Self-Righteousness बद्दल बायबलमधील वचने: Condemn others
Condemn others बद्दल वचने
ते पाहून परूशी लोकांनी येशूंच्या शिष्यांना विचारले, “तुमचे गुरू जकातदार व पापी लोकांच्या पंक्तीला बसून का जेवतात?”
हे ऐकून, येशू त्यांना म्हणाले, “जे निरोगी आहेत त्यांना वैद्याची गरज नसते, परंतु रोग्यास असते.
ते पुढे म्हणाले जा आणि याचा अर्थ काय आहे शिकून घ्या: ‘मला तुमची अर्पणे नकोत.’ पण दया हवी आहे. मी नीतिमानांस नव्हे, तर पापी जनांस बोलविण्यास आलो आहे.”
ज्या परूश्याने येशूंना भोजनाचे आमंत्रण दिले होते, त्याने हे पाहिले तेव्हा तो मनाशीच म्हणाला, “यावरूनच येशू संदेष्टा नाहीत हे सिद्ध होते, कारण परमेश्वराने त्यांना खरोखरच पाठविले असते, तर ही स्त्री पापी आहे हे त्यांना समजले असते.”