Skip to content

Self-Righteousness बद्दल बायबलमधील वचने

195 वचने · 30 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ते एकजूट होऊन मोशे व अहरोन यांच्याकडे आले व त्यांना म्हणाले, “तुमचे आता फार झाले आहे! सर्व समुदाय व त्यातील प्रत्येकजण पवित्र आहे आणि याहवेह त्यांच्याबरोबर आहेत. मग तुम्ही स्वतःला याहवेहच्या मंडळीपेक्षा उच्च का मानता?”

  2. याहवेह तुमच्या परमेश्वराने त्यांना तुमच्यापुढून घालवून दिल्यानंतर स्वतःशी म्हणू नका, “मी नीतिमान आहे, म्हणूनच याहवेहने हा देश वतन म्हणून घेण्यास मला मदत केली.” नाही! तसे मुळीच नाही, तर या राष्ट्रांच्या दुष्टपणामुळेच याहवेह त्यांना तुमच्यापुढून घालवून देत आहेत.

  3. तुम्ही नीतिमान आणि सरळ मनाचे लोक आहात म्हणून याहवेह तुम्हाला त्यांचा देश ताब्यात देतील असे मुळीच नाही; मी पुन्हा सांगतो की याहवेह तुमचे परमेश्वर हे केवळ त्या राष्ट्रांच्या दुष्टपणामुळेच व त्यांनी तुमचे पूर्वज अब्राहाम, इसहाक व याकोब यांना जी शपथ दिली होती, ती पूर्ण करण्यासाठीच ते त्या राष्ट्रांना तुमच्यापुढून घालवून देतील.

  4. आणि हे जाणून घ्या, याहवेह तुमचे परमेश्वर, तुम्ही नीतिमान आहात म्हणून हा उत्तम देश तुम्हाला वतन म्हणून देत नाहीत, खरेतर तुम्ही ताठ मानेचे लोक आहात.

  5. ते आपल्या प्रामाणिक सेवकांची पावले सांभाळतील, परंतु दुष्ट अंधकारमय ठिकाणी शांत केले जातील. “कोणीही बळाने विजय पावत नाही;

  6. जेव्हा शमुवेलने शौलाला गाठले, शौल म्हणाला, “याहवेह तुम्हाला आशीर्वादित करो! मी याहवेहच्या सूचना पार पाडल्या आहेत.”

  7. आता यश माझ्यापासून दूर केले गेले आहे, मग माझ्यात स्वतःला मदत करण्यासाठी शक्ती आहे का?

  8. मी जरी निर्दोष असलो, तरी माझे मुख माझा निषेध करेल; मी दोषरहित असतो, तरी माझे मुख मलाच दोषी ठरवेल.

  9. जरी मी स्वतःला साबणाने, आणि माझे हात क्षाराने धुतले,

  10. तरी देखील तुम्ही मला चिखलाच्‍या खड्ड्यात टाकाल, आणि माझी वस्त्रे सुद्धा माझा तिरस्कार करतील.

  11. तू परमेश्वराला म्हणतोस, ‘माझा विश्वास अचूक आहे आणि मी तुमच्या दृष्टीने शुद्ध आहे.’

  12. अहा, मला किती वाटते की परमेश्वराने बोलावे, आणि त्यांनी तुझ्याविरुद्ध आपले तोंड उघडावे

  13. आणि ज्ञानाचे रहस्य तुला प्रकट करावे, कारण खर्‍या ज्ञानाला दोन बाजू आहेत. हे माहीत असू दे: की परमेश्वराने तुझी काही पापे सोडली आहेत.

  14. “खचितच तुम्हीच ते विशिष्ट लोक आहात, आणि ज्ञान तुमच्याबरोबरच नाहीसे होईल!

  15. पण मी सर्वसमर्थाशी बोलावे आणि माझा वाद परमेश्वरासमोर मांडावा असे मी इच्छितो.

  16. “आता गप्प राहा व मला बोलू द्या; मग माझ्यावर जे यावयाचे ते येवो.

  17. जरी परमेश्वराने मला मारून टाकले, तरीही मी त्यांच्यावर आशा ठेवेन; व खचितच त्यांच्यासमोर मी माझ्या मार्गाचे समर्थन करेन.

  18. मी माझा वाद तयार केला आहे, मला माहीत आहे की मी दोषमुक्त ठरेन.

  19. माझ्याविरुद्ध कोणी आरोप करेल काय? केलाच तर, मी शांत राहीन आणि मरून जाईन.

  20. तरीही माझ्या हातांनी जुलूम केला नाही आणि माझी प्रार्थना शुद्ध आहे.

  21. “अगे पृथ्वी, माझे रक्त झाकून ठेवू नकोस; माझे रुदन कधीही विश्रांती न पावो!

  22. “ही अशी भाषणे तू कधी थांबविणार आहेस? जरा समजूतदारपणे घे आणि मग आपण बोलू.

  23. आम्हाला जनावरांप्रमाणे का समजतोस तुझ्या नजरेत आम्ही मूर्ख आहोत का?

  24. रागाने जो तू स्वतःला फाडतोस, त्या तुझ्यामुळे पृथ्वी ओसाड पडावी काय? किंवा खडक आपल्या ठिकाणातून कोसळू द्यावे काय?

  25. “आता तुम्ही काय विचार करतात हे मला चांगले माहिती आहे, माझे वाईट होईल अशा योजना तुम्ही करता.