनी, प्रवास करीत जिथे तो होता तिथे आला आणि त्याला पाहून त्याचा कळवळा आला.

  12. त्याच्याजवळ जाऊन त्या मनुष्याने त्याच्या जखमांना तेल व द्राक्षारस लावून पट्ट्या बांधल्या. त्याला आपल्या गाढवावर बसवून तो एका उतारशाळेत आला आणि त्याने त्याची सेवा केली.

  13. दुसर्‍या दिवशी त्याने उतारशाळेच्या मालकाला चांदीची दोन नाणी देऊन सांगितले, ‘या माणसाची काळजी घ्या,’ आणि ‘मी परत येईन, त्यावेळी जास्त खर्च झाला असेल तर त्याची भरपाई करेन.’

  14. “आता या तिघांपैकी चोरांच्या हाती सापडलेल्या मनुष्याचा शेजारी कोण होता असे तुला वाटते?”

  15. त्या नियमशास्त्रज्ञाने उत्तर दिले, “ज्याने त्याला दया दाखविली, तोच.” यावर येशू त्याला म्हणाले, “जा आणि असेच कर.”

  16. ते पाहून प्रभू त्याला म्हणाले, “तुम्ही परूशी लोक थाळी व प्याला बाहेरून स्वच्छ करता, पण तुमची मने लोभ आणि दुष्टपणा यांनी भरलेली असतात.

  17. अहो मूर्ख लोकांनो! ज्याने बाहेरील भाग घडविला त्यानेच अंतर्भाग सुद्धा घडविला नाही काय?

  18. तुमच्या अंतर्भागाबद्धल बोलायचे तर गरिबांना उदारता दाखवा म्हणजे तुम्हाला सर्वकाही शुद्ध असल्याचे आढळेल.

  19. “तुम्हा परूश्यांना धिक्कार असो! तुम्ही पुदिना, शेपू व बागेतील प्रत्येक प्रकारची भाजी यांचा दशांश देत असला, तरी तुम्ही न्याय आणि परमेश्वराची प्रीती याकडे दुर्लक्ष करता. तुम्ही दशांश निश्चितच द्यावा, पण ज्या अधिक महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही सोडू नयेत.

  20. “अहो परूश्यांनो, तुम्हाला धिक्कार असो! कारण भरबाजारात लोकांकडून मुजरे घेणे व सभागृहामध्ये प्रमुख जागेवर बसणे हे तुम्हाला प्रिय आहे.

  21. “तुमचा धिक्कार असो! कारण तुम्ही खुणा नसलेल्या कबरांसारखे आहात, लोकांना त्यावरून चालताना त्यांना माहीत होत नाही.”

  22. हे पाहून परूशी आणि नियमशास्त्र शिक्षक तक्रार करू लागले, “येशू पापी लोकांचे स्वागत करतात आणि त्यांच्या पंक्तीस बसून जेवतात.”

  23. “तेवढ्यात थोरला मुलगा शेतातील आपले काम आटोपून घरी आला आणि त्याला घरातून येणारे नृत्यसंगीत ऐकू आले.

  24. तेव्हा त्याने एका नोकराला बोलावून विचारले, ‘हे काय चालले आहे?’

  25. यावर त्याला सांगण्यात आले, ‘तुझा भाऊ परत आला आहे. तो सुखरुपपणे घरी आला म्हणून तुमच्या वडिलांनी एक पोसलेले वासरू कापले आहे!’